आमरण उपोषणाला वडीगोद्री गावामध्ये जाऊन दिला पाठिंबा!

ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणासाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करणार - प्रा.टी.पी.मुंडे प्रा. लक्ष्मण हाके व नवनाथ आबा वाघमारे यांनी सुरू केलेल्या आमरण उपोषणाला वडीगोद्री गावामध्ये जाऊन दिला पाठिंबा! परळी वैजनाथ, प्रतिनिधी ओबीसींच्या प्रश्नासाठी जालना जिल्ह्यातील वडीगोद्री गावामध्ये प्रा. लक्ष्मण हाके व नवनाथ आबा वाघमारे हे आमरण उपोषण करत आहेत.ओबीसीच्या न्याय हक्कासाठी तसेच आरक्षणाच्या संरक्षणासाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करणार असल्याचे प्रतिपादन ओबीसी बहुजन पार्टीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रा.टी.पी.मुंडे सर यांनी केले. या आमरण उपोषणाला त्यांनी भेट देऊन पाठिंबा दर्शवला. मनोज जरांगे यांनी मराठा समाजाच्या सगेसोयरे कायद्याची अंमलबजावणी व समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्यासंदर्भात उपोषण केले होते. परंतु त्यांच्या मागण्या मान्य करण्यासाठी सरकारला एक महिन्याचा कालावधी दिला असल्याने उपोषण स्थगित केले त्याच्या विरोधात ओबीसीचे नेते प्रा. लक्ष्मण हाके व नवनाथ आबा वाघमारे यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. ओबीसीचे आरक्षण हे कायद्याच्या चौकटीमध्ये बसणारे असून ते आरक्षण मराठा समाजाला देता कामा न...