इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

MB NEWS-विरोधी पक्षनेते पदासाठी धनंजय मुंडे यांच्या नावाची चर्चा

 विरोधी पक्षनेते पदासाठी धनंजय मुंडे यांच्या नावाची चर्चा 







मुंबई : मुख्यमंत्रीपद भूषविलेल्या शिवसेनेकडे पुरेसे संख्याबळ नसल्यामुळे विधानसभा विरोधी पक्षनेते पदासाठी राष्ट्रवादीकडून जेष्ठ नेते अजित पवार, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि धनंजय मुंडे यांच्या नावांची चर्चा सुरु झाली आहे.

     क्लिक करा: *हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे; धृतराष्ट्र नाही : हा शिवसेनेचा मुख्यमंत्री नव्हे - उद्धव ठाकरे

 शिवसेनेत बंडखोरी झाल्यामुळे आता या पक्षाकडे केवळ १६ आमदार उरले आहेत. 'शिंदेशाही' सुरू झाल्यानंतर यातील काही आमदार या गटाच्या गळाला लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे संख्याबळ नसतानाही विधान परिषदमध्ये विरोधी पक्षनेते पद देण्याची पद्धत विधानसभेमध्ये अंगीकारली जाणार नाही. विधानसभेत सर्वाधिक आमदार असलेला भाजप आता सत्तेत गेला असल्यामुळे विरोधकांमध्ये आमदारांची संख्या असलेल्या विधानसभा विरोधी पक्षनेते पद मिळणार आहे.

क्लिक करा: 'त्या' व्हिडिओ ची वास्तविकता आली समोर

राज्यातील इतर पक्षांच्या तुलनेत राष्ट्रवादीकडे सर्वाधिक अनुभवी नेते आहेत. तगडा अभ्यास आणि प्रशासनाकडून कामे करून घेण्याची अनोखी पद्धत यांच्याकडे जास्त आहे. त्यामुळे विरोधी पक्षनेते पदासाठी राष्ट्रवादीकडून अनेक नेत्यांची नावे समोर दिसत असली तरी सध्या अजित पवार, जयंत पाटील आणि धनंजय मुंडे यांना सर्वाधिक पसंती आहे.आपल्या विशेष ढंगातून संवाद साधत ग्रामीण भाषिकांना आपलेसे करणारे अजित पवार, प्रतिस्पर्ध्याला कुशलतेने चिमटे, टोमणे मारणारे जयंत पाटील आणि राष्ट्रवादीतील फायर ब्रँड नेते म्हणून ओळखले जाणारे धनंजय मुंडे यांची विरोधी पक्षनेते पदासाठी नावे चर्चेत आहेत. तर ही नावे चर्चेत असली तरी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यापैकी एकाच्या गळ्यात विरोधी पक्ष नेते पदाची माळ घालतात की, भाजपाप्रमाणे धक्का तंत्राचा वापर करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

"

🔵 हे देखील वाचा पहा 

क्लिक करा:*एकनाथ शिंदेची देवेंद्र फडणवीसांवर स्तुतीसुमने,"म्हणाले....*

क्लिक करा:*थक्क करणारा प्रवास: रिक्षाचालक ते मुख्यमंत्री*

क्लिक करा:*एकनाथ शिंदे होणार नवे मुख्यमंत्री*

क्लिक करा:*अखेर उद्धव ठाकरेंनी दिला राजीनामा*

क्लिक करा:🔴 🥏 *शिवसेनेला आणखी एक धक्का*

क्लिक करा:🔴 🛑 वारीतील वारकर्‍यांना सध्याच्या राजकीय घडामोडींशी ना देणं ना घेणं........!


क्लिक करा:🔴 यापुर्वी आपण संत गजानन महाराज पालखी सोहळ्याचे असे मनमोहक दृश्य पाहिलेच नसेल.......!

क्लिक करा:🔴 🟥 *पुन्हा ठाकरे -शिंदे एकत्र?*


क्लिक करा:बंडखोर गटाचं नाव ठरलं: 'शिवसेना बी' - शिवसेना बाळासाहेब


• क्लिक करा:🔴विठ्ठलभक्तीने दुमदुमला बालाघाट। जाहली सोपी वाट । पंढरीची ।।

• क्लिक करा:💢 स्वत: च्या बापाच्या नावानं मतं मागा,उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर हल्लाबोल


*...तर दांडे हातात घेऊ- आबासाहेब पाटील*


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!