धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या


परळी वैजनाथ , प्रतिनिधी...

      शहरातील पवनराजे अर्बन निधी या अर्थपेढीचे अध्यक्ष प्रल्हाद सावंत यांनी आत्महत्या केल्याची घटना आज सायंकाळी सात वाजता उघडकीस आली आहे. सध्याच्या परिस्थितीत पतसंस्था, मल्टीस्टेट, पतपेढ्या यांच्या आर्थिक अडचणीच्या घटनांमध्ये वाढ झालेली आहे. बीड जिल्ह्यात काही पतसंस्था बाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. यातच आता परळी शहरातील मोठी आर्थिक उलाढाल असलेल्या पवन राजे अर्बन निधीचे अध्यक्ष प्रल्हाद सावंत यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना पुढे आली आहे.

          प्रेम प्रज्ञा नगर येथील एका अपॉर्टमेंट मध्ये प्रल्हाद सावंत यांनी काही दिवसापूर्वीच घर खरेदी केले होते. या घरात अद्याप ते राहयलाही गेले नव्हते. याच घरात आज दोरीने गळफास घेऊन त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली. या घटनेने खळबळ उडाली आहे. दरम्यान आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला असून त्यांच्या खिशात  कागदपत्रे सापडले आहेत. यातून आत्महत्येचे कारण पुढे येण्याची शक्यता आहे. उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात मृतदेह ठेवण्यात आला आहे.

टिप्पण्या

  1. अत्यंत खेदजनक ! भावपूर्ण श्रद्धांजली !

    उत्तर द्याहटवा
  2. कशा मुळे आत्महत्या केली हे postmortem रिपोर्ट मध्ये कळाले आहे काय?किंवा ठोस कारण.

    उत्तर द्याहटवा
  3. असे ऐकले होते की फार कमी वेळात श्रीमंत होण्यासाठी प्रयत्न करत होते हे खरे आहे का

    उत्तर द्याहटवा
  4. लवकरच काय खरे कारण आहे ते कळेल

    उत्तर द्याहटवा
  5. बाहेर तोंड मारायची सवय असेल.............

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !