मनोज जरांगे-पाटील यांची महासंवाद बैठक: जल्लोष पडला महागात: २६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

 मनोज जरांगे-पाटील यांची महासंवाद बैठक: जल्लोष पडला महागात: २६ जणांविरुद्ध  गुन्हा दाखल



परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....
       सकल मराठा समाजाच्या वतीने परळी वैजनाथ येथे मनोज जरांगे-पाटील यांची महासंवाद बैठक काल दि.२० रोजी आयोजित करण्यात आली होती. या अनुषंगाने या बैठकीला प्रशासनाने नाकारण्यात आलेली परवानगी न्यायालयाने दिल्यानंतर कार्यकर्त्यांनी जमा होत फटाके फोडून, पेढे वाटून जल्लोष केला होता.या प्रकरणात २६ जणांविरुद्ध  गुन्हा दाखल  करण्यात आला आहे.
      याबाबत पोलीस सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार छत्रपती शिवाजी महाराज चौक, परळी वैजनाथ येथे दि. 20.03.2024 रोजी जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केले व सन 2024 चे सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीचे आदर्श आचारसंहितेचे अनुषंगाने जिल्हाधिकारी बीड यांचे आदेशाचे उल्लघंन केले म्हणुन २६ जणांविरुद्ध  पोलीस ठाणे परळी शहर येथे गु.र.नं. 46/2024 कलम 188 भा.द.वि. सह कलम 135 म. पो. अधिनियम प्रमाणे  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास  पो.ना. 1918 भताने हे करीत आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !