पोस्ट्स

एम बी न्यूज लेबलसह पोस्ट दाखवत आहे

MB NEWS-आरोग्य सेवा सर्वोत्कृष्ट पुरस्काराने औषधनिर्माता वर्षाताई ढगे यांचा गौरव

इमेज
  आरोग्य सेवा सर्वोत्कृष्ट पुरस्काराने औषधनिर्माता वर्षाताई ढगे यांचा गौरव अंबाजोगाई (वार्ताहर) येथील औषधनिर्माता वर्षा भगवानराव ढगे (रा.बोधिघाट,अंबाजोगाई) यांचा "आरोग्य सेवा सर्वोत्कृष्ट पुरस्कार २०२१-२२" ने लातूर येथे मान्यवरांच्या हस्ते व प्रमुख उपस्थितीत गौरव करण्यात आला. राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानांतर्गत लातूर शहर महानगर पालिकेच्या आरोग्य विभागामार्फत जागतिक आरोग्य दिनानिमित्त "औषधनिर्माता" या पदावरून उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल औषधनिर्माता वर्षा भगवानराव ढगे (रा.बोधिघाट) यांना "आरोग्य सेवा सर्वोत्कृष्ट पुरस्कार २०२१-२२" हा बहुमान लातूर परीमंडळाचे उपसंचालक डॉ.एकनाथराव माले यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि परीमंडळ उपायुक्त डॉ.मयुरा शिंदेकर,जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.संजयराव ढगे यांच्या हस्ते प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन लातूर येथे नुकताच प्रदान करून सन्मानित करण्यात आले.सदरील कार्यक्रमास आरोग्य विभाग महानगर पालिका लातूरचे आरोग्य अधिकारी डॉ.प्रशांत माले,शहर कार्यक्रम व्यवस्थापक डॉ.रामेश्वर कलवले,शहर लेखा व्यवस्थापक शिवकुमार तेली,वैद्यकीय अधिकारी डॉ.सुनिता कद

MB NEWS- फोटो फीचर:आज चैत्र शुद्ध एकादशी निमित्त पंढरीत फुलला भक्तांचा मेळा ...

इमेज
  आज चैत्र शुद्ध एकादशी निमित्त पंढरीत फुलला भक्तांचा मेळा ... *सर्व श्रीविठ्ठल भक्तांना चैत्र एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा...* #चैत्र_वारी_2022 #पंढरपूर* *#फोटो_सभार ... #माझाक्लिक_PH ( प्रसाद हरिदास )* चैत्र_वारी_2022 #पंढरपूर*

MB NEWS-बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा यांचा मानाचा विधी महर्षी पुरस्कार बीडच्या अॅड. कालिदास नाना थिगळे यांना जाहीर

इमेज
  बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा यांचा मानाचा विधी महर्षी पुरस्कार  बीडच्या अॅड. कालिदास नाना थिगळे यांना जाहीर बीड, प्रतिनिधी...           बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा यांच्या वतीने दिला जाणारा यंदाचा विधी महर्षी पुरस्कार बीड चे प्रसिद्ध विधिज्ञ एडवोकेट श्री के पी थिगळे यांना जाहीर झाला आहे.        बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा यांच्या वतीने दिला जाणारा विधी महर्षी हा पुरस्कार विधी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या तसेच सामाजिक क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवणाऱ्या वकिलांना दिला जातो.सन 1968 पासून क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या तसेच विविध शैक्षणिक संस्था सामाजिक कार्य व अनेक अधिवेशनाचे अध्यक्षपद भूषवणाऱ्या बीड येथील एडवोकेट श्री के पी थिगळे  यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे. दिनांक 14 एप्रिल 20 22 रोजी ठाणे येथे पार पडणाऱ्या बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा यांच्या राज्य परिषदेमध्ये सदर पुरस्कार देण्यात येणार आहे. सदर पुरस्काराचे स्वरूप मानपत्र व सत्कार असून सदर कार्यक्रमास बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र ऍण्ड गोवाचे चेअरमन श्री वसंतराव साळुंखे व माननीय सर्वोच्च न्याया

MB NEWS-लग्नाची घाई फसवणूकीकडे नेई: सहा महिन्यात सहा वेळा लग्न करून फसवणारी नवरी पोलीसांच्या जाळ्यात

इमेज
  लग्नाची घाई फसवणूकीकडे नेई: सहा महिन्यात सहा वेळा लग्न करून फसवणारी नवरी पोलीसांच्या जाळ्यात औरंगाबाद : विवाह जुळणे सध्या आवघड बाब बनली आहे.मुली मिळत नसल्याने उपवर मुलांचे पालक खोलवर विचार न करता जमून आलेल्या स्थळाची घाईघाईने निवड करुन लग्न लावून मोकळे होतात.परंतु यातुन आपली मोठी फसवणूक होण्याची शक्यता आहे.खुलताबाद येथील एका तरुणाचे लग्न झाल्यानंतर तिसऱ्याच दिवशी नववधूने दागिन्यांसह एका कारमधून धूम ठोकल्याची घटना समोर आली होती. या नववधूला औरंगाबाद जिल्ह्यातील दौलताबाद पोलिसांनी अटक केली आहे.  सहा महिन्यात सहा वेळा लग्न करून चालु होती फसवाफसवी.या फसवाफसवी करणाऱ्या मुलीला  दुसऱ्याचं एका मुलांसोबत लग्न लावताना अंमळनेर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.खुलताबाद तालुक्यातील राजेश लाटे याचा जळगाव येथील शुभांगी शिंदे हिच्याशी विवाह झाला होता. बबन म्हस्के जळगाव व आशाबाई भोरे (मुलीची मावशी) अंजनगाव सुर्जी यांच्या मध्यस्थीतून हा सोहळा झाला होता. नवरदेवांकडील नातेवाइकांनी मुलीकडील मंडळींना १ लाख ३० हजार रोख व ७० हजारांचे सोने नवरीच्या अंगावर घातले होते. २९ मार्च नवरदेव राजेश व नववधू शुभांगी हे दौलताब

MB NEWS-विद्युत उपकरणाची अंत्ययात्रा काढत भारतीय जनता युवा मोर्चा चे महावितरण विरोधात आंदोलन

इमेज
  विद्युत उपकरणाची अंत्ययात्रा काढत भारतीय जनता युवा मोर्चा चे महावितरण विरोधात आंदोलन  भर उन्हाळ्यात सुरू केलेले भारनियमन तात्काळ बंद करण्याची मागणी  परळी वैजनाथ (प्रतिनिधी) - राज्यात सुरू केलेले अघोषित भारनियमयाविरुद्ध आता भाजप आक्रमक झालेले दिसून येत आहे.भाजपा  राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे व बीड जिल्ह्याच्या खासदार डॉ.प्रीतमताई मुंडे यांच्या आदेशानुसार भारतीय जनता युवा मोर्चा च्या वतीने परळी येथील महावितरण कार्यालयावर आज विद्युत उपकरणाची अंत्ययात्रा काढत  तीव्र आंदोलन करण्यात आले.यावेळी प्रतिकात्मक बंद फॅन ची तिरडी बाजार समिती मोंढा येथून व्यापार पेठ,राणी लक्ष्मीबाई टॉवर चौक येथून महावितरण कार्यलयापर्यंत काढण्यात आली.यावेळी महावितरण च्या गलथान कारभाराविरोधात तीव्र घोषणाबाजी करण्यात आली.भर उन्हाळ्यात सुरू केलेले भारनियमन तात्काळ बंद करा अशी मागणी यावेळी करण्यात आली. विशेष बाब म्हणजे राज्यात असलेल्या औष्णिक विद्युत केंद्रापैकी 750 मॅगाव्हेट चे प्रकल्प आहेत.या प्रकल्पामुळे होणारे राखेचे प्रदूषण व त्याचे दुष्परिणाम परळी परिसरातले नागरिक भोगत आले आहेत.असे असतानाही परळी परिसरात होणारे

MB NEWS-नवजात मयत अर्भक आढळले

इमेज
  नवजात मयत अर्भक आढळले बीड, सिमेंट बंधार्‍याच्या कडेला एक नवजात मयत पुरुष जातीचे अर्भक सोमवारी (दि.11) दुपारच्या सुमारास आढळले. सदरील अर्भक हे एका पांढर्‍या कपड्यात गुंडाळलेले होते. ग्रामीण पोलीसांना माहिती मिळताच त्यांनी धाव घेत मयत अर्भक जिल्हा रुग्णालयात दाखल केले असून पुढील तपास सुरु आहे.  बीड तालुक्यातील कपिलधारवाडी परिसरामध्ये एका सिमेंट बंधार्‍याच्या कडेला पांढर्‍या कपड्यात गुंडाळलेले मयत अर्भक गुराख्याला दिसले. त्याने याची माहिती पोलीसांना दिली. माहिती मिळताच बीड ग्रामीण पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक देविदास आवारे, अंमलदार प्रल्हाद चव्हाण, आनंद मस्के, चालक कृष्णात बडे यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. यावेळी पांढर्‍या कपड्यामध्ये गुंडाळलेले मयत पुरुष जातीचे अर्भक दिसून आले. त्यावर कुठेही जखम झालेली नव्हती. हे अर्भक एक दिवसाचे असल्याचा अंदाज पोलीसांनी वर्तवला आहे. सदरील अर्भक हे जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून पुढील तपास ग्रामीण पोलीस करत आहेत. 

MB NEWS-पाचेश रुपयांची लाच घेताना पं.स.ची महिला कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात

इमेज
  पाचेश रुपयांची लाच घेताना पं.स.ची महिला कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात  पाटोदा , आहिल्यादेवी होळकर, जलसिंचन योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या विहिरीचे सांकेतिक क्रमांक घेण्यासाठी पाटोदा पंचायत समितीतील सहायक कनिष्ठ महिलेने हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. तडतोजडअंती पाचशे रुपये स्विकारताना बीड एसीबीने सोमवारी (दि.11) रंगेहाथ पकडले. या कारवाईने खळबळ उडाली आहे.  श्रीमती मिरा विलास नागरगोजे (वय 39) या पाटोदा पंचायत समितीमध्ये कनिष्ठ सहायक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी तक्रारदाराकडे  त्यांच्या वडीलांच्या नावावरील आहिल्यादेवी होळकर, जलसिंचन योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या विहिरीचे सांकेतिक क्रमांक घेण्यासाठी एक हजार रुपये लाचेची मागणी केली. तडजोडअंती पाचशे रुपये लाच स्विकारताना नागरगोजे यांना रंगेहाथ पकडले. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक डॉ.राहुल खाडे, अप्पर पोलीस अधीक्षक विशाल खांबे, बीड उपअधीक्षक शंकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमोल धस, पोलीस अंमलदार श्रीराम गिराम, हनुमान गोरे, भरत गारदे, चालक गणेश म्हेत्रे यांनी केली आहे. 

MB NEWS-पंकजाताई मुंडेंच्या हस्ते अॅड.दत्तात्रय आंधळे यांचा सत्कार

इमेज
  पंकजाताई मुंडेंच्या हस्ते अॅड.दत्तात्रय आंधळे यांचा सत्कार परळी वैजनाथ( प्रतिनिधी) संत वाड्.मयातील संशोधन व लिखाण   आणि उल्लेखनीय कार्याबद्दल  आद्यकवी श्रीमुकुंदराजस्वामी रचित," सार्थ विवेकसिंधु"ग्रंथ निरूपण आणि संपादन ह.भ.प.ॲड दत्तात्रेय महाराज आंधळे यांनी केले असून त्या कार्याबद्दल भाजपा राष्ट्रीय चिटणीस पंकजा मुंडे यांच्या हस्ते ह.भ.प.ॲड दत्तात्रय महाराज आंधळे यांचा सत्कार करण्यात आला.     त्यांचे ,"सार्थ विवेक सिंधु" ग्रंथाचे नुकतेच प्रकाशन केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरी साहेब यांच्या शुभ हस्ते नागपूर जिल्ह्यातील आंभोरा देवस्थान येथे झाले . परळीला अभिमान वाटावा आणि परळीच्या साहित्य व धार्मिक क्षेत्राचे नावलौकिक वृद्धिंगत होईल असे कार्य श्री आंधळे महाराज यांनी केले असून जवळपास ४००पानी ग्रंथ असून यापूर्वी  त्यांची प्रकाशित पुस्तके *ज्ञानदेवांची गुरुगीता *ज्ञानेश्वरी अनुभवावी ही कथा *श्री संत जगमित्र नागा चरित्र *आद्यकवी श्रीमुकुंदराज एक शोध वाट *जाणिवेच्या कळा  असे ग्रंथ प्रकाशित झालेले आहेत.         यावेळी माजी नगराध्यक्ष  जुगलकिशोर लोहिया, वैद्यकीय अधिकारी ड

MB NEWS- परळी मतदारसंघात ग्रामीण भागात धनंजय मुंडेंची विकासगंगा

इमेज
  परळी मतदारसंघात ग्रामीण भागात धनंजय मुंडेंची विकासगंगा वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजनेतून 2.77 कोटींच्या कामांना प्रशासकीय मान्यता प्रदान _परळी (दि. 09) - परळी मतदारसंघातील ग्रामीण भागात सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी पायाभूत विकास कामांना गती देण्याचे काम हाती घेतले असून जिल्हा स्तरावर विविध योजनांमधून विकास कामांना निधी देण्याबरोबरच आता बहुजन कल्याण विभागाकडूनही निधी प्राप्त करून घेतला आहे._ Click:पात्र असलेला एकही नागरिक घरकुलापासून वंचित राहणार नाही - धनंजय मुंडे बहुजन कल्याण विभागाच्या वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजनेतून सुमारे 44 गावांतील विविध कामांना 2 कोटी 77 लाख रुपये निधी खर्चास प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे. Click:बीड व परभणीत फरक करणार नाही – पालकमंत्री धनंजय मुंडे वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजना 2021-22 अंतर्गत परळी मतदारसंघातील कामांची यादी सेलुुतांडा सौर पथदिवे बसवणे, नागपिंपरी-घाटशिळ तांडा पाईपलाईन 5 लक्ष, नागपिंपरी-घाटशिळ तांडा सिमेंट रस्ता 4 लक्ष, दौनापूर -तळ तांडा सौरपथदिवे 3 लक्ष, गोवर्धन-नाईक नगर तांडा पाईपलाईन 5 लक्ष, गोवर्धन-नाई

MB NEWS-परळीतील 170 नागरिकांना रमाई आवास योजनेंतर्गत 50 हजार रुपयांच्या पहिल्या हफत्याच्या धनादेशांचे धनंजय मुंडेंच्या हस्ते वितरण

इमेज
 *परळीतील 170 नागरिकांना रमाई आवास योजनेंतर्गत 50 हजार रुपयांच्या पहिल्या हफत्याच्या धनादेशांचे धनंजय मुंडेंच्या हस्ते वितरण* * पात्र असलेला एकही नागरिक घरकुलापासून वंचित राहणार नाही - धनंजय मुंडे* परळी (दि. 11) - परळी नगर परिषदेच्या माध्यमातून रमाई आवास घरकुल योजनेस पात्र असलेल्या प्रत्येक नागरिकांचे स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यात येणार असून, एकही पात्र नागरिक वंचित राहणार नाही, असे मत सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले आहे.  रमाई आवास घरकुल योजनेतून घरकुल मंजूर झालेल्या 170 लाभार्थींना 50 हजार रुपयांच्या धनादेशांचे धनंजय मुंडे यांच्या हस्ते आज परळीतील जगमित्र कार्यालयात वितरण करण्यात आले.  सन 2019-20 व 2020-21 या दोन वर्षात सविस्तर प्रकल्प अहवालानुसार 423 घरकुलांना मंजुरी देण्यात आलेली आहे. यांपैकी 170 लाभार्थींना आज झालेल्या कार्यक्रमात पहिल्या हफत्याचे वितरण करण्यात आले तर उर्वरित घरकुलांच्या पहिल्या हफत्याची रक्कमही लवकरच राज्य शासनाकडून मंजूर करण्यात येणार आहे.  या कार्यक्रमास ना. धनंजय मुंडे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष बजरंग सोनवणे, गटनेते अजयजी मुंडे, डॉ. मधुक