MB NEWS-परळीतील 170 नागरिकांना रमाई आवास योजनेंतर्गत 50 हजार रुपयांच्या पहिल्या हफत्याच्या धनादेशांचे धनंजय मुंडेंच्या हस्ते वितरण

 *परळीतील 170 नागरिकांना रमाई आवास योजनेंतर्गत 50 हजार रुपयांच्या पहिल्या हफत्याच्या धनादेशांचे धनंजय मुंडेंच्या हस्ते वितरण*



*पात्र असलेला एकही नागरिक घरकुलापासून वंचित राहणार नाही - धनंजय मुंडे*


परळी (दि. 11) - परळी नगर परिषदेच्या माध्यमातून रमाई आवास घरकुल योजनेस पात्र असलेल्या प्रत्येक नागरिकांचे स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यात येणार असून, एकही पात्र नागरिक वंचित राहणार नाही, असे मत सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले आहे. 



रमाई आवास घरकुल योजनेतून घरकुल मंजूर झालेल्या 170 लाभार्थींना 50 हजार रुपयांच्या धनादेशांचे धनंजय मुंडे यांच्या हस्ते आज परळीतील जगमित्र कार्यालयात वितरण करण्यात आले. 


सन 2019-20 व 2020-21 या दोन वर्षात सविस्तर प्रकल्प अहवालानुसार 423 घरकुलांना मंजुरी देण्यात आलेली आहे. यांपैकी 170 लाभार्थींना आज झालेल्या कार्यक्रमात पहिल्या हफत्याचे वितरण करण्यात आले तर उर्वरित घरकुलांच्या पहिल्या हफत्याची रक्कमही लवकरच राज्य शासनाकडून मंजूर करण्यात येणार आहे. 


या कार्यक्रमास ना. धनंजय मुंडे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष बजरंग सोनवणे, गटनेते अजयजी मुंडे, डॉ. मधुकर आघाव, न.प. चे मुख्याधिकारी डॉ. अरविंद मुंडे यांसह आदी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार