पोस्ट्स

जून २, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

बहीणीला चांगले नांदवा म्हणुन सांगावयास गेलेल्या बहिणीचा विनयभंग

इमेज
  बहीणीला चांगले नांदवा म्हणुन सांगावयास गेलेल्या बहिणीचा विनयभंग  परळी (प्रतिनिधी)  आपल्या बहीणीस चांगले नांदवा,मारहाण करु नका असे सांगण्यासाठी अहमदपुर तालुक्यातुन परळीत आलेल्या आई व मुलीला मारहाण करत मुलीचा विनयभंग केल्याची घटना परळी शहरातील बसवेश्वर कॉलनी परिसरात घडली असुन याबाबत परळी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  परळी येथील विवाहीतेस सासरच्या मंडळीकडुन त्रास होत असल्याने अहमदपुर तालुक्यातील तिची बहीण व आई सासरच्या मंडळींना समजावुन सांगण्यासाठी दि.27 मे रोजी परळी येथे आल्या.माझ्या बहीणीला मारहाण करु नका,चांगले नांदवा असे म्हणताच आरोपी अजिज महेबुब सय्यद,सुलतानाबाबु सफियोद्दीन शेख,सीमरन इरफान शेख व अन्य एका महिलेने फिर्यादीची बहिण व आईला मारहाण केली.हे भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या फिर्यादीस बॅटने मारहाण करत विनयभंग करुन जीवे मारण्याची धमकी दिली.याप्रकरणी वरील आरोपींविरुध्द परळी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास पोह येलमटे हे करत आहेत

असे करा पिकाचे नियोजन

इमेज
असे करा पिकाचे नियोजन        बीड, दि. 6 (जि. मा. का.) :सध्या जिल्ह्यात सर्व दूर पेरणीला लायक पाऊस झालेला नाही. त्यामुळे शेतकरी वर्गाने पेरणीची घाई करू नये. साधारणतः 75 ते 100 मिलिमीटर पाऊस झाल व जमिनीत साधारणतः सहा इंच ओल झाली त्यानंतर पेरणी करावी.पेरणी करण्यापूर्वी घरच्या घरी बियाण्याची उगवण क्षमता तपासून घ्यावी. रासायनिक खतांचा अति वापरा अयोग्य वापर जमिनीच्या आरोग्यासाठी चांगला नसतो. तेव्हा रासायनिक खते वापर करण्यापूर्वी जमिनीत पुरेशा प्रमाणात सेंद्रिय खतांचा वापर करावा. रासायनिक खतांचा बेसल डोस ठरविताना माती परीक्षण अहवाल अथवा गावचा जमीन सुपिकता निर्देशांक याचा वापर करून तो डोस पेरणी वेळी द्यावा. रासायनिक खतांची बचत होण्यासाठी बियाणास जैविक खतांची वीज प्रक्रिया करावी. आपल्या गावचे कृषी सहाय्यक यांना संपर्क करून आपण बियाणे उगवण बीज प्रक्रिया आदींचे प्रत्याक्षिक  देखील करू शकता, असे आवाहन जिल्हा अधिक्षक, कृषी अधिकारी  यांनी केले आहे.                                                         ******

शंकी गोगलगाय नियंत्रणासाठी उपयोजना

इमेज
शंकी गोगलगाय नियंत्रणासाठी उपयोजना            बीड, दि. 6 (जि. मा. का.)   बीड जिल्ह्यात मागील तीन वर्षापासून सोयाबीन कापूस भाजीपाला आदी पिकांवर शंकी गोगलगायीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. सोयाबीन पिकांमध्ये रोप अवस्थेतच गोगलगायींचा प्रादुर्भाव होत असल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते. या गोगलगायींना वेळीच ओळखून खालील प्रमाणे उपाययोजना करणे गरजेचे आहे जेणेकरून पुढील नुकसान टाळता येईल.       शंखी गोगलगाय किडीची ओळख:- शंकीच्या पाठीवर एक ते दीड इंच लांबीचे गोलाकार कवच असते. बहुतांशी शंकी गर्द, करड्या, फिकट किंवा हिरव्या काळपट रंगाच्या असतात. ही कीड रात्रीच्या वेळेस आक्रमक होऊन पाने  खाऊन छिद्र पाडते  तसेच नवीन रोपे, कोबं, भाजीपालावर्गी पिके, फळे, फुले तसेच इतर सर्व प्रकारच्या पिकांचे अवशेष यावरी उपजिका करते.      प्रतिबंधात्मक उपायोजना:- शेतकऱ्यांनी ८० ते १०० मी.मी. पाऊस पडल्यानंतरच पेरणी करावी. जमिनीचे खोल नांगरट करावी, बांधाच्या कडेला चर खोदावे, शेताचे बांध स्वच्छ ठेवावेत जेणेकरून गोगलगायना लपण्यास व अंडी घालण्यापासून रोखता येते. रबरी हात मोजे घालून प्रादुर्भावीत शेतातील शंकी गोगलगायी

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना

इमेज
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत बाबींची पूर्तता करण्यासाठी गावपातळीवर विशेष मोहिम            बीड, दि. 6 (जि. मा. का.) शेतक-यांना निश्चित उत्पन्न मिळण्याकरीता केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM KISAN) योजना सुरु केली आहे. या योजने अंतर्गत सरसकट सर्व पात्र शेतकरी कुटुंबास (पती, पत्नी व त्यांची 18 वर्षाखालील अपत्ये) रु. 2000/- प्रती हप्ता या प्रमाणे तीन समान हप्त्यात प्रती वर्षी रू. 6000/- लाभ अदा करण्यात आला आहे.        लागवडीलायक क्षेत्रधारक, बँक खाती आधार संलग्न व योजनेचे eKYC केलेले शेतकरी कुटुंब पी. एम. किसान योजनेच्या लाभासाठी पात्र आहेत. या योजनेच्या लाभासाठी बंधनकारक असलेल्या या तिन्ही बाबींची पूर्तता राज्यातील 90.20 लाख लाभार्थ्यांनी केलेली आहे. केंद्र शासनाच्या निर्देशानुसार दिनांक 05 जून, 2024 ते 15 जून, 2024 या कालावधीत या बंधनकारक बाबींची उर्वरित लाभार्थींनी पूर्तता करण्यासाठी गावपातळीवर विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे.       या मोहिमेमध्ये लाभार्थींची स्वयं नोंदणी व e-KYC साठी राज्यातील सर्व सामाईक सुविधा केंद्र (CSC) तर आधार संलग्न बँक खाती उघडण्

खते, बियाणे,औषधी संबंधित काही अडचणी आल्यास संपर्क साधण्याचे आवाहन

इमेज
खते, बियाणे,औषधी संबंधित काही अडचणी आल्यास संपर्क साधण्याचे आवाहन बीड, दि. 6 (जि. मा. का.) :- सध्या खरीप 2024 हंगाम सुरू झालेला आहे. या हंगामात शेतकरी मोठ्या प्रमाणात बियाणे खते व नंतर औषधे खरेदी करत असतात त्यांना उत्तम दर्जाचे खते बियाणे व औषध उपलब्ध व्हावे, योग्यरीत्या किमतीत उपलब्ध व्हावे या उद्देशाने राज्यात गुणवत्ता नियंत्रण विभाग कार्यरत आहे. या विभागाची कार्य कक्षा तालुकास्तरावर पंचायत समितीचे कृषी अधिकारी तथा निरीक्षक व तालुका कृषी अधिकारी तथा निरीक्षक यांच्यापर्यंत आहे       खरीप हंगामात या दोन्ही कार्यालयात तसेच जिल्हास्तरावर जिल्हा परिषद व जिल्हाध्यक्ष कृषी अधिकारी कार्यालय येथे नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे. यांची वेळ सकाळी 9.30 ते सायंकाळी 7.30 पर्यंत अशी आहे. याशिवाय तालुका स्तरावर तालुका कृषी अधिकारी व कृषी अधिकारी पंचायत समिती यांची भरारी पथके कार्यरत आहे.        जिल्हास्तरावर कृषी विकास अधिकारी व जिल्हा गुणवत्ता निरिक्षक यांचे भरारी पथक कार्यरत आहे. याशिवाय राज्यस्तरावरील कक्षाचे व टोल फ्री क्रमांक उपलब्ध करून देण्यात आले आहेत तसेच कृषी उपसंचालक, उपविभागाची कृ

पंकजा मुंडे यांनी केली आभार दौऱ्याची घोषणा: संपूर्ण बीड जिल्ह्यात करणार आभार दौरा

इमेज
  पंकजा मुंडे यांनी केली आभार दौऱ्याची घोषणा: संपूर्ण बीड जिल्ह्यात करणार आभार दौरा  परळी वैजनाथ, एमबी न्युज वृत्तसेवा...      नुकत्याच झालेल्या बीड लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत निसटत्या पराभवाला सामोरे जावे लागलेल्या भाजपा महायुतीच्या उमेदवार भाजप राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी पराभवानंतरही कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी आणि खंबीरपणा दाखवला आहे. यातच आता पंकजा मुंडे यांनी संपूर्ण बीड जिल्ह्यात आपण लवकरच आभार दौरा करणार असल्याचे जाहीर केले आहे.         संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या बीड लोकसभा मतदारसंघाची निवडणूक अतिशय अटीतटीची आणि बीड जिल्ह्याच्या राजकारणाचे वेगळ्या अर्थाने ध्रुवीकरण करणारी निवडणूक झाली. अशा विपरीत आणि कठीण परिस्थितीत झालेल्या निवडणुकीत पंकजा मुंडे यांनी शेवटपर्यंत लढा दिल्याचे निकालानंतर दिसून आले. या  पराभवानंतर स्वस्थ न बसता बीड जिल्ह्यातील जनतेने  भरभरून प्रेम आणि सन्मान मतांच्या माध्यमातून आपल्याला दिला. याचे सदैव ऋण आपल्यावर असणारच आहे असे म्हणत लवकरच आपण संपूर्ण बीड जिल्ह्याचा आभार दौरा करणार असल्याचे पंकजा मुंडे यांनी सांगितले आहे. येत्या 12 जून किंवा 15

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

इमेज
पंकजा मुंडेंबद्दल फेसबुकवर अक्षेपार्ह पोस्ट: परळीत पोलिसांनी एकाला केली अटक परळी वैजनाथ, प्रतिनिधी...        भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सचिव व बीड लोकसभा मतदारसंघातील भाजपा महायुतीच्या अधिकृत उमेदवार असलेल्या पंकजा मुंडे यांच्या बद्दल निवडणूक निकालानंतर अतिशय आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी परळीतील एका युवकाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यास पोलिसांनी अटक केली आहे.         याबाबत पोलिस सूत्रांकडून प्राप्त अधिक माहितीनुसार  परळी शहरातील गणेशपार भागात राहणारा गणेश हरिभाऊ सावंत या युवकाने फेसबुकवर निवडणूक निकालानंतर आक्षेपार्ह पोस्ट केली. आरोपीने फेसबुकवर काही कार्यकर्ते नाचत असलेला एक व्हिडिओ टाकून त्या व्हिडिओखाली पंकजा मुंडे यांच्या बद्दल आक्षेपार्ह वाक्य लिहून ही पोस्ट व्हायरल केली.यावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. याबाबत पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी सखोल चौकशी करत या युवकावर गुन्हा दाखल करून तात्काळ ताब्यात घेतले.            याप्रकरणी आरोपीविरुद्ध पोलीस कर्मचारी विष्णू उद्धवराव फड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सामाजिक सलोखा बिघडवला व दोन समाजात तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने

अंगावर रॉकेल टाकुन पेटवून दिले ; गुन्हा दाखल

इमेज
  अंगावर रॉकेल टाकुन पेटवून दिले ; गुन्हा दाखल परळी वैजनाथ, प्रतिनिधी....       अंगावर रॉकेल टाकुन पेटवून दिले व जाळून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी परळी वैजनाथ येथील संभाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.        याबाबत पोलीस सुत्रांकडून प्राप्त अधिक माहितीनुसार, धनगर गल्ली गणेश पार परळी वै. येथील रहिवाशी विवाहितेस नवरा व सासूने सातत्याने तीन महिन्यांपासून शारिरीक व मानसिक त्रास दिला.दि. 1 जुन रोजी रात्री 10.20 वा. पिडितेला जिवे मारण्याचा उद्देशाने अंगावर रॉकेल टाकुन काडीने पेटवुन दिले.यात पिडिता जखमी झाली.तिला अंबाजोगाई येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.या पिडितेने जवाब नोंदवून फिर्याद दिली.याप्रकरणी पिडीत महिला जयश्री गणेश फुके वय 20 वर्षे यांच्या फिर्यादीवरून गणेश जगन्नाथ फुके (नवरा)व वंदना जगन्नाथ फुके (सासु) यांच्याविरुद्ध संभाजीनगर पोलीस ठाण्यात गुरनं 91/2024 कलम 307,498 अ,323,34 भा.द.वी. प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस करीत आहेत.

प्रियसीसोबत भांडण; प्रियकराला पाजले विष: आठ जणांविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल

इमेज
प्रियसीसोबत भांडण; प्रियकराला पाजले विष: आठ जणांविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....      एका महिलेशी असलेल्या प्रेमसंबंधाच्या प्रकरणातून जीवानिशी जाण्याचा प्रकार समोर आला आहे. अगोदर प्रियसीसोबत भांडण झाले. त्यात प्रेमसंबंध ताणले गेले. त्यानंतर धर्मापुरी फाट्यावरील एका आखाड्यावर बोलावून या प्रियकराला मारहाण केली व विष पाजले यात त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात आठ जणांविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.       याबाबत पोलीस सुत्रांकडून प्राप्त अधिक माहितीनुसार, धर्मापुरी फाट्यावर एका अखाड्यावर मयत मारोती भरत चौधरी वय 32 वर्ष रा कारबेटवाडी ता. सोनपेठ जि. परभणी यास बोलावून घेऊन त्याचे प्रेमसंबध असलेल्या महिलेशी झालेल्या भांडणाच्या कारणावरुन यातील आरोपींतांनी गैरकायद्याची मंडळी जमवुन मारहाण केली.तसेच हिरव्या पांढऱ्या रंगाचे स्टिकर असलेली जर्मन धातुची PROFEX super असा उल्लेख असलेल्या किटकनाशकाच्या बाटलीतील विषारी औषध जिवे मारण्याच्या उदेशाने पाजले.         त्याच्यावर अंबाजोगाई येथील रुग्णालयात उपचार सुरु असतांना त्याचा मृत्यू झाला आहे.याप्र

अज्ञातांचा खोडसाळपणा: अंधारात रस्त्यावरील वाहनाची तोडफोड

इमेज
अज्ञातांचा खोडसाळपणा: अंधारात रस्त्यावरील वाहनाची तोडफोड परळी वैजनाथ, प्रतिनिधी......        कोणीतरी अज्ञात व्यक्तींनी अंधाराचा गैरफायदा उठवत खडसाळपणाचे कृत्य करून परळी शहरातील गणेश पार रोडवर रस्त्यावर लावलेल्या वाहनांची किरकोळ तोडफोड केल्याची घटना घडली.     गणेशपार रोड, श्री संत सावतामाळीनगर, कृष्णा नगर भागात घरा समोरील रस्त्यावर लावलेल्या ९ चारचाकी वाहनांची अज्ञात व्यक्तींनी तोडफोड केली. ही घटना चार जून रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास घडली. मंगळवारी रात्री साडे दहाच्या सुमारास पाऊस झाला. यावेळी वीज गेल्याने रस्त्यावर अंधार होता. या अंधाराचा फायदा घेत अज्ञात व्यक्तींनी गणेशपार रोडवर लावण्यात आलेली कार, ऑटो रिक्षा या वाहनांच्या काचा फोडून नुकसान केले. तसेच संत सावता माळीनगर, कृष्णा नगर भागात देखील कारची तोडफोड केली. याप्रकरणी बुधवारी परळी शहर पोलीस ठाण्यात व संभाजीनगर पोलीस ठाण्यात कारचालक सतीश सानप, प्रकाश वर्मा ,नवनाथ चव्हाण यांनी तक्रार  केली आहे. दरम्यान, बुधवारी सायंकाळी सपोनी शिंदे आणि इतर पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली.

"अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवू मशाली...!' धनंजय मुंडे यांची निकालानंतर सूचक प्रतिक्रिया

इमेज
  "अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवू मशाली...!'  धनंजय मुंडे यांची  सूचक प्रतिक्रिया         बीड लोकसभा मतदार संघात भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार पंकजा मुंडे यांना पराभव स्विकारावा लागला. या पराभवानंतर मंत्री धनंजय मुंडे यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया देऊन सूचक आवाहन केले आहे.       धनंजय मुंडे यांनी सोशल मीडियातून पोस्ट केली असुन एका विजयाने हुरळून किंवा एका पराभवाने नाउमेद व्हायचे नसते असे म्हणत उष:काल होता होता, काळरात्र झाली; अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवू मशाली!" असे म्हटले आहे. काय आहे धनंजय मुंडे यांची फेसबुक पोस्ट? "राज्यात महायुतीच्या उमेदवारांना महाराष्ट्रातील जनतेने दिलेल्या मतदानरुपी आशीर्वादाबद्दल सर्व जनतेचे आभार.बीडमध्ये आमचा निसटता पराभव झाला, तो मान्य! जनतेने दिलेला कौल स्वीकारून पुढे जाऊ. स्व.गोपीनाथराव मुंडे साहेब व स्व.पंडित अण्णा यांनी आम्हाला जनसेवेचे बाळकडू दिलेले आहे. जय-पराजय होत राहतील, बीड जिल्ह्याच्या विकासासाठी आम्ही कायम तत्पर आहोत व पुढेही राहू," असे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे. तर "पंकजाताईच्या या लढाईत 6 लाख 77 हजारपेक्षा अधिक म

अखेर बीडमध्ये 'तुतारी' वाजली; बजरंग सोनवणे यांचा विजय

इमेज
  अखेर बीडमध्ये 'तुतारी' वाजली; बजरंग सोनवणे यांचा विजय   बीड लोकसभा मतदारसंघात भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे  यांना पराभूत करून बजरंग सोनवणे यांनी बाजी मारली आहे. बीडच्या निकालाने शेवटपर्यंत सस्पेन्स कायम ठेवला. कधी पंकजा मुंडे आघाडीवर जात होत्या, तर कधी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे बजरंग सोनवणे  पुढे जात होते. अखेर शेवटच्या ३२ व्या फेरीत बजरंग सोनवणे यांनी बाजी मारली.              २४ व्या फेरी अखेर भाजपाच्या पंकजा मुंडे यांना ३० हजार ४६१ मतांची आघाडी होती. मात्र, २५ व्या फेरीपासून ही लिड घटू लागली. २५ व्या अखेर २२ हजार ५००, २६ वी फेरी १० हजार २७६ , २७ वी फेरी ७ हजार ४२८ अशी आघाडी कमी होत गेली. तर २८ व्या फेरीत बजरंग सोनवणे यांनी ९३२ मतांची आघाडी घेतली.  त्यानंतर २९ व्या फेरीत १ हजार २१७, ३० वी फेरी २ हजार ६०२ मतांची आघाडी घेतली. मात्र, ३१ व्या फेरीत पुन्हा पारडे फिरले अन् पंकजा मुंडे ४०० मतांनी पुढे आल्या. शेवटपर्यंत हा सस्पेन्स कायमच होता अखेर 32 व्या फेरीनंतर शरद पवार गटाचे बजरंग सोनवणे 6585 मतांनी विजयी झाले आहेत.

बी एण्ड सी च्या हलगर्जीने गेला बळी !

इमेज
गतिरोधकाचा अंदाज न आल्याने ऑटो पलटला: कामगार महिलेचा मृत्यू परळी वैजनाथ, प्रतिनिधी...   गतिरोधकाचा अंदाज न आल्याने एक ऑटो पलटला व आपघात घडला.या आपघातातील प्रवाशी कामगार महिलेचा मृत्यू झाला आहे.या रस्त्यावर गतिरोधकांवर  पारा लावण्यात आलेला नाही.त्यामुळे अंधारात वाहनधारकांना गतिरोधकांचा अंदाज येत नाही. यातूनच हा आपघात घडला असुन यात महिलेचा जीव गमावला आहे.       परळीतील वैद्यनाथ कॉलेज समोरील रस्त्यावर असलेल्या गतिरोधकाचा अंदाज न आल्याने अंबाजोगाई कडे जाणारा ऑटो पलटी होऊन अपघात झाला.यामध्ये अलका काकासाहेब सूर्यवंशी (वय 40) रा.अंबाजोगाई या महिलेचा मृत्यू झाला. अपघातानंतर परळी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले होते. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.ही महिला परळीत एका कपड्याच्या दुकानात कामाला होती. रात्री 10.30 वा. च्या सुमारास अपघात झाला.या गतिरोधकामुळे याआधी अनेक अपघातात लोकांना गंभीर दुखापत झालेल्या असून आता तर या महिलेला आपला जीव गमवावा लागला आहे.

मतमोजणीच्या ठिकाणी अँड्रॉइड मोबाईल घडी वापरण्यास बंदी

इमेज
  मतमोजणीच्या ठिकाणी अँड्रॉइड मोबाईल घडी वापरण्यास बंदी बीड, दि.2:( जिमाका ) सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीची मतमोजणी मंगळवारी दिनांक 4 जून होणार आहे. 39 बीड लोकसभा मतदारसंघाची  मतमोजणी  नाथापूर रोड शासकीय तंत्रनिकेतन येथे आहे. मतमोजणीच्या ठिकाणी अँड्रॉइड मोबाईल घडी वापरण्यास बंदी असणार असल्याचे सक्त निर्देश जिल्हा प्रशासनाकडून जारी करण्यात आले आहेत. मंगळवारी होणाऱ्या मतमोजणीच्या वेळी मतमोजणी अधिकारी-  कर्मचारी, सुपरवायझर, सहाय्यक, सूक्ष्म निरीक्षक, शिपाई, उमेदवारांचे नेमलेले प्रतिनिधी तसेच माध्यम प्रतिनिधींना मतमोजणीच्या ठिकाणी मोबाईल नेण्याची मनाई आहेच   यासह  अँड्रॉइड मोबाईल घड्याळ मोबाईलच्या पद्धतीने चालविली जाते असे कुठल्याही तांत्रिक उपकरणे  सोबत ठेवण्याची ही बंदी असेल. अशा प्रकारच्या तांत्रिक वस्तू मतमोजणीच्या ठिकाणी वापरण्यात आल्यास प्रशासन त्यांच्यावर कडक कारवाई करेल असे निर्देश जिल्हा प्रशासनाकडून जारी करण्यात आलेले आहेत. तरी मतमोजणी यावेळी उपस्थित अधिकारी कर्मचारी सुपरवायझर सहाय्यक सूक्ष्मनिरीक्षक शिपाई उमेदवारांचे प्रतिनिधी माध्यम प्रतिनिधी या सर्वांना मोबाईल अँड्रॉइड घडी तसे

जितना कठीण संघर्ष होगा, जित उतनीही शानदार होगी - लोकसभेच्या निकालावर केलं भाष्य

इमेज
लोकनेत्याचा स्मृतीदिन ; पंकजाताई मुंडे, खा. डॉ.प्रीतमताई मुंडे कुटुंबियांसह गोपीनाथ गडावर नतमस्तक मुंडे साहेबांच्या विचारांचा वारसा आणि वंचितांच्या सेवेचा वसा कधीही खाली ठेवणार नाही - पंकजाताई मुंडे जितना कठीण संघर्ष होगा, जित उतनीही शानदार होगी - लोकसभेच्या निकालावर केलं भाष्य अभिवादनासाठी गोपीनाथ गडावर लोटली अलोट गर्दी परळी वैजनाथ।दिनांक ०३। लोकनेते मुंडे साहेब आपल्यातून जावून आज दहा वर्ष झाली. आपण सर्व हे दुःख हृदयात साठवून त्यांच्या संस्कारांवर वागलो. साहेबांनी आपलं संपूर्ण आयुष्य वंचित, उपेक्षित व पंडितांच्या सेवेसाठी खर्च केलं, आयुष्यभर त्यांनी सर्व सामान्यांसाठी जो संघर्ष केला, जे कष्ट घेतले त्यामुळे ते आपल्या सर्वांच्या कायम लक्षात राहिले. आज त्यांच्या समाधीसमोर मी तुम्हाला वचन देते, मी कधी थकणार नाही, रूकणार नाही, कुणासमोर कधी झुकणार नाही. उतणार नाही, मातणार नाही त्यांच्या विचारांचा वारसा आणि वंचितांच्या सेवेचा वसा कधी टाकणार नाही अशा शब्दांत भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी आज गोपीनाथ गडावर आपल्या भावना व्यक्त केल्या.    लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या दहाव्या

मतमोजणी निरीक्षक बसवराज आर सोमन्ना

इमेज
  मतमोजणी निरीक्षकांनी केली स्ट्रॉंग रूमची पाहणी बीड, दि.2 :(जिमाका): नाथापूर रोडवरील शासकीय तंत्रनिकेतन येथे असणाऱ्या स्ट्रॉंग रूमची मतमोजणी निरीक्षक बसवराज आर सोमन्ना यांनी जिल्हा निवडणूक अधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांच्यासह पाहणी केली. मंगळवार दिनांक 4 जून रोजी सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीची मतमोजणी होणार असून 39 बीड लोकसभा मतदार संघाचे स्ट्रॉंग रूम शासकीय तंत्रनिकेतन येथे असून या ठिकाणी करण्यात आलेली व्यवस्थेची प्रत्यक्ष पाहणी मतमोजणी निरीक्षक बसवराज आर सोमन्ना यांनी जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्यासह केली. या ठिकाणी तयार करण्यात आलेले केज, बीड, माजलगाव, परळी, गेवराई, आष्टी सहा विधानसभा मतदार क्षेत्रातील स्ट्रॉंग रूम आणि मतमोजणी कक्षात मतमोजणीसाठी लावण्यात आलेली व्यवस्थेची पाहणी केली. मतमोजणीच्या वेळी या कक्षात सहाय्यक निवडणूक अधिकारी, सुपरवायझर, सहाय्यक सूक्ष्म निरीक्षक, शिपाई, उमेदवारांचे प्रतिनिधी उपस्थित राहतील. या ठिकाणी टपाली मतदानाची ही मतमोजणी होणार असून यासाठी स्वतंत्र कक्ष राहणार आहे. टपाली मतदानाअंतर्गत 80 वर्षापेक्षा अधिक आणि दिव्यांगाचे झालेले गृह मतदान, सुविधा केंद्रामध्य

मतमोजणीची प्रक्रिया वस्तुनिष्ठपणे पार पाडावी : मतमोजणी निरीक्षक

इमेज
  मतमोजणीची प्रक्रिया वस्तुनिष्ठपणे पार पाडावी : मतमोजणी निरीक्षक             बीड, दि.02(जीमाका): मतमोजणीची प्रक्रिया वस्तुनिष्ठपणे पार पाडावी यासाठी योग्य ते प्रशिक्षण अधिनस्त कर्मचाऱ्यांना देण्याचे आवाहन मतमोजणी निवडणूक निरीक्षक बसवराज आर. सोमन्ना यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात आज मतमोजणी निवडणूक निरीक्षक बसवराज आर सोमन्ना जिल्हा निवडणूक अधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रशिक्षण देण्यात आले त्यावेळी श्री आर सोमन्ना बोलत होते.  जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी मतमोजणी निरीक्षक श्री आर. सोमन्ना यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. या बैठकीस अप्पर जिल्हाधिकारी डॉ. त्रिगुण कुलकर्णी, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा आचारसंहिता कक्ष प्रमुख वासुदेव सोळंके, निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी महेंद्र कुमार कांबळे, पोस्टल बॅलेटचे सहाय्यक निवडणूक अधिकारी शैलेश सूर्यवंशी, गेवराई विधानसभा मतदारसंघाचे सहाय्यक निवडणूक अधिकारी ओमकार देशमुख मंचावर उपस्थित होते.  माजलगाव, परळी, बीड, केज मतदार संघातील सहाय्यक निवडणूक अधिकारी

शिक्षण क्षेत्रांमध्ये चांगले कार्य करण्यासाठी प्रयत्नशील राहू-सौ. अनूजाताई डोईफोडे

इमेज
  शिक्षण क्षेत्रांमध्ये चांगले कार्य करण्यासाठी प्रयत्नशील  राहू-सौ. अनूजाताई डोईफोडे  .................. नांदेड दिनांक 2 जून प्रतिनिधी   नांदेड एज्युकेशन सोसायटीच्या सदस्यपदी झालेली निवड म्हणजे शिक्षणक्षेत्रामध्ये माझ्यावर जी जबाबदारी पडली आहे, त्याचा मी चांगल्या पद्धतीने उपयोग करेल व माझ्या हातून चांगले कार्य करण्यासाठी प्रयत्नशील राहील असे मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या तथा दैनिक प्रजावाणी मधील ' मानसी' या महिलांसाठी चालवल्या जाणाऱ्या साप्ताहिक सदराच्या कृतिशील संपादिका सौ. अनुजाताई शंतनू डोईफोडे यांनी व्यक्त केले.  नांदेड एज्युकेशन सोसायटीच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल नांदेड शहरातील सांस्कृतिक व शैक्षणिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या वतीने त्यांचा नुकताच सत्कार करण्यात आला. तसेच दैनिक प्रजावाणीच्या 63 व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून प्रजावाणीचे संपादक शंतनू सुधाकररावजी डोईफोडे यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक, व्याख्याते व माजी उपप्राचार्य प्रा. डॉ. दीपक कासराळीकर, संगीत क्षेत्रातील चिंतनशील व निरपेक्ष भावनेने कार्यरत असणारे डॉ. प्रमोदराव

शनैश्वर जन्मोत्सवा निमित्त रक्तदान शिबीर :३१ रक्तदात्यांनी केलं रक्तदान

इमेज
  शनैश्वर जन्मोत्सवा निमित्त रक्तदान शिबीर :३१ रक्तदात्यांनी केलं रक्तदान परळी वैजनाथ दि.०२ (प्रतिनिधी)           येथील वैद्यनाथ मंदिराच्या पायथ्याशी असलेल्या श्री शनी मंदिरात श्री शनैश्वर जन्मोत्सवानिमित्त रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यास युवक,महिलांचा मोठा प्रतिसाद लाभला. यावेळी ३१ रक्तदात्यांनी रक्तदान केले.              शनैश्वर जन्मोत्सवा निमित्त बारा ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या प्रभू वैद्यनाथाच्या पायथ्याशी श्री शनी मंदिरात गेल्या १२ वर्षापासून रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात येत आहे. यंदा श्री शनैश्वर जन्मोत्सवा निमित्त रविवारी (ता.०२) रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या राष्ट्रीय कार्यात युवक, महिला, पुरुष यांचा मोठा प्रतिसाद लाभला. यावेळी ३१ रक्तदात्यांनी रक्तदान केले. यावेळी अनेकांनी सपत्नीक आपले रक्तदानाचे राष्ट्रीय कर्तृत्व पारपाडले. या रक्तदान शिबीरात रक्तसंकलनाचे कार्य स्वामी रामानंद तीर्थ शासकीय रक्तपेढी आंबेजोगाई येथील डॉ.स्नेहल कराड, आनंद सिताप, जगदिश रामदासी, सैयद नजीर, बाबा शेख, श्री.यादव, शामली, रामप्रसाद, मुस्कान, वृषाली, स्वराज