पोस्ट्स

एमबी न्युज लेबलसह पोस्ट दाखवत आहे

MB NEWS-मुख्यमंत्री झालेल्या एकनाथ शिंदेंची शिवसेना पक्षनेते पदावरून हकालपट्टी

इमेज
  मुख्यमंत्री झालेल्या एकनाथ शिंदेंची शिवसेना पक्षनेते पदावरून हकालपट्टी मुंबई: पक्षाविरोधात बंड करून भारतीय जनता पक्षाच्या पाठिंब्यानं मुख्यमंत्री झालेल्या एकनाथ शिंदेंविरोधात पक्षानं मोठी कारवाई केली आहे. एकनाथ शिंदे यांची पक्षनेतेपदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. शिंदे यांनी पक्षाविरोधात बंड केलं. शिवसेनेचे ३९ आमदार त्यांच्यासोबत आहेत. यानंतर शिंदे गटानं पक्षावरच दावा सांगितला. त्यामुळे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी शिंदे यांच्याविरोधात मोठी कारवाई केली आहे. पक्षविरोधी कारवाई केल्याचा उल्लेख शिवसेनेनं शिंदेंना पाठवण्यात आलेल्या पत्रात केला आहे.      काँग्रेस, राष्ट्रवादीसोबतचं सरकार नको, भाजपसोबत चला अशी भूमिका घेत शिंदेंनी बंडखोरी केली. त्यांच्या बंडाला शिवसेनेच्या ३९ आमदारांनी साथ दिली. १० अपक्ष आमदारदेखील त्यांच्या पाठिशी उभे राहिले. शिंदे गट सरकारमधून बाहेर पडल्यानं महाविकास आघाडी सरकार कोसळलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना राजीनामा द्यावा लागला. आपल्याच माणसांनी विश्वासघात केल्यानं ही वेळ आल्याचं ठाकरे राजीनामा देताना म्हणाले. एकनाथ शिंदेंनी काल भाजपच्या पाठिंब्यानं मुख्यमंत्रिपदाची

MB NEWS-थकीत निधी नगर - बीड - परळी रेल्वे प्रकल्पासाठी ठरू शकतो अडसर

इमेज
  अडीच वर्षाच्या काळात महाविकास आघाडी सरकारने पाचशे ब्यानव कोटींचा निधी थकवला थकीत निधी नगर - बीड - परळी रेल्वे प्रकल्पासाठी ठरू शकतो अडसर खा.प्रितमताई मुंडे यांनी घेतलेल्या बैठकीत रेल्वे विभागाचा खुलासा बीड । दि. ०१ । केंद्र आणि राज्य सरकारच्या समान भागीदारीने होत असलेल्या नगर-बीड-परळी रेल्वे प्रकल्पाच्या संथ गतीला नुकतेच सत्तेतून पायउतार झालेले महाविकास आघाडी सरकार जवाबदार असल्याचे वास्तव समोर आले आहे.राज्यातील महाविकास आघाडी सरकारने सत्तेच्या कार्यकाळात रेल्वे प्रकल्पाचा पाचशे ब्यानव कोटी रुपयांचा निधी थकवला आहे.तत्कालीन सरकारच्या उदासीनतेमुळे या प्रकल्पाच्या कामात मोठी खीळ बसली आहे, हा थकीत निधी प्रकल्पाच्या प्रगतीमध्ये अडसर ठरू शकतो. क्लिक करा:  *हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे; धृतराष्ट्र नाही : हा शिवसेनेचा मुख्यमंत्री नव्हे - उद्धव ठाकरे बीडच्या खासदार डॉ.प्रितमताई मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या रेल्वे , जिल्हा प्रशासन आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या बैठकीत जिल्ह्यातील विविध विकास कामे आणि प्रस्तावित कामांचा त्यांनी आढावा घेतला. रेल्वे प्रकल्पासाठी सुरू असलेल्या अतिरि

MB NEWS-विरोधी पक्षनेते पदासाठी धनंजय मुंडे यांच्या नावाची चर्चा

इमेज
  विरोधी पक्षनेते पदासाठी धनंजय मुंडे यांच्या नावाची चर्चा  मुंबई : मुख्यमंत्रीपद भूषविलेल्या शिवसेनेकडे पुरेसे संख्याबळ नसल्यामुळे विधानसभा विरोधी पक्षनेते पदासाठी राष्ट्रवादीकडून जेष्ठ नेते अजित पवार, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि धनंजय मुंडे यांच्या नावांची चर्चा सुरु झाली आहे.       क्लिक करा:  *हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे; धृतराष्ट्र नाही : हा शिवसेनेचा मुख्यमंत्री नव्हे - उद्धव ठाकरे  शिवसेनेत बंडखोरी झाल्यामुळे आता या पक्षाकडे केवळ १६ आमदार उरले आहेत. 'शिंदेशाही' सुरू झाल्यानंतर यातील काही आमदार या गटाच्या गळाला लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे संख्याबळ नसतानाही विधान परिषदमध्ये विरोधी पक्षनेते पद देण्याची पद्धत विधानसभेमध्ये अंगीकारली जाणार नाही. विधानसभेत सर्वाधिक आमदार असलेला भाजप आता सत्तेत गेला असल्यामुळे विरोधकांमध्ये आमदारांची संख्या असलेल्या विधानसभा विरोधी पक्षनेते पद मिळणार आहे. क्लिक करा:  'त्या' व्हिडिओ ची वास्तविकता आली समोर राज्यातील इतर पक्षांच्या तुलनेत राष्ट्रवादीकडे सर्वाधिक अनुभवी नेते आहेत. तगडा अभ्यास आणि प्रशासनाकडून कामे क

MB NEWS-'त्या' व्हायरल व्हिडिओ ची वास्तविकता आली समोर: हा तर खोडसाळपणा - धनंजय मुंडेंची पोस्ट

इमेज
  'त्या' व्हायरल व्हिडिओ ची वास्तविकता आली समोर: हा तर खोडसाळपणा - धनंजय मुंडेंची पोस्ट    मुंबई......       राज्याचे माजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांच्या कार्यालयात फाईलचा ढिग पडल्या बाबतचा एक व्हिडिओ कोणीतरी व्हायरल केला.याबाबत धनंजय मुंडे यांनी फेसबुक पोस्ट करीत वास्तविकता सांगितली आहे. क्लिक करा:  *हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे; धृतराष्ट्र नाही : हा शिवसेनेचा मुख्यमंत्री नव्हे - उद्धव ठाकरे*        आपल्या फेसबुक पोस्ट मध्ये धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे की,"सामान्य प्रशासन विभागाने सूचित केल्याप्रमाणे पूर्वीच्या मंत्री कार्यालयातील सर्व नस्त्या जमा करून उर्वरित रद्दी नष्ट करून कार्यालय रिकामे करून देण्याचा प्रघात आहे. कार्यालयीन कर्मचारी रद्दी नष्ट करण्यासाठी संकलन करत असताना कुणीतरी खोडसाळपणाने एक व्हीडिओ करून समाजमाध्यमांवर व्हायरल केल्याचे समजले. चुकीच्या पद्धतीने मांडणी करून पसरवल्या जात असलेल्या त्या व्हीडिओवर कृपया दुर्लक्ष करावे व प्रसिद्धी देऊ नये, ही नम्र विनंती." 🔵  हे देखील वाचा पहा  क्लिक करा: *एकनाथ शिंदेची देवेंद्र फडणवीसांवर स

MB NEWS-नौकरीची संधी:AXIS BANK ३५००० पदांसाठी भरती

इमेज
नौकरीची संधी:AXIS BANK ३५००० पदांसाठी भरती www.axixbank.co.in AXIS BANK पदे आणि रिक्त जागा : एकूण पदांची संख्या: 35000+ पदाचे नाव : असिस्टंट मॅनेजर, क्लर्क, फील्ड ऑफिसर, पीओ, रिटेलर, सिंगल विंडो क्लर्क,                       :पात्रता निकष :   वय मर्यादा : अर्ज भरण्याच्या पहिल्या दिवशी उमेदवाराचे वय १८ ते ४२ वर्षांच्या दरम्यान असावे. SC/ST आणि OBC उमेदवारांसाठी 3 वर्षे वयाची सूट 5 वर्षे लागू आहे.   शैक्षणिक पात्रता : उमेदवार अधिसूचना आणि विशिष्ट पदानुसार उत्तीर्ण झाले पाहिजेत. उमेदवार किमान मॅट्रिक ( 10वी), पदवी किंवा केंद्र किंवा राज्य सरकारद्वारे मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून समतुल्य परीक्षा उत्तीर्ण.   वेतनमान : रु. 27400-104600/- प्रति महिना   निवड प्रक्रिया - फक्त मुलाखत   अर्ज फी : सर्व उमेदवारांसाठी मोफत   अर्ज कसा करावा : पात्र उमेदवार अधिकृत अधिसूचनेमध्ये दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार 07 जून 2022 रोजी पर्यंत किंवा त्यापूर्वी अधिकृत वेबसाइट  www.axixbank.co.in  वर ऑनलाइन अर्ज करू शकतात. यशस्वीरित्या सबमिशन केल्यानंतर कृपया अर्जाची प्रिंटआउट घ्या किंवा तुम

MB NEWS-धनंजय मुंडेंच्या संकल्पनेतून परळीत तीन दिवसीय 'भीम महोत्सवाचे आयोजन

इमेज
आज 75 कलाकारांचा चमू असलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाचा उदय साटम यांचा भीमगीतांचा 'वंदन भीमराया' कार्यक्रम  परळी (दि. 14) - सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून परळी येथे तीन दिवसीय 'भीम महोत्सवाचे' आयोजन करण्यात आले असून शुक्रवारी (दि. 15) सायंकाळी 7 वा. प्रख्यात गायक उदय साटम यांचा भीमगीतांचा 'वंदन भीमराया' हा कार्यक्रम शहरातील मोंढा मैदान येथे होणार आहे.  आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजलेला उदय साटम यांचा 75 कलाकारांचा चमू व त्यातून साकारण्यात येणारी भीम वंदना म्हणजे अलौकिक कार्यक्रम असून या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन महोत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.  या तीन दिवसीय महोत्सवांतर्गत दि. 15 एप्रिल रोजी सायंकाळी 7 वा. कलारंजना मुंबई, निर्मित व उदय साटम दिग्दर्शित 75 कलाकारांचा समावेश असलेला वंदन भीमराया हा कार्यक्रम होईल. दि. 16 एप्रिल रोजी प्रसिद्ध गायक आदर्श शिंदे यांचा लाईव्ह भीम गीतांचा जंगी कार्यक्रम होईल व अखेरच्या दिवशी 17 एप्रिल रोजी प्रा. प्रकाशकुमार वाघमारे प्रस्तुत 'भीमा तुझ्या जन्मामुळे' या प्रसिद्ध नाटकाचा प्रयोग होईल. ह