MB NEWS-आरोग्य सेवा सर्वोत्कृष्ट पुरस्काराने औषधनिर्माता वर्षाताई ढगे यांचा गौरव

 आरोग्य सेवा सर्वोत्कृष्ट पुरस्काराने औषधनिर्माता वर्षाताई ढगे यांचा गौरव



अंबाजोगाई (वार्ताहर)

येथील औषधनिर्माता वर्षा भगवानराव ढगे (रा.बोधिघाट,अंबाजोगाई) यांचा "आरोग्य सेवा सर्वोत्कृष्ट पुरस्कार २०२१-२२" ने लातूर येथे मान्यवरांच्या हस्ते व प्रमुख उपस्थितीत गौरव करण्यात आला.



राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानांतर्गत लातूर शहर महानगर पालिकेच्या आरोग्य विभागामार्फत जागतिक आरोग्य दिनानिमित्त "औषधनिर्माता" या पदावरून उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल औषधनिर्माता वर्षा भगवानराव ढगे (रा.बोधिघाट) यांना "आरोग्य सेवा सर्वोत्कृष्ट पुरस्कार २०२१-२२" हा बहुमान लातूर परीमंडळाचे उपसंचालक डॉ.एकनाथराव माले यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि परीमंडळ उपायुक्त डॉ.मयुरा शिंदेकर,जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.संजयराव ढगे यांच्या हस्ते प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन लातूर येथे नुकताच प्रदान करून सन्मानित करण्यात आले.सदरील कार्यक्रमास आरोग्य विभाग महानगर पालिका लातूरचे आरोग्य अधिकारी डॉ.प्रशांत माले,शहर कार्यक्रम व्यवस्थापक डॉ.रामेश्वर कलवले,शहर लेखा व्यवस्थापक शिवकुमार तेली,वैद्यकीय अधिकारी डॉ.सुनिता कदम हे मान्यवर उपस्थित होते.कु.वर्षा या अंबाजोगाई येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते भगवानराव ढगे यांच्या कन्या आहेत.त्या सध्या लातूर शहर महानगर पालिकेतील राष्ट्रीय शहरी आरोग्य विभागात "औषधनिर्माता" या पदावर कार्यरत आहेत.कोविडच्या मागील दोन वर्षांच्या काळात त्यांनी अतिशय उत्कृष्ट कार्य करून आरोग्यसेवेचा नांवलौकिक वाढविल्याबद्दल वर्षाताई ढगे यांचा काही दिवसांपूर्वीच "कोविड योध्दा" म्हणून ही गौरव करण्यात आलेला आहे.नुकतेच आरोग्य सेवा सर्वोत्कृष्ट पुरस्कार २०२१-२२ याने त्यांना सन्मानित करण्यात आल्याबद्दल औषधनिर्माता वर्षा भगवानराव ढगे यांचे समाजातील सर्व क्षेत्रातून आणि मिञ परीवारातून अभिनंदन होत आहे.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !