युवकांचा स्तुत्य उपक्रम....

इमेज
  महेश नवमीनिमित्त माहेश्वरी मित्र परिवारातर्फे गुरुकुलातील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप परळी वैजनाथ: प्रतिनिधी.... दरवर्षीप्रमाणे या वर्षीही महेश नवमीचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला. या महोत्सवाचे औचित्य साधून श्री स्वामी श्रद्धानंद गुरुकुल येथील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप करण्यात आले. युवकांच्या या कौतुकास्पद कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा सेवा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धांत मंत्री, केदार सारडा, हर्ष भंडारी, रुपेश बंग, अथर्व कलंत्री, अनिकेत सारडा, श्याम बजाज, यश डीडवाणी, श्रीनिवास जाजू, युवराज जाजू, गोकुल भंसाली, गणेश सोनी, तेजस इनदानी, जय तोष्णीवाल, यश लोढा तसेच समस्त माहेश्वरी मित्र परिवाराचे विशेष सहकार्य लाभले. माहेश्वरी मित्र परिवारातर्फे सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहे. समाजसेवा आणि सुसंस्कारांचे हे कार्य आपण सर्वांच्या साथीने असेच पुढे सुरू ठेवूया, असा संकल्प यावेळी करण्यात आला.

MB NEWS-लग्नाची घाई फसवणूकीकडे नेई: सहा महिन्यात सहा वेळा लग्न करून फसवणारी नवरी पोलीसांच्या जाळ्यात

 लग्नाची घाई फसवणूकीकडे नेई: सहा महिन्यात सहा वेळा लग्न करून फसवणारी नवरी पोलीसांच्या जाळ्यात



औरंगाबाद : विवाह जुळणे सध्या आवघड बाब बनली आहे.मुली मिळत नसल्याने उपवर मुलांचे पालक खोलवर विचार न करता जमून आलेल्या स्थळाची घाईघाईने निवड करुन लग्न लावून मोकळे होतात.परंतु यातुन आपली मोठी फसवणूक होण्याची शक्यता आहे.खुलताबाद येथील एका तरुणाचे लग्न झाल्यानंतर तिसऱ्याच दिवशी नववधूने दागिन्यांसह एका कारमधून धूम ठोकल्याची घटना समोर आली होती. या नववधूला औरंगाबाद जिल्ह्यातील दौलताबाद पोलिसांनी अटक केली आहे.

 सहा महिन्यात सहा वेळा लग्न करून चालु होती फसवाफसवी.या फसवाफसवी करणाऱ्या मुलीला  दुसऱ्याचं एका मुलांसोबत लग्न लावताना अंमळनेर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.खुलताबाद तालुक्यातील राजेश लाटे याचा जळगाव येथील शुभांगी शिंदे हिच्याशी विवाह झाला होता. बबन म्हस्के जळगाव व आशाबाई भोरे (मुलीची मावशी) अंजनगाव सुर्जी यांच्या मध्यस्थीतून हा सोहळा झाला होता. नवरदेवांकडील नातेवाइकांनी मुलीकडील मंडळींना १ लाख ३० हजार रोख व ७० हजारांचे सोने नवरीच्या अंगावर घातले होते.

२९ मार्च नवरदेव राजेश व नववधू शुभांगी हे दौलताबाद किल्ला पाहण्यासाठी गेले. तेव्हा नवरदेव राजेश यास चकमा देऊन शुभांगी फरार झाली. याप्रकरणी दौलताबाद पोलिसात नववधू शुभांगी शिंदे सह सात जणांवर गुन्हा दाखल झाला होता. जळगाव शहरातील दोन महिला हे रॅकेट चालवतात. या दोघींनी स्वतःच्याच भाचीचे सहा महिन्यांत सहा वेळा लग्न लावले. अमळनेर येथे त्यांचे बिंग फुटले अन् मुलीला पोलिसांनी ताब्यात घेतले. हे रॅकेट चालवणारी टोळी मात्र फरार आहे. लग्नासाठी इच्छुक असलेल्या मुलांकडून पैसे सोने घेऊन फसवणूक करणाऱ्या या रॅकेटचा पोलीसांनी पर्दाफाश केला आहे. राज्यात अनेक ठिकाणी अशाप्रकारे फसवणूक केली जात आहे.

-----------------------------------------

MB NEWS बातम्या व जाहीरातीसाठी संपर्क-   महादेव शिंदे 7709500179 , प्रा.रविंद्र जोशी 9850642717.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या