मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

 परळीच्या मोंढ्यात तुंबळ हाणामारी: एकाला डोके फुटेपर्यंत केली मारहाण


 परळी वैजनाथ, प्रतिनिधी....

 परळीच्या मोंढा मार्केटमध्ये हात गाडीवाले, फुटपाथवर बसणारे व्यावसायिक व फळ विक्रेते हे कुठल्याच नियमाचे पालन न करता एक तर रस्त्यावर बसतात. तसेच इथे जागा मिळविण्यासाठी एकमेकात वाद घालतात असे सर्रास नेहमीचे प्रकार दिसून येतात. या ठिकाणचे फळ विक्रेते , गाड्यावाले आपल्या गाड्यांच्या आजूबाजूस कोणीच बसू नये अशा पद्धतीने वागतात. दुसरा व्यवसायिक जर या गाड्यांच्या आजूबाजूला रिकाम्या जागेत बसू लागला तर वादाचे प्रसंग उद्भवतात. त्यामुळे अनेक वेळा वादाचे प्रसंग होतांना दिसतात.


Click:● *दुर्दैवी नकोशी : सहा महिन्यांच्या चिमुकलीस पिशवीत बांधून रस्त्यावर फेकले*


         या घटनेबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, आज या वादाने एक परिसीमाच गाठली. या ठिकाणी एका व्यावसायिकासोबत जागा पकडून बसण्यावरून वाद निर्माण झाला.या वादाचे रूपांतर तुंबळ हाणामारीत झाले आणि चार- पाचजणांनी मिळून एका जणास धरून डोक्यात तुंबळ मारहाण करून जखमी केल्याची घटना समोर आली आहे.मोंढा परिसरात हा प्रकार घडल्याने या भांडणाची काही क्षणातच संपूर्ण शहरभर चर्चा झाली. या मारहाणीत एका युवकाचे मोठे प्रमाणावर डोके फुटले असून अशा प्रकारच्या रोजच्या भांडणांनी मोंढ्यातील वातावरण नेहमीच गढूळ होते. थोडे काही झाले की धावपळ होताना दिसते. मुख्य बाजारपेठेतच असे प्रकार सर्रास वाढलेने अशांतता निर्माण होत आहे. दरम्यान मोंढ्यात रस्त्यावर उभे राहणाऱ्या हातगाडेवाले, फळ विक्रेते यांच्या मुजोरीचा सामना नेहमीच सर्वसामान्य नागरिकांनाही करावा लागतो. वाहनधारकांनाही ये जा  करताना अडचण सहन करावी लागते. यावर ठोस असा काहीतरी तोडगा काढावा अशी गेल्या अनेक दिवसापासूनची मागणी आहे. मात्र यावर कोणीच लक्ष देताना दिसत नाही. याचा त्रास मात्र बाजारपेठेतील अन्य व्यापारी व सर्वसामान्य नागरिकांना नेहमीच होताना दिसतो.

        दरम्यान आज झालेल्या भांडणाचे कारण अस्पष्ट असुन याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत.






टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार