MB NEWS-बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा यांचा मानाचा विधी महर्षी पुरस्कार बीडच्या अॅड. कालिदास नाना थिगळे यांना जाहीर

 बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा यांचा मानाचा विधी महर्षी पुरस्कार  बीडच्या अॅड. कालिदास नाना थिगळे यांना जाहीर



बीड, प्रतिनिधी...

          बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा यांच्या वतीने दिला जाणारा यंदाचा विधी महर्षी पुरस्कार बीड चे प्रसिद्ध विधिज्ञ एडवोकेट श्री के पी थिगळे यांना जाहीर झाला आहे.

       बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा यांच्या वतीने दिला जाणारा विधी महर्षी हा पुरस्कार विधी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या तसेच सामाजिक क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवणाऱ्या वकिलांना दिला जातो.सन 1968 पासून क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या तसेच विविध शैक्षणिक संस्था सामाजिक कार्य व अनेक अधिवेशनाचे अध्यक्षपद भूषवणाऱ्या बीड येथील एडवोकेट श्री के पी थिगळे  यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे. दिनांक 14 एप्रिल 20 22 रोजी ठाणे येथे पार पडणाऱ्या बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा यांच्या राज्य परिषदेमध्ये सदर पुरस्कार देण्यात येणार आहे. सदर पुरस्काराचे स्वरूप मानपत्र व सत्कार असून सदर कार्यक्रमास बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र ऍण्ड गोवाचे चेअरमन श्री वसंतराव साळुंखे व माननीय सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्यायमूर्ती श्री अभय ओक,  मुख्यमंत्री व इतर सन्माननीय अतिथी उपस्थित राहणार आहेत. विधी, सामाजिक व शैक्षणिक कार्यात आपल्या कर्तुत्वाने वेगळा ठसा उमटवणारे व सदैव सामाजिक कामात अग्रेसर असणारे, निस्पृह पणे काम करणारे श्री थिगळे नाना यांना दिल्या जाणाऱ्या पुरस्कारामुळे त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !