कलरफुल पक्षी निरिक्षण: पत्रकार अनुप कुसुमकर

 कलरफुल पक्षी निरिक्षण: पत्रकार अनुप कुसुमकर


आज सकाळी गच्चीवर फिरत असताना आढळून आलेला अनोळखी पाहूणा...

मोबाईल कॅमेऱ्यात फोटो कैद करून त्याची माहिती गुगल वर शोधत असताना जे नाव फक्त ऐकण्यात होते ते आज प्रत्यक्ष पाहण्यासाठी मिळाले याचा आंनद झाला.



कॉमन किंगफिशर अर्थात इंडियन किंगफिशर हे पक्षी युरेशियन किंगफिशर आणि रिव्हर किंगफिशर म्हणूनही ओळखले जाते. किंगफिशरची ही एक छोटी प्रजाती आहे ज्यात सात उपप्रजाती युरेशिया आणि उत्तर आफ्रिकेतील विस्तृत वितरणामध्ये ओळखल्या जातात . हे त्याच्या बर्‍याच भागात रहिवासी आहे, परंतु हिवाळ्यात नद्या गोठवलेल्या भागातून स्थलांतरित होतात.


या चिमणीच्या आकाराच्या पक्ष्याचे वैशिष्ट्यपूर्ण लहान शेपटी, मोठ्या डोक्याचे किंगफिशर प्रोफाइल आहे; त्याचा वरचा भाग निळा, नारिंगी अंडरपार्ट आणि एक लांब बिल आहे. हे मुख्यतः मासे खातात, डायव्हिंगद्वारे पकडले जाते आणि पाण्याखाली शिकार पाहण्यास सक्षम असे डोळे असतात.

    खंड्या किंवा किलकिल्या (शास्त्रीय नाव : Halcyon smyrnensis ; इंग्लिश: White Breasted Kingfisher, व्हाइट ब्रेस्टेड किंगफिशर) हा लहान आकारातील पाणथळी जागेजवळ रहाणारा पक्षी आहे. हे पक्षी युरेशियात पसरलेला आहे तो बहुतांश बल्गेरिया, तुर्की, पश्चिम आशिया, भारतीय उपखंडापासून फिलिपिन्सपर्यंत आढळतो. लहान आकार, अत्यंत आकर्षक रंग, हे याचे वैशिष्ट्य आहे. छोटे किडे, लहान मासे, लहान बेडूक इत्यादी मुख्य खाद्य आहे. पाण्यावर शिकारीसाठी एकाग्रतेने फडफड करून अत्यंत वेगाने पाण्यात सूर मारून शिकार करणे हे या पक्ष्याचे वैशिष्ट्य आहे.

खंड्या हे सामान्य नाम असून या पक्षाच्या विविध जातींपैकी पांढऱ्या छातीच्या खंड्याला नुसते खंड्या या नावाने ओळखतात. याच्या इतर जातभाईंची नावे लहान खंड्या ,कवडा खंड्या, काळ्या डोक्याचा खंड्या ,तिबोटी खंड्या ,घोंगी खंड्या,मलबारी खंड्या अशी आहेत.

प्रत्येक बारा कोसावर मराठी भाषा बदलत जाते, याचे पक्षिविश्वाशी निगडित उत्तम उदाहरण म्हणजे खंडया पक्षी. किंगफिशर या पक्ष्याला काही लोक खंड्या म्हणतात, काही जण बंड्या, बंडू तर काही धीवर नाव सांगतात. पक्ष्यांची प्रमाण नावे शोधताना महाराष्ट्र पक्षिमित्र संघटनेचे कार्याध्‍यक्ष डॉ. राजू कसंबे यांनी या पक्ष्याला धीवर हे नाव दिले आहे. धीवर म्हणजे मासे पकडणारा.. कोळी लोकांनाही धीवर म्हणतात. त्यामुळे आता खंड्या नाही; तर मराठीत धीवर या नावाने किंगफिशर ओळखला जाणार आहे.

✍️ संकलन: अनुप कुसुमकर 

        पत्रकार, परळी वैजनाथ. 




•••

VIDEO NEWS GALLERY 



















टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !