प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार

इमेज
चंद्रपूरच्या प्रदूषणावर ना. पंकजा मुंडे ॲक्शन मोडवर ; विधानसभेतील लक्षवेधीत मांडली परखड भूमिका प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न माझ्यासाठी महत्वाचा मुंबई, दि. २५ - चंद्रपूरसारख्या अतिप्रदूषित औद्योगिक क्षेत्रासाठी शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लॉंग टर्म गोल्सचा स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला असून तो चंद्रपूरमध्ये पायलट प्रकल्प म्हणून राबविण्यात येणार आहे असे स्पष्ट करत हा आराखडा अंतिम करून सभागृहासमोर सादर करण्यात येईल, नागरिकांचे आरोग्य  माझ्यासाठी महत्वाचे आहे असं राज्याच्या  पर्यावरण मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज विधानसभेत परखडपणे सांगितलं.   आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरमधील कोल वॉशरी, कोळसा खाणी, सिमेंट उद्योग आणि थर्मल पॉवर प्रकल्पांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री मुंडे म्हणाल्या की, मी काही दिवसांपूर्वी चंद्रपूरचा दौरा केला.या दौऱ्यात मी स्वतः अनेक उद्योग, कोल वॉशरी आणि प्रभावित गावांना भेटी दिल्या. त्या भागातील प्रदूषणाची तीव्रता प्रत्यक्ष पाहिल...

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

 महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

फेसबुकवरची मैत्री परळीतील गृहिणीली आली अंगलट: ब्लॅकमेलिंग, शारिरीक संबंध, मारहाण ते जीवे मारण्या पर्यंतची फरफट:गुन्हा दाखल

परळी वैजनाथ प्रतिनिधी फेसबुक वरची मैत्री आपल्या कधीही अंगलट येऊ शकते विशेषतः फेसबुक वापरणाऱ्या महिलांनी याबाबतीत काळजी घेणे अत्यंत आवश्यक असून फेसबुक वरून मैत्री करून अनेक जण महिलांना आपल्या जाळ्यात ओढतात व त्यानंतर जे घडते ते अंगावर काटे आणणारे असते असाच काहीसा प्रकार परळी शहरातील एका गृहिणी सोबत घडला असून याप्रकरणी या महिलेच्या फिर्यादीवरून गुन्हा दाख दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी या प्रकरणातील आरोपीला अटक केली आहे
        पोलीस सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार, परळी वै येथील शारदानगर भागातील 32 वर्षिय गृहिणी महिलेने फेसबुकवर  झालेल्या मैत्रीनंतरआपल्यावर बेतलेल्या प्रसंगाबाबत बीड येथील एका आरोपीविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे. यातील आरोपी अकबर बबन शेख वय 23 वर्षे रा. तेलगावनाका ईंदिरानगर बीड याने फिर्यादि महिलेशी फेसबुक अकाउन्टवर ओळख करुन घेतली. त्यानंतर सततच्या चॅटिंगमध्ये मैत्री पुढे गेली. विविध प्रकारची माहिती देवाणघेवाण झाली. त्यानंतर आरोपीने गैरफायदा घ्यायला सुरुवात करुन फिर्यादिस ब्लॅकमेल करणे सुरु झाले.आरोपीने फिर्यादिचे राहते घरी शारदानगर परळी वै येथे जावुन फिर्यादिचे ईच्छेविरुद्ध जबरदस्तीने शारीरीक संबंध ठेवले. तसेच दिनांक दिनांक 13/3/2024 रोजी फिर्यादिचे पतीला जिवे मारण्याचा प्रयत्न केला.  फिर्यादि महिलेला चापटा बुक्याने मारहाण केली. दिनांक 02/04/2024 रोजी फिर्यादिचे घरी कोणी नसताना सकाळी 9.40 वा. सुमारास आरोपी घरी जावुन तु मला कॉल करून का बोलत नाहीस असे म्हणुन फिर्यादिचे अंगावर जावुन वाईट हेतुने हात पकडुन छातीला हात लावुन फिर्यादिचा विनयभंग केला.त्यास प्रतीकार करत असताना त्याने फिर्यादिस उचलुन जमीनीवर आपटले. त्यावेळी आरोपीने हातातील काहीतरी डोक्यात मारुन जखमी केले. त्याने उजवा हात दाबुन धरल्याने हातातील बांगड्या फुटुन हातालाही जखम झाली आहे .अशा आशयाची फिर्याद दिल्यानंतर आरोपी अकबर बबन शेख वय 23 वर्षे रा. तेलगावनाका ईंदिरानगर बीड याच्याविरुद्ध परळीच्या संभाजीनगर पोलीस ठाण्यातगुरनं 46/2024 कलम 376,354, 354 (D), 452,323,506 भादवी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
             दरम्यान या गंभीर प्रकरणी पिंक पथक अंबाजोगाई च्या पोउपनि प्रतिभा एम. शेटे, संभाजीनगर पोनि शेख,सपोनि प्रविण जाधव,पोअं. भगवान गुट्टे आदींनी पुढील तपास करीत आरोपी अकबर बबन शेख वय 23 वर्षे रा. तेलगावनाका ईंदिरानगर बीड यास अटक केली आहे.
      

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या