MB NEWS-विद्युत उपकरणाची अंत्ययात्रा काढत भारतीय जनता युवा मोर्चा चे महावितरण विरोधात आंदोलन

 विद्युत उपकरणाची अंत्ययात्रा काढत भारतीय जनता युवा मोर्चा चे महावितरण विरोधात आंदोलन 



भर उन्हाळ्यात सुरू केलेले भारनियमन तात्काळ बंद करण्याची मागणी 


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) - राज्यात सुरू केलेले अघोषित भारनियमयाविरुद्ध आता भाजप आक्रमक झालेले दिसून येत आहे.भाजपा  राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे व बीड जिल्ह्याच्या खासदार डॉ.प्रीतमताई मुंडे यांच्या आदेशानुसार भारतीय जनता युवा मोर्चा च्या वतीने परळी येथील महावितरण कार्यालयावर आज विद्युत उपकरणाची अंत्ययात्रा काढत  तीव्र आंदोलन करण्यात आले.यावेळी प्रतिकात्मक बंद फॅन ची तिरडी बाजार समिती मोंढा येथून व्यापार पेठ,राणी लक्ष्मीबाई टॉवर चौक येथून महावितरण कार्यलयापर्यंत काढण्यात आली.यावेळी महावितरण च्या गलथान कारभाराविरोधात तीव्र घोषणाबाजी करण्यात आली.भर उन्हाळ्यात सुरू केलेले भारनियमन तात्काळ बंद करा अशी मागणी यावेळी करण्यात आली.



विशेष बाब म्हणजे राज्यात असलेल्या औष्णिक विद्युत केंद्रापैकी 750 मॅगाव्हेट चे प्रकल्प आहेत.या प्रकल्पामुळे होणारे राखेचे प्रदूषण व त्याचे दुष्परिणाम परळी परिसरातले नागरिक भोगत आले आहेत.असे असतानाही परळी परिसरात होणारे भारनियमन दुर्दैवी आहे.त्याच बरोवर आता अंतिम सत्राच्या परीक्षा सुरू होणार आहेत,सततचे अनियमित होणारे भारनियमन विद्यार्थ्यांचे नुकसान करणारे असून या भारनियमनाविरुद्ध आता परळी भाजप आक्रमक झालेले दिसून येत आहे.बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक म्हणजेच प्रभू वैद्यनाथाचे परळीत मंदिर आहे.येथे दर्शनासाठी देशभरातून भाविक येत असतात असे असतानाही भरनियमन करणे चुकीचे आहे असेही या आंदोलनात म्हटले आहे. 


या अनियमित भारनियमनाविरुद्ध केलेल्या आंदोलत पवन मुंडे,मोहन जोशी,अरुण पाठक, अनिस अग्रवाल,नितीन समशेट्टी,सचिन गित्ते,अश्विन मोगरकर,योगेश पांडकर,प्रशांत कराड, किशोर केंद्रे,राहुल केंद्रे,,गोविंद चौरे,सुशील हरंगुळे,दिलीप नेहरकर,नरेश पिंपळे,अनिस शेख,श्रीनिवास राऊत,श्रीपाद शिंदे,शाम गित्ते,निलेश जाधव,अनिश कुरेशी,गोविंद मुंडे,धनराज कुरील,अच्युत जोगदंड,उमेश निळे,राहुल घोबाळे,गोविंद मोहेकर,अंगद माळी, सुनील कांबळे,विजय बुंदेले, संदीप चौंडे,गजूजी राजनाळे,गोपाळ केंद्रे,सोमनाथ गित्ते आदी कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदविला.

हिंदूंचे सण,महापुरुषांची जयंती,पवित्र रमजान महिना सुरू असताना होत असलेले अनियमित भारनियमन नागरिकांच्या मनाला न पटणारे आहे.गुडी पाडव्यापासून सुरू केलेले भारनियमन महापुरुषांच्या जयंती दरम्यान ही सुरू असून हा भावना दुखवण्याचा प्रकार महावितरण कंपनी जाणीवपूर्वक करत असल्याचा आरोप भारतीय जनता युवा मोर्चा कडून करण्यात आले हे भारनियमन तात्काळ बंद न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार