इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

राणी लक्ष्मीबाई टॉवर येथे आंदोलन

संभाजी भिडे यांच्या प्रतिमेस जोडे मारत केला निषेध

महात्मा ज्योतिबा फुले प्रेमींचे राणी लक्ष्मीबाई टॉवर येथे आंदोलन 

परळी (प्रतिनिधी)

  महात्मा ज्योतिराव फुले यांच्या बाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी शिवप्रतिष्ठाणचे संभाजी भिडे यांचा म.फुलेप्रेमींच्या वतिने राणी लक्ष्मीबाई टावर येथे मंगळवार दि.1 ऑगस्ट रोजी भिडे यांच्या प्रतिमेस जोडे मारत निषेध केला.भिडे यांच्याविरुध्द कठोर कारवाई करावी या मागणीचे तहसिलदार यांना निवेदन देण्यात आले.

 संभाजी भिडे यांनी दोन दिवसापुर्वी महात्मा ज्योतिराव फुले यांच्या सामाजीक कार्यांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर समाजातुन निषेध व्यक्त होत आहे.परळी शहरातील महात्मा ज्योतिराव फुले प्रेमींनी मंगळवार दि.1 ऑगस्ट रोजी सकाळी 11.30 वाजता राणी लक्ष्मीबाई टॉवर येथे संभाजी भिडे यांच्या प्रतिमेस जोडे मारत निषेध नोंदवला यानंतर तहसिलदार यांना मागण्यांचे निवेदन देत भिडे यांच्याविरुध्द कठोर कारवाई करावी अशी मागणी केली.यावेळी सचिन आरसुडे,दत्ता लोखंडे,राजकुमार डाके,बाळू फुले अनिल शिंदे,हनुमान आगरकर,नवनाथ खेत्रे,उत्तम लोखंडे,बालासाहेब लोखंडे,धनंजय आढाव,सुनील काळे,रमेश लोखंडे,रमेश लोखंडे,प्रवीण काळे दत्ता बनसोडे,भोकरे,चंद्रशेखर काळे सिताराम लोखंडे,नेताजी लोखंडे, साईनाथ डोके,प्रदीप टिवनकर गोपीनाथ घोडके,सोमनाथ सोनटक्के,अमोल काकडे,गोविंद लोखंडे,रमेश बनसोडे,बालाजी बनसोडे,रोहन लोखंडे,निखिल लोखंडे,विलास खरोळकर,आदिनाथ बनसोडे,रामेश्वर भालेकर,चक्रधर लोखंडे,भागवत लोखंडे,आमोल आरसुडे,श्याम शिंदे,गौरव पाथरकर,विजय बनसोडे,अनिकेत खेत्रे,ऋषिकेश भालेकर आदी उपस्थित होते.


 •••

VIDEO NEWS GALLERY 



















टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!