युवकांचा स्तुत्य उपक्रम....

इमेज
  महेश नवमीनिमित्त माहेश्वरी मित्र परिवारातर्फे गुरुकुलातील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप परळी वैजनाथ: प्रतिनिधी.... दरवर्षीप्रमाणे या वर्षीही महेश नवमीचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला. या महोत्सवाचे औचित्य साधून श्री स्वामी श्रद्धानंद गुरुकुल येथील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप करण्यात आले. युवकांच्या या कौतुकास्पद कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा सेवा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धांत मंत्री, केदार सारडा, हर्ष भंडारी, रुपेश बंग, अथर्व कलंत्री, अनिकेत सारडा, श्याम बजाज, यश डीडवाणी, श्रीनिवास जाजू, युवराज जाजू, गोकुल भंसाली, गणेश सोनी, तेजस इनदानी, जय तोष्णीवाल, यश लोढा तसेच समस्त माहेश्वरी मित्र परिवाराचे विशेष सहकार्य लाभले. माहेश्वरी मित्र परिवारातर्फे सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहे. समाजसेवा आणि सुसंस्कारांचे हे कार्य आपण सर्वांच्या साथीने असेच पुढे सुरू ठेवूया, असा संकल्प यावेळी करण्यात आला.

MB NEWS-पंकजाताई मुंडेंच्या हस्ते अॅड.दत्तात्रय आंधळे यांचा सत्कार

 पंकजाताई मुंडेंच्या हस्ते अॅड.दत्तात्रय आंधळे यांचा सत्कार







परळी वैजनाथ( प्रतिनिधी)

संत वाड्.मयातील संशोधन व लिखाण   आणि उल्लेखनीय कार्याबद्दल  आद्यकवी श्रीमुकुंदराजस्वामी रचित," सार्थ विवेकसिंधु"ग्रंथ निरूपण आणि संपादन ह.भ.प.ॲड दत्तात्रेय महाराज आंधळे यांनी केले असून त्या कार्याबद्दल भाजपा राष्ट्रीय चिटणीस पंकजा मुंडे यांच्या हस्ते ह.भ.प.ॲड दत्तात्रय महाराज आंधळे यांचा सत्कार करण्यात आला.

    त्यांचे ,"सार्थ विवेक सिंधु" ग्रंथाचे नुकतेच प्रकाशन केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरी साहेब यांच्या शुभ हस्ते नागपूर जिल्ह्यातील आंभोरा देवस्थान येथे झाले . परळीला अभिमान वाटावा आणि परळीच्या साहित्य व धार्मिक क्षेत्राचे नावलौकिक वृद्धिंगत होईल असे कार्य श्री आंधळे महाराज यांनी केले असून जवळपास ४००पानी ग्रंथ असून यापूर्वी  त्यांची प्रकाशित पुस्तके

*ज्ञानदेवांची गुरुगीता

*ज्ञानेश्वरी अनुभवावी ही कथा

*श्री संत जगमित्र नागा चरित्र

*आद्यकवी श्रीमुकुंदराज एक शोध वाट

*जाणिवेच्या कळा  असे ग्रंथ प्रकाशित झालेले आहेत.

        यावेळी माजी नगराध्यक्ष  जुगलकिशोर लोहिया, वैद्यकीय अधिकारी डॉ.अरुण गुट्टे, श्री बालकिशन सोनी, जगदिश शिंदे, वैजनाथ कळसकर,संजय खाकरे , धनंजय आरबुने,  बालासाहेब कडबाने,सतिशसेठ बियाणी, आत्मलिंग शेटे,सुकेशनी नाईकवाडे,  बालासाहेब फड आदिंची उपस्थिती होती.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  प्रशांत जोशी यांनी केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या