MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

 खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

परळी वैजनाथ दि १ :- परळी शहर पोलीस ठाणे हद्दीतील बायपास कॉर्नरला जिरेवाडी शिवारात गुत्तेदार आत्माराम उर्फ बंडू मुंडे वय ५४  रा.कन्हेरवाडी यांचा खून झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.
           प्राथमिक प्राप्त माहितीनुसार आत्माराम (बंडू) मुंडे हे काल रात्री घरातून गेले होते. आत्माराम मुंडे यांचे बायपास कॉर्नरला शेत असून त्या ठिकाणी पत्राचे शेड आहे. त्याच ठिकाणी त्यांचा मृतदेह आढळून आला आहे. प्रथमदर्शनी त्यांचा  खून झाला असल्याचे दिसून येत  आहे. घटनास्थळी परळी शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी दाखल झाले आहेत. ही घटना का व कशामुळे घडली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेने  खळबळ उडाली आहे.परळी शहर पोलीस ठाण्यात अद्याप कोणत्याही प्रकारची नोंद झालेली नाही.घटनास्थळावर पोलीस प्रक्रिया सुरु आहे.दरम्यान संपूर्ण पोलीस प्रक्रियेनंतर या घटनेची सविस्तर माहिती पुढे येणार आहे.


----------------------------------------------------



















टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

Video: अमानुष मारहाण....धक्कादायक प्रकार!

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार