खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

 खून प्रकरणातील वान्टेड आरोपी दादरमधून पकडला: सपोनि सपकाळ यांची कामगिरी

परळी वैजनाथ, प्रतिनिधी...
       खून प्रकरणातील वान्टेड आरोपी दादरमधून पकडण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. परळी शहर पोलीस ठाण्याचे  सपोनि सपकाळ यांनी गुन्ह्याचा तांत्रिक तपास करताना या आरोपीला दादर पोलीसांच्या सहकार्याने पकडण्याची कामगिरी बजावली आहे.

        परळी शहर पोलीस ठाण्यात  कंत्राटदार आत्माराम उर्फ बंडू मुंडे खून प्रकरणी गुन्हा रजिस्टर क्रमांक 128/2023 कलम 302, 34 आय.पी.सी. अन्वये गुन्हा दाखल आहे.या गुन्ह्याचा तपास परळी शहर पोलीस ठाण्याचे  सपोनि सपकाळ करत आहेत. तांत्रिक तपासा दरम्यान पाहिजे असलेला आरोपी याचे दादर परिसरामध्ये लोकेशन दिसून येत होते. एपीआय सपकाळ यांना दि.१३ रोजी 11.45 वाजता एन. सी. केळकर रोडवर हनुमान मंदिर जवळ पाहिजे आरोपीत हा त्याच्या एका मित्रासोबत अचानक दिसून आला. तसेच ते दोघे सदर ठिकाणाहून निघून जाण्याच्या तयारीत दिसून आले. एपीआय सपकाळ हे सिव्हिल ड्रेसवर एकटेच असल्याने व  वेळ कमी असल्याने त्यांनी तात्काळ  कबूतरखाना येथील दादर वाहतूक विभागाचे कर्तव्यावरील पोलीस हवालदार 970116/सुरेश भोसले तसेच हनुमान मंदिर सर्कल येथील वाहतूक पोलीस हवालदार 30823/ बिन्नर यांना संशयित इसम पकडण्यास  मदत करण्याची विनंती केली. प्रसंगावधान राखून पोलीस हवालदार भोसले व बिन्नर यांनी पानेरी जंक्शन येथील पोलीस हवालदार 980633/ सुधाकर पाटील यांना सुद्धा मदतीला बोलावून वाहतूक नियमन करण्याचा, कारवाया करण्याचा बहाना करत सदर पाहिजे आरोपी व सोबत असलेला त्याचा मित्र यांना तात्काळ ताब्यात घेतले. सोबत असलेल्या एपीआय सपकाळ यांनी लागलीच मुख्य नियंत्रण कक्षास विनंती करून पुढील मदत मागितली असता शिवाजी पार्क  पोलीस ठाण्याचे गस्ती वाहन व बीट मार्शल सदर ठिकाणी आल्यावर सदर आरोपीत नामे महेश नामदेव रोडे वय-23 वर्षे व त्याचा मित्र सागर राजाराम इंगवले वय 23 वर्षे यांना  शिवाजी पार्क पोलीस ठाणे येथे पुढील योग्य ती कारवाई करण्यास घेऊन गेले.
      दादर वाहतूक विभागाचे 1) पो. ह. क्रमांक 30823/श्री तुकाराम बिन्नर, 2) पो.ह. क्रमांक 970161/श्री सुरेश भोसले, 3) पो. ह. क्रमांक 980633/सुधाकर पाटील यांनी प्रसंगावधान राखून खुनासारख्या गंभीर गुन्ह्यातील आरोपीतास पकडून ही कामगिरी केलेली आहे. 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

मनोज जरांगे-पाटील यांची महासंवाद बैठक: जल्लोष पडला महागात: २६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

खळबळजनक घटना: राज्य गुप्तचर विभागातील सहाय्यक पोलीस निरीक्षकाची परळीत रेल्वे रुळावर आत्महत्या