युवकांचा स्तुत्य उपक्रम....

इमेज
  महेश नवमीनिमित्त माहेश्वरी मित्र परिवारातर्फे गुरुकुलातील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप परळी वैजनाथ: प्रतिनिधी.... दरवर्षीप्रमाणे या वर्षीही महेश नवमीचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला. या महोत्सवाचे औचित्य साधून श्री स्वामी श्रद्धानंद गुरुकुल येथील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप करण्यात आले. युवकांच्या या कौतुकास्पद कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा सेवा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धांत मंत्री, केदार सारडा, हर्ष भंडारी, रुपेश बंग, अथर्व कलंत्री, अनिकेत सारडा, श्याम बजाज, यश डीडवाणी, श्रीनिवास जाजू, युवराज जाजू, गोकुल भंसाली, गणेश सोनी, तेजस इनदानी, जय तोष्णीवाल, यश लोढा तसेच समस्त माहेश्वरी मित्र परिवाराचे विशेष सहकार्य लाभले. माहेश्वरी मित्र परिवारातर्फे सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहे. समाजसेवा आणि सुसंस्कारांचे हे कार्य आपण सर्वांच्या साथीने असेच पुढे सुरू ठेवूया, असा संकल्प यावेळी करण्यात आला.

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

 ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त



परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....
       शहरातील एका ज्युस सेंटरमध्ये आलेल्या  ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त झाले.या ज्युस सेंटरमध्ये काम करणाऱ्या एका युवकाने या मुलींचा व्हिडिओ फोटो घेण्याचे हे ग्रहणास्पद हे कृत्य केल्याने मोठा गोंधळ झाल्याचे बघायला मिळाले.दरम्यान मध्यवर्ती ठिकाणीच हा प्रकार घडल्याने मोठ्या प्रमाणावर नागरिकांची व बघ्यांची गर्दी झाली होती.
       प्राप्त माहितीनुसार, परळीतील उपजिल्हा रुग्णालयाजवळ मुख्य रस्त्यावरच असलेल्या लोकमान्य ज्युस सेंटरमध्ये दोन युवती बसलेल्या असताना याच ज्युस सेंटरमध्ये काम करणारा एक युवक वारंवार त्यांच्या टेबलजवळून मोबाईल हातात धरुन ये-जा करत होता. ही बाब एका मुलीच्या लक्षात आल्याने तिने आपल्या पालकांना ही बाब कळवली.पालकांनी  येउन शहानिशा केली असता  या ज्यूस सेंटर मध्ये काम करणाऱ्य  मुलाने या  युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट केल्याचा प्रकार समोर आल्याने संतप्त प्रतिक्रिया उमटली.काही वेळातच या घटनेने नागरिक संतप्त झाल्याने ज्युस सेंटरमध्ये मोठा जमाव जमा झाला. काहीकाळ या ठिकाणी गोंधळ सुरु होता.दरम्यान मध्यवर्ती ठिकाणीच हा प्रकार घडल्याने मोठ्या प्रमाणावर नागरिकांची व बघ्यांची गर्दी झाली होती. पोलीसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या