खळबळजनक घटना: राज्य गुप्तचर विभागातील सहाय्यक पोलीस निरीक्षकाची परळीत रेल्वे रुळावर आत्महत्या

 खळबळजनक घटना: राज्य गुप्तचर विभागातील सहाय्यक पोलीस निरीक्षकाची परळीत रेल्वे रुळावर आत्महत्या



परळी वैजनाथ,  वृत्तसेवा...
        राज्य गुप्तचर विभागात (एसआयडी) कार्यरत असलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षकाने परळी वैजनाथ येथे रेल्वे रुळावर आत्महत्या केल्याची घटना समोर आली असून या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. बीड एस आयडीला सुभाष दुधाळ हे सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत होते. काही दिवसांपूर्वीच त्यांची पुणे येथे बदली झालेली आहे. मृतदेहाजवळ एक चिठ्ठीही सापडली असून यातून या आत्महत्येचे कारण समोर येणार आहे.
            काही महिन्यांपूर्वी बीड येथून बदली होऊन सध्या पुणे येथे एसआयडी विभागात कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक सुभाष दुधाळ यांचा मृतदेह आज सकाळी परळी रेल्वे स्टेशन परिसरात उड्डाणपूला खालील रेल्वेरुळावर आढळून आला. शुक्रवारी रात्रीनंतर पोलीस निरीक्षक दुधाळ यांनी रेल्वे गाडीखाली येऊन आत्महत्या केली असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे.परळी रेल्वेस्टेशन मास्तर यांनी आज सकाळी सहा वाजेच्या सुमारास रेल्वे पोलीस स्टेशनमध्ये  रेल्वेगाडीखाली एका व्यक्तीचा मृतदेह आढळून असल्याची माहिती कळविली. यावरून सहाय्यक पोलीस निरीक्षक परमेश्वर सोगे, पोलीस उपनिरीक्षक साबळे, जमादार बाबासाहेब फड, राजू राठोड, सातपुते व इतर कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. उड्डाणपूला जवळील रेल्वे पटरीवर एका जणाचा दोन तुकडे झालेला मृतदेह आढळून आला.  मयत व्यक्तीचे नाव सुभाष दुधाळ असे असल्याची माहिती रेल्वे पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक परमेश्वर सोगे यांनी दिली. काही महिन्यांपूर्वी बीड येथून बदली होऊन सध्या पुणे येथे एसआयडी विभागात कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक सुभाष दुधाळ यांचा हा मृतदेह आहे.मृतदेहाचे दोन तुकडे झाले आहेत.     
         दरम्यान ही आत्महत्या आहे की संशयास्पद मृत्यू याबाबत अद्याप कोणतीही स्पष्टता आलेली नाही. मात्र या मृतदेहाजवळ एक चिठ्ठी सापडली असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. या चिठ्ठीच्या अनुषंगानेच या मृत्यू मागचे कारण समोर येणार आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !