MB NEWS-पाचेश रुपयांची लाच घेताना पं.स.ची महिला कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात

 पाचेश रुपयांची लाच घेताना पं.स.ची महिला कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात 



पाटोदा , आहिल्यादेवी होळकर, जलसिंचन योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या विहिरीचे सांकेतिक क्रमांक घेण्यासाठी पाटोदा पंचायत समितीतील सहायक कनिष्ठ महिलेने हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. तडतोजडअंती पाचशे रुपये स्विकारताना बीड एसीबीने सोमवारी (दि.11) रंगेहाथ पकडले. या कारवाईने खळबळ उडाली आहे. 


श्रीमती मिरा विलास नागरगोजे (वय 39) या पाटोदा पंचायत समितीमध्ये कनिष्ठ सहायक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी तक्रारदाराकडे  त्यांच्या वडीलांच्या नावावरील आहिल्यादेवी होळकर, जलसिंचन योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या विहिरीचे सांकेतिक क्रमांक घेण्यासाठी एक हजार रुपये लाचेची मागणी केली. तडजोडअंती पाचशे रुपये लाच स्विकारताना नागरगोजे यांना रंगेहाथ पकडले. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक डॉ.राहुल खाडे, अप्पर पोलीस अधीक्षक विशाल खांबे, बीड उपअधीक्षक शंकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमोल धस, पोलीस अंमलदार श्रीराम गिराम, हनुमान गोरे, भरत गारदे, चालक गणेश म्हेत्रे यांनी केली आहे. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !