पोस्ट्स

मे १९, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

27 तारखेला 10 वी चा निकाल

इमेज
  27 तारखेला 10 वी चा निकाल  नुकताच बारावीचा निकाल जाहीर करण्यात आलाय. आता दहावीच्या निकालाकडे सर्वांच्या नजरा आहेत. दहावीचा निकाल कधी जाहीर होणार याबद्दल विद्यार्थ्यांकडून विचारणा केली जातंय. मेच्या चाैथ्या आठवड्यात दहावीचा निकाल जाहीर होणार आहे.      महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या निकालाबद्दल अत्यंत मोठे अपडेट आले आहे. मेच्या चाैथ्या आठवड्यात निकाल लागणार आहे. हेच नाही तर निकालाची तारीखही पुढे आलीये. 27 मे 2024 रोजी दहावीचा निकाल हा लागणार आहे. दुपारी एक वाजता हा निकाल लागणार आहे. राज्यात दहावीची परीक्षा 1 मार्च ते 26 मार्च 2024 यादरम्यान पार पडली. विशेष म्हणजे या परीक्षेची तयारी बोर्डाकडून जय्यत प्रकारे करण्यात आली. यंदा 16 लाख 9 हजार 444 विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिलीये. आता विद्यार्थ्यांनी निकालाची प्रतिक्षा संपली आहे.

व्हायरल व्हिडिओ महाराष्ट्राचे नसल्याचा दावा

इमेज
  शरद पवार गटाचे सर्व आक्षेप निवडणूक आयोगाने फेटाळले: आक्षेपार्ह व्हायरल व्हिडिओ महाराष्ट्राचे नसल्याचा दावा लोकसभा निवडणुकीत मतदान प्रक्रिये दरम्यान बारामती, अहमदनगर आणि बीड लोकसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात गोंधळ झाला असल्याचा आरोप शरद पवार गटाच्या वतीने करण्यात आला आहे. या मतदारसंघांमध्ये सत्ताधारी पक्षाच्या वतीने बुथ हायजॅक करण्यात आल्याचा आरोप देखील शरद पवार गटातील नेत्यांनी केला होता. या संदर्भातले काही व्हिडिओ देखील समाज माध्यमांवर व्हायरल होत होते. मात्र हे व्हायरल व्हिडिओ महाराष्ट्रातील लोकसभा निवडणूक 2024 चे नसल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. महाराष्ट्रातील मतदान प्रक्रिया ही सुरळीत आणि शांततेत पार पडली आहे, असा दावा देखील निवडणूक आयोगाने केला आहे. Click:संबंधित बातमी-  परळीचे फेरमतदान घ्या- शरद पवार गटाची निवडणूक आयोगाकडे मागणी या संदर्भात निवडणूक आयोगाने एका पोस्टच्या माध्यमातून माहिती दिली आहे. निवडणूक आयोग म्हणाला की, 'काही व्यक्ती निवडणूक प्रक्रियेला बाधा पोहचवणारी कृती करतानाचे, आणि इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रासोबत छेडछाड करत असल्याच्या इतर राज्यांमधील जुन्या च

मोठ्या संख्येने उपस्थित रहा-अनिल बोर्डे

इमेज
  ब्राह्मण समाजाचे 30 जूनला छत्रपती संभाजीनगर येथे अधिवेशन गेवराई :- ब्राह्मण समाजाच्या मागण्यासाठी अखिल भारतीय पेशवा संघटनेतर्फे छत्रपती संभाजीनगर येथे 30 जूनला ब्राह्मण अधिवेशन होणार असल्याची माहिती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सचिन वाडे पाटील यांनी दिली. अधिवेशनाला नाशिकचे ॶॅड. भानुदास शौचे, महंत सुधीर पुजारी,  उद्योजक विवेक देशपांडे, खासदार मेधा कुलकर्णी. आदि मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी विविध क्षेत्रातील कर्तबगार समाज बांधवांचा सत्कार करण्यात येणार आहे. शिक्षण , रोजगार व शासकीय सवलती परशुराम विकास महामंडळाची शासनाचे मंजुरी आदी विषयावर चर्चा होणार आहेत. अधिवेशनाचे नियोजन खजिनदार ,उदय मुळे, उपाध्यक्ष मोरेश्वर मार्डीकर, वैभव कुलकर्णी, ऍड प्रसाद देशमुख, संजय क्षीरसागर, संतोष जोशी, दत्तात्रय पिंपळे, लक्ष्मीकांत दडके, धनजंय नारळे, आदी करत आहेत.                         .         बीड जिल्ह्यातील समाज बांधवांनी अधिवेशनाला मोठ्या संख्येने हजर राहावे असे  आवाहन ब्राह्मण महा शिखर परिषद तालुका अध्यक्ष अनिल बोर्डे, अशोक देऊळगावकर, मोहन राजहंस, गणेश रामदासी आदींनी केले आहे.

प्रवाशांना विविध सेवा उपलब्ध करून द्या-अनिल बोर्डे

इमेज
  प्रवाशांना विविध सेवा उपलब्ध करून द्या-अनिल बोर्डे                                      गेवराई:- गेवराई शहरातील बस स्थानकावर विविध सेवा निदर्शनास येत नाहीत त्यावर योग्य ती कार्यवाही करून विविध सेवा पुरविण्यात याव्यात अशी मागणी बीड जिल्हा ग्राहक पंचायत उपाध्यक्ष व गेवराई ग्राहक मार्गदर्शन केंद्र प्रमुख अनिल बोर्डे यांनी गेवराईतील आगारप्रमुख यांना प्रत्यक्ष भेटून निवेदन सादर केलेले आहे व त्यावर प्रत्यक्ष चर्चा करण्यात आली निवेदनावर योग्य कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले. गेवराई बस स्थानकात थंड पिण्याचे पाणी कायमस्वरूपी व्यवस्था करण्यात यावी. गेवराई बस स्थानकातून श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे जाण्यासाठी बस उपलब्ध नाही. गेवराई येथून भाविक नाशिक व शिर्डी येथे जात असतात तसेच नोकरीनिमित्त गेवराई तालुक्यातील बरीच मंडळी नाशिक येथे आहे. तसेच अनेक विद्यार्थी संगमनेर व लोणी येथे शिक्षणासाठी जात असतात परंतु त्यांना सोयीस्कर अशी बस उपलब्ध नाही. गेवराई आगारातून नाशिक येथे जाण्यासाठी एकही बस उपलब्ध नाही. त्यामुळे प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे नाशिक येथे जाण्यास

युवक नेते अजय मुंडे यांनी पुण्याच्या रुग्णालयात जाऊन महाजारांची घेतली प्रत्यक्ष भेट

इमेज
  गहिनीनाथ गडाचे महंत विठ्ठल महाराज शास्त्री यांच्या तब्येतीची धनंजय मुंडे यांच्याकडून विचारपूस महाराजांच्या प्रकृतीत सुधारणा; युवक नेते अजय मुंडे यांनी पुण्याच्या रुग्णालयात जाऊन महाजारांची घेतली प्रत्यक्ष भेट पुणे (दि. 23) - श्रीक्षेत्र गहिनीनाथ गडाचे महंत ह भ प विठ्ठल महाराज शास्त्री यांचा दोन दिवसांपूर्वी अपघात झाला असून ते सध्या पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक येथे उपचार घेत आहेत. कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी आज महाराजांशी व रुग्णालयातील डॉक्टरांशी दूरध्वनीवरून चर्चा करून महाराजांच्या तब्येतीची विचारपूस केली.  मुंडे कुटुंबीयांच्या वतीने आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवक नेते अजय मुंडे यांनी ह भ प विठ्ठल महाराज यांची पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक येथे भेट घेऊन त्यांच्या तब्येतीबद्दल माहिती घेतली.  महाराजांच्या एका पायाला दुखापत झाली असून त्यांच्या प्रकृतीत आता सुधारणा होत आहे, अशी माहिती अजय मुंडे यांना डॉक्टरांनी दिली.  दरम्यान राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी देखील यावेळी महाराजांशी दूरध्वनीवरून चर्चा करत महाराजांच्या तब्येतीची तसेच त्यांच्यावर सुरू असलेल्या उपचारांची माहिती घेतल

डॉ.अमन जयेंद्र बरारा आयबीए अवॉर्डने सन्मानित

इमेज
  डॉ. अमन जयेंद्र बरारा आयबीए अवॉर्डने  सन्मानित नांदेड दि.23 मे प्रतिनिधी         सुयोग किड्स अँड इंटरनॅशनल स्कूल, नांदेडच्या प्राचार्या डॉ. अमन जयेंद्र बरारा यांना शैक्षणिक क्षेत्रातील 'सर्वोत्कृष्ट शिक्षक' म्हणून उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल दिल्लीच्या हायपॅड्ज मीडिया ग्रुपने आंतरराष्ट्रीय प्रतिभा पुरस्कार 2024 ने सन्मानित केले आहे.        डॉ.अमन बरारा या अनेक वर्षांपासून नांदेडमध्ये शैक्षणिक, सामाजिक आणि आध्यात्मिक क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी हा राष्ट्रीय पुरस्कार त्यांचे महागुरू महावतार बाबाजी, त्यांचे गुरुदेव गुरु राजिंदर सिंग जी आणि त्यांचे सासरे स्व. योगेंद्रपाल बरारा यांना समर्पित केला आहे.. पती जयेंद्र बरारा यांच्या प्रेरणेने व मार्गदर्शनाने त्यांनी आजपर्यंत शैक्षणिक क्षेत्रात बरीच प्रगती केली आहे. राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन नांदेड शहरातील करण्यात येत आहे.

पावसाळ्यापूर्वी सरस्वती नदी व शहरातील नाले सफाई त्वरित करावी - अश्विन मोगरकर

इमेज
  पावसाळ्यापूर्वी सरस्वती नदी व शहरातील नाले सफाई  त्वरित करावी - अश्विन मोगरकर परळी वैजनाथ पावसाळा उंबरठ्यावर येऊन ठेपला तरी शहरातील नाले सफाईची कामे नगरपरिषद प्रशासनाने न केल्याने पावसाळ्यात घर दुकानात पाणी शिरून नुकसान होऊ शकते हे टाळण्यासाठी त्वरित नगरपरिषद प्रशासनाने नालेसफाई करावी अशी मागणी प्रसिद्धीपत्रकाद्वारे भाजपाचे अश्विन मोगरकर यांनी केली आहे. परळी नगर परिषदेच्या मार्फत दरवर्षी नाले सफाई मोहीम मे महिन्यात केली जाते. परंतु यावर्षी  नगरपरिषदेच्या निवडणुका न झाल्याने लोकनियुक्त नगरसेवक नसल्याने प्रशासनावर कोणाचाही अंकुश राहिलेला नाही. मुख्याधिकारी कधीही शहरात फिरून नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्याचे दिसून येत नाहीत. नगर परिषद मूलभूत सुविधा नागरिकांना देण्यास असमर्थ ठरत आहे. यावर्षी पाऊसकाळ चांगला असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. पावसाळ्यापूर्वी शहरातील नाले, सरस्वती नदीची सफाई केली जाते. यावर्षी गावभागात असलेली सरस्वती नदी कचरा, प्लास्टिक, झाडेझुडपे व माती दगडांनी अक्षरशः भरून गेली आहे. नगरपरिषदेच्या कर्मचारी अधिकाऱ्यांचा कुठलाही धाक नसल्याने अनेकांनी उघड उघड

धीजरकुमार पथकाची मोठी कारवाई:अवैध वाळू उपसा : कोट्यावधींचा मुद्देमाल पकडला

इमेज
  धीजरकुमार पथकाची मोठी कारवाई: अवैध वाळू उपसा :  कोट्यावधींचा मुद्देमाल पकडला बीड, प्रतिनिधी.....      अवैध वाळू उपसा व वाहतूक होत असताना सपोअ उपविभाग माजलगावचे धीजरकुमार पथकाने मोठी कारवाई करत पावणेदोन कोटीचा मुद्देमाल पकडला  आहे.       याबाबत पोलीस सुत्रांकडून प्राप्त माहितीनुसार, दिनांक 21/05/2024 रोजी डॉ. बी.धीजरकुमार सपोअ उपविभाग माजलगाव यांना  गुप्त बातमीदारांमार्फत माहिती मिळाली आहे की, काही हायवा राक्षसभुवन येथुन अवैध वाळू उपसा करुन उमापुर मार्ग अहमदनगर येथे घेवुन जात आहे. अशी खात्रीलायक माहिती मिळाली असुन तुम्ही व कार्यालयातील पोकॉ/661 कानतोडे, पोकॉ/2159 मिसाळ असे सोबत जावुन कार्यवाही करा असे आदेशीत केल्याने आम्ही खाजगी वाहनाने रवाना होवुन 00:30 वा. सुमारास ठाकुरवाडी तांडा शिवारातील रोडवर राक्षसभुवन ते उमापुर जाणारे रोडवर एका पाठीमागे एक असे तीन भारत बेंझ हायवा अवैध गौण खनिज वाळुची चोरटी वाहतुक करीत असतांना पथकाने पकडले पैकी चालक नामे ।) शाहरुख शबीर पठाण वय 25 वर्षे रा. चकलांबा ता. गेवराई जि.बीड याचे ताब्यात असलेला विना पासींग भारत बेंझ हायवा मध्ये अंदाजे सात ब्रास वाळु

अ‍ॅनालायझर सुशील कुलकर्णी यांना नामांकित “ब्राह्मण भूषण” पुरस्कार जाहीर

इमेज
  अ‍ॅनालायझर  सुशील कुलकर्णी यांना नामांकित “ब्राह्मण भूषण” पुरस्कार जाहीर  ‘आम्ही सारे ब्राह्मण’ व ‘ब्राह्मण व्यावसायिक पत्रिका’ या नियतकालिकांच्या वतीने देण्यात येणारा यावर्षीचा “ब्राह्मण भूषण” पुरस्कार पत्रकार व अ‍ॅनालायझर न्यूजचे संपादक सुशील कुलकर्णी यांना देण्यात येणार असल्याचे नियतकालिकांचे मुख्य संपादक भालचंद्र कुलकर्णी व संचालक संजय ओर्पे यांनी आज (मंगळवार) पुणे येथे जाहीर केले.         या समारंभाच्या अध्यक्षस्थानी स्वामी गोविंद देवगिरीजी महाराज (श्री रामजन्मभूमी न्यासाचे कोषाध्यक्ष) राहणार असून प्रमुख पाहुण्या म्हणून ज्येष्ठ उद्योजिका मंजूषा भावे उपस्थित राहणार आहेत. मुक्त पत्रकरितेच्या क्षेत्रात अल्पावधीतच लोकप्रिय झालेल्या ‘अ‍ॅनालायझर न्यूज’ या वृत्तवाहिनीचे संपादक, हिंदुत्वाचे कट्टर पुरस्कर्ते आणि नि:स्पृह पत्रकारिता या निकषांवर हा पुरस्कार सुशील कुलकर्णी यांना जाहीर करत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. मानपत्र, पुणेरी पगडी व उपरणे असे पुरस्काराचे स्वरुप(Pune) आहे. येत्या शनिवारी (25 मे) सायंकाळी. 5.30 वाजता आबासाहेब गरवारे महाविद्यालय, पुणे येथे होणार्‍या या समारंभात ब्

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

इमेज
  माजलगाव पाटबंधारे विभागाचा कार्यकारी अभियंता एसीबीच्या जाळ्यात;28 हजाराची लाच घेतांना पकडले परळी वैजनाथ, प्रतिनिधी....     माजलगाव पाटबंधारे विभाग परळी (वर्ग 1) कार्यकारी अभियंता  राजेश आनंदराव  सलगरकर या लोकसेवकास तलावातील बुडीत क्षेत्रातील गाळ व माती काढून शेतात टाकण्यासाठी  माजलगाव पाटबंधारे विभागाचे कार्यालयात  गाळ व माती काढण्याची परवानगी  मिळण्यासाठी 28 हजाराची लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहाथ पकडले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग बीड युनीटने ही कारवाई केली आहे.              याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, यातील 35 वर्षिय तक्रारदार  व साक्षीदार आणि गावातील त्यांचे  5 सहकारी शेतकरी यांनी चिंचोटी तलावातील बुडीत क्षेत्रातील गाळ व माती काढून शेतात टाकण्यासाठी  माजलगाव पाटबंधारे विभागाचे कार्यालयात  गाळ व माती काढण्याची परवानगी  मिळण्यासाठी अर्ज दाखल केला होता. हे अर्ज कार्यालयीन प्रक्रियेनुसार लोकसेवक राजेश सलगरकर  यांचेकडे परवानगी करीता प्रलंबित होते. लोकसेवक सलगरकर यांनी तक्रारदार व साक्षीदार यांना गाळ व माती  काढण्यासाठी परव

बारावीचा निकाल:यशस्वितांचे अभिनंदन

इमेज
  लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयाची यशाची परंपरा कायम परळी वैजनाथ दि.२२ (प्रतिनिधी         लक्ष्मीबाई देशमुख महिला कनिष्ठ महाविद्यालयाने १२ वी बोर्ड परिक्षेत यशाची परंपरा कायम ठेवली असून महाविद्यालयाच्या विज्ञान शाखेचा निकाल ९७ टक्के तर कला शाखेचा निकाल ९५ टक्के लागला आहे. तर काँलेजचा एकुण निकाल ९७ टक्के लागला आहे.              शहरातील लक्ष्मीबाई देशमुख कनिष्ठ महिला महाविद्यालयाने बारावी बोर्ड परिक्षेत यशाची परंपरा कायम ठेवली असून काँलेजचा निकाल ९७ टक्के लागला आहे. महाविद्यालयातून कला शाखेचे विद्यार्थिनी ऋतुजा परमेश्वर कुंभार (७९.८३) प्रथम, द्वितीय प्रिती शिवलिंग कुंभार (७८.१७), तृतीय विद्या अजय गंगाधरे (७७.६७), तर विज्ञान शाखेतून प्रथम ज्योती बालाजी जुनाळ (७८.३३), द्वितीय- मधुरा सचिन पोखरकर (७८.१७), तृतीय- मयुरी संतोष गोरे (७७.८३) क्रमांक पटकावला आहे. या यशाबद्दल संस्थेचे मार्गदर्शक अनिलराव देशमुख, अध्यक्ष संजय देशमुख, सचिव रविंद्र देशमुख, कोषाध्यक्ष प्रा प्रसाद देशमुख, महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ विद्या देशपांडे, प्रा. प्रविण फुटके,प्रा प्रविण नव्हाडे, प्रा अशोक पवार, प्रा

वैद्यनाथ कॉलेजची यशाची परंपरा कायम

इमेज
  वैद्यनाथ कॉलेजची यशाची परंपरा कायम  परळी, प्रतिनिधी.... महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मार्च 2024मध्ये  घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर केला आहे.      जवहार शिक्षण संस्थेच्या वैद्यनाथ कॉलेज ,परळीचा विज्ञान शाखेचा.95.94% टक्के व कला शाखेचा 80.35% व व वाणिज्य शाखेचा 94.60.50% एम सी व्ही सी चा 84.00% निकाल लागला आहे. कला  शाखेतून अनुक्रमे प्रथम व तृतीय आणि क्रमांकाने प्रथम-दहीभाते चैताली सचिन 86.83,द्वितीय-रोडे तृष्णा गौतम 77.67,तृतीय-सोनार उत्तम बलभीम 74.50,वाणिज्य शाखेतून  वाणिज्य शाखेतून प्रथम-कुंभार ऋतुजा सतीश 83% द्वितीय- गोस्वामी गिरीजा लक्ष्मीकांत -75.83   तृतीय- काडवडे अनिकेत महादेव-73.33 तर विज्ञान शाखेतून चौधरी शरयू  रामेश्वर 86.33%,नागरगोजे  श्रीनिवास  श्रीहरी 86.16 %,लांडगे  ॠतुराज  महादेव  86.%, झंवर  पुष्कर  केदर  86.%होकेशनल शाखेतील इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी या अभ्यासक्रमातून शिंदे मनीषा अंकुशराव 73% चि. तेलंग सोमेश्वर दशरथ 66.17%, मोरे आरती लक्ष्मण 62.83% तर इलेक्ट्रिकल्स टेक्नॉलॉजी या अभ्यासक्रमातून चि चोपडे रोहित दादाराव

बारावी निकाल: यंदाही मुलींचीच बाजी

इमेज
  बारावीचा निकाल 93.37 टक्के! कोकण विभागाची बाजी, मुंबईचा निकाल सर्वात कमी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून बारावीच्या परीक्षा घेण्यात आल्या. गेल्या काही दिवसांपासून विद्यार्थी हे निकालाची वाट सतत पाहत होते. काही दिवसांपूर्वीच बोर्डाकडून हे स्पष्ट करण्यात आले की, बारावीचा निकाल मेच्या तिसऱ्या आठवड्यात लागेल. त्यानंतर आता नुकताच बोर्डाकडून मोठी घोषणा करण्यात आलीये. आता विद्यार्थ्यांची निकालाची प्रतिक्षा ही संपलीये. आज बारावीचा निकाल जाहीर केला जाईल. विद्यार्थी ऑनलाईन पद्धतीने आज 21 मेला आपला निकाल पाहू शकणार आहेत.     महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. यंदा बारावीच्या परीक्षेचा निकाल 93.37 टक्के इतका लागला. एकूण 14 लाख 970 विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती. यावर्षी एकूण 14 लाख 970 विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती. त्यापैकी 13 लाख 29 हजार 684 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यंदा बारावीच्या परीक्षेचा निकाल 93.37 टक्के इतका लागला आहे. 8782 विद्यार्थ्यांनी 90 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवले आहेत. तर यंदा केवळ एकाच विद्यार्थिनीला

मातृदिनानिमित्त परळी तालुका माहेश्वरी युवा संघठनने आयोजित केली राजस्थानी महिला टर्फ क्रिकेट लीग

इमेज
  मातृदिनानिमित्त परळी तालुका माहेश्वरी युवा संघठनने आयोजित केली राजस्थानी महिला टर्फ क्रिकेट लीग परळी वैजनाथ, प्रतिनिधी....     मातृदिनानिमित्त परली तालुका माहेश्वरी युवा संघठन ने अनोखा उपक्रम हाती घेऊन राजस्थानी महिला टर्फ क्रिकेट लीगचे आयोजन केले.या उपक्रमाला भरभरून प्रतिसाद मिळाला.     एस.जी. क्रिकेट टर्फ, धर्मापूरी कॉर्नर, गंगाखेड रोड, परली वैजनाथ येथे रविवार, १९ मे २०२४ रोजी मातृदिनानिमित्त राजस्थानी महिला टर्फ क्रिकेट लीग आयोजित करण्यात आली होती. मातृवर्गाच्या सन्मानार्थ हा उपक्रम राबविण्यात आला. राजस्थानी महिला टर्फ क्रिकेट लीगच ेविशेष आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला भरभरून प्रतिसाद मिळाला.या आयोजनाच्या यशस्वितेसाठी प्रोजेक्ट चेअरमन अँड. संज्योत लाहोटी,अध्यक्ष सुरज कोठारी,सचिव सुमित नावंदर, खेळ समन्वयक अमित रांदड व सर्व पदाधिकारी, सदस्य परळी तालुका माहेश्वरी युवा संघठन यांनी परिश्रम घेतले.  ● यांनी जिंकली पारितोषिके         दरम्यान अतिशय रोमहर्षक व उत्साहपूर्ण झालेल्या या लीगमध्ये प्रथम पारितोषिक - जय उमा महेश वॉरियर्स , द्वितीय पारितोषक - रॉयल चॅलेंजर्स परळी या महिला संघान

उष्माघातापासुन नागरिकांनी काळजी घ्यावी

इमेज
  परळीत उष्माघाताचा बळी! भाजीपाल विक्रेत्यावर काळाचा घाला; कुटुंब उघड्यावर परळी वैजनाथ, प्रतिनिधी....        सध्या उन्हाची तीव्रता प्रचंड वाढली असुन उन्हाच्या तीव्रतेने जीवाची लाही लाही होत आहे. वाढलेले तापमान लक्षात घेता उष्माघातापासून बचाव करण्यासाठी जागृती करण्यात येत आहे. मात्र हातावर पोट असणाऱ्या लोकांना उन्हात काम केल्याशिवाय गत्यंतरच नाही. यातूनच परळीच्या आठवडी बाजारातील एका भाजीविक्रेत्यावर काळाने घाला घातला असुन उष्माघाताने त्याचा बळी गेला आहे.           परळी तालुक्यातील दैठणा घाट येथील महादेव संभाजी गुट्टे वय 54 वर्ष हे अल्पभूधारक शेतकरी आपल्या शेतात भाजीपाला उत्पादित करून आठवडी बाजारात हातावर भाजीपाला विकतात. आजच्या आठवडी बाजारात नेहमीप्रमाणे भाजी विक्रीसाठी हे शेतकरी बसले होते. सकाळपासूनच उन्हाचा कडाका होता. परळीत दुपारच्यावेळी तापमानाचा पारा ४३ अंश सेल्सिअस इतका वाढलेला होता. उन्हाची प्रचंड तीव्रता वाढलेली असल्याने भरदुपारी उष्माघाताचा फटका या भाजीविक्रेत्याला बसला आणि भर बाजारातच उष्माघाताने भोवळ येऊन तो पडला. आजूबाजूच्या लोकांनी उपचारासाठी तात्काळ उपजिल्हा रुग्णालय

हरिद्वार व दिल्ली येथील विद्वानांची मौलिक व्याख्याने

इमेज
  माता कौशल्यादेवी लोहिया यांच्या गौरवार्थ परळीत त्रिदिनात्मक "मातृवंदना" समारंभ   ‌    हरिद्वार व दिल्ली येथील विद्वानांची मौलिक व्याख्याने   परळी वैजनाथ,दि.२०-                        शहरातील ज्येष्ठ नागरिक व दानशूर आदर्श माता श्रीमती कौशल्यादेवी रामपालजी लोहिया यांच्या ९१ व्या वर्षपूर्तीनिमित्त येत्या २४, २५ व २६ मे  रोजी भव्य स्वरूपात "मातृवंदना" कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. अक्षदा मंगल कार्यालयात संपन्न होणाऱ्या या कार्यक्रमासाठी हरिद्वार येथील पतंजली विद्यापीठाचे प्रति- कुलगुरू व प्रसिद्ध वैदिक विद्वान प्रो. डॉ. महावीरजी आचार्य व दिल्ली येथील प्रसिद्ध भजनगायिका श्रीमती अमृता शास्त्री यांची उपस्थिती लाभणार असून त्यांचे दररोज  आध्यात्मिक, धार्मिक, कौटुंबिक, सामाजिक व राष्ट्रीय विषयांवर अमूल्य असे मार्गदर्शन लाभणार आहे.            तिन्ही दिवशी दररोज सकाळी ९ ते १ वा. व संध्याकाळी ५ ते ९ वा. यजुर्वेद पारायण यज्ञ, भजन संगीत व विविध मौलिक विषयांवर अभ्यासपूर्ण व्याख्याने संपन्न होतील . तिसऱ्या दिवशी सकाळी मान्यवर विद्वान, साधू महात्मे,संन्यासी व विविध क्षेत्राती

राज्यभरातील विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी: उद्या १२ वीचा निकाल जाहीर होणार

इमेज
  राज्यभरातील विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी: उद्या १२ वीचा निकाल जाहीर होणार राज्य बोर्डाकडून उद्या दुपारी १ वाजता १२ वीच्या विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर केला जाणार आहे. या निकालाकडे राज्यातील लाखो विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांचं लक्ष लागून होतं. अखेर आज राज्य मंडळाने पत्रकार परिषद घेऊन निकालाची तारीख जाहीर केली आहे. ऑनलाइन पद्धतीने हा निकाल जाहीर होणार असून निकाल जाहीर झाल्यानंतर ५ जूनपर्यंत विद्यार्थ्यांना गुणपडताळणी करण्याची असल्यास अर्ज करता येणार आहे. निकाल पाहण्यासाठी या स्टेप्स फॉलो करा १. प्रथम अधिकृत वेबसाईट mahresult.nic.in ला भेट द्या. २. यानंतर होमपेजवरील Maharashtra SSC and HSC result साठी लिंकवर क्लिक करा. ३. आता तुमचा सीट नंबरआणि जन्म तारीख किंवा आईचे नाव टाकून सबमिट बटणावर क्लिक करा. ४. यानंतर Maharashtra board 10th and 12th results 2024 चा निकाल तुमच्या स्क्रिनवर दिसेल. ५. यानंतर त्या PDF ची प्रिंटआऊट काढून घ्या.

मांडवा येथे भव्य दिव्य २१ दिवशीय देवयज्ञ याग सनातन बालसंस्कार शिबीर व पंचधुना तपस्या सोहळ्याचा मंगळवारी समारोप

इमेज
  मांडवा येथे  २१ दिवशीय देवयज्ञ याग सनातन बालसंस्कार शिबीर व पंचधुना तपस्या सोहळ्याचा मंगळवारी समारोप  परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-             श्री क्षेत्र काळभैरव देवस्थान मांडवा यांच्या वतीने भव्य दिव्य २१ दिवसीय देवयज्ञ याग सनातन बालसंस्कार शिबिर व पंचधुना तपस्या सोहळाचे बुधवार दि.०१ मे ते मंगळवार दि.२१ मे रोजी आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याचा समारोप मंगळवार दि.२१ रोजी ह. भ. प. अर्जुन महाराज लाड गुरुजी यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले. तरी पंचक्रोशीतील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थितीत राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.            नवीन पिढी ही आध्यात्मिक संस्कारापासून बाजूला जात आहे. त्यांना चांगला संस्कार मिळावा आणि त्यांच्यात सुसंस्कार रुजावा यासाठी, लहान मुलांसाठी बालसंस्कार शिबिर   परळी तालुक्यातील मांडवा येथे श्री क्षेत्र काळभैरव देवस्थान मांडवा यांच्या वतीने भव्य दिव्य २१ दिवशीय देवयज्ञ याग सनातन बालसंस्कार शिबीर व पंचधुना तपस्या सोहळ्याचे सुरुवात बुधवार दि.०१ मे २०२४  व मंगळवार दि.२१ मे २०२४ रोजी समारोप होणार आहे. प.पू.गुरुदेव श्री श्री १००८ श्री योगी सोमवारनाथ महार

दुर्दैवी ........

इमेज
  गाढ झोपेत असताना अंगावरून गेला टिप्पर; २ तरूणांचा मृत्यू बीड: खोदकाम सुरू असलेल्या ठिकाणी पोकलेन बाजूला उभा करून त्याच्या शेजारीच असलेल्या मोकळ्या जागेत झोपलेल्या दोन पोकलेन ऑपरेटरला टिप्परने चिरडल्याची दुर्देवी घटना घडली. ही घटना आज (रविवार) पहाटे पाली परिसरात उघडकीस आली. या घटनेत दोन्ही ऑपरेटरचा जागीच मृत्यू झाला असुन पोलीस या घटनेचा पुढील तपास करीत आहेत.         या विषयी अधिक माहिती अशी की, बीड तालुक्यात एका ठिकाणी पोकलेन, जेसीबीच्या सहाय्याने उत्खनन सुरू होते. मुरूम भरण्यासाठी त्या ठिकाणी टिप्पर देखील आलेले होते. काल (शनिवार) रात्री खोदकाम झाल्यानंतर पोकलेनचे ऑपरेटर सुभाष कुमार चव्हाण (वय 35 रा. बिहार) आणि समाधान बाळु थोरात (वय 23 रा. सावरगाव ता. बीड) हे दोघे जवळच असलेल्या मोकळ्या मैदानात झोपले होते. मध्यरात्री त्या ठिकाणी मुरूम भरण्यासाठी आलेले टिप्पर क्र.एम.एच.23. ए.यु. 2003 हा रिव्हर्स घेत असतांना त्याने पाठीमागे पाहिलेच नाही. त्यामुळे टायरखाली आल्याने झोपेत असलेले सुभाष कुमार चव्हाण आणि समाधान थोरात यांचा जागीच मृत्यू झाला. मध्यरात्री हा प्रकार कोणाच्याच लक्षात आला नाही.

आई-वडिलांच्या ताटातुटीत मुलांची तारांबळ

इमेज
मायबापांनी लाथाडलं; नातेवाईकांनी नाकारलं: तीन चिमुकले सैरभैर  माजलगाव प्रतिनिधी दि.18 तीन चिमुकल्या मुलांना त्यांच्या नातेवाईकांनी माजलगाव तालुक्यातील पुंगनी गावच्या पुलावर रविवारी पहाटे बेवारस सोडून दिले.ही घटना रविवारी गावकऱ्यांच्या लक्षात आली. पोलिसांनी मुलांना ताब्यात घेऊन अनाथ आश्रमात पोहोचवण्याची व्यवस्था केली आहे.दरम्यान आई-वडिलांच्या बेबनाव ताटातुटीत तीन चिमुकल्यांची मोठी तारांबळ होत आहे.          याबाबत समजलेली माहिती अशी की,गेवराई तालुक्यातील बोरी पिंपळगाव येथील ज्ञानेश्वर जाधव यांचा माजलगाव तालुक्यातील पुंगनी येथील महिलेसोबत आंतरजातीय विवाह 2013 14 साली झाला होता.दरम्यानच्या काळात त्यांना आर्यन(वय 6 वर्षे)अनिकेत (4 वर्षे)व आराध्या (2 वर्ष) अशी तीन मुले झाली.उभयतांत काही दिवसापूर्वी वाद झाल्याची गावकऱ्यात चर्चा आहे.यामुळे मुलांचे वडील ज्ञानेश्वर मोठ्या शहरात वास्तवास गेले,तर आईने लेकरांना नातेवाईकाच्या हवाली सोडून  गेली दरम्यान काही दिवस नातेवाईकांनी मुलांना सांभाळले.परंतु आईबाप तिकडं मजा करत आहेत.आम्ही ही ब्याद का सांभाळायची?अशा भावनेने नातेवाईकांनी या तीन चिमुकल्यांना त

टंचाईग्रस्त भागांचा दौरा करणार

इमेज
  परळी तालुक्यात भीषण पाणीटंचाई : ठोस उपाययोजना करावी- ॲड अनिल मुंडे परळी वैजनाथ दि १९ (प्रतिनिधी) :- परळी शहराबरोबरच तालुक्यातील बहुसंख्य भागात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून नागरिकांना पाण्यासाठी वन  वन भटकावे लागत आहे. प्रशासनाने होत असलेली पाणीटंचाई गांभीर्याने घेत सदर भागाची पाहणी करून पाणीपुरवठा करणाऱ्या टँकर मध्ये वाढ करून नागरिकांना होत असलेली पाणीटंचाई दूर करावी अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव तथा परळी तालुका कृषी प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड अनिल मुंडे यांनी केले आहे. परळी शहराबरोबरच तालुक्यात होत असलेल्या पाणीटंचाई बाबत लक्ष केंद्रित करण्यासाठी उपजिल्हाधिकारी अरविंद लाटकर तथा परळीचे तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांना पाठवलेल्या निवेदनाद्वारे ॲड अनिल मुंडे यांनी वरील प्रमाणे मागणी केली आहे. निवेदनात म्हंटले आहे की, नेहमीपेक्षा मागील वर्षी पाऊस कमी प्रमाणात झाल्यामुळे पाणी पातळी खोलीवर गेल्यामुळे परळी तालुक्यात गावोगावी पाणी टंचाई निर्माण झाली आहे. बऱ्याच भागातील बोर आटले असून साठवण तलाव देखील कोरडे ठाक पडले आहेत परिणामी नागरिकांबरोबरच जनावरांना देखील पिण्याच्या प

तलवारीने केक कापणे अंगलट; सहा जणांवर गुन्हा दाखल

इमेज
  तलवारीने केक कापणे अंगलट; सहा जणांवर गुन्हा दाखल दिंद्रुड:वाढदिवसाच्या दिवशी तलवारीने केक कापणे एका तरुणाच्या आणि त्याच्या मित्रांच्या अंगलट आले. शस्त्र दाखवून दशहत पसरवल्याप्रकरणी दिंद्रुड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. माजलगाव तालुक्यातील मोगरा येथे ही घटना घडली.           अतुल किशन पांढरपोटे या माजलगाव तालुक्यातील मोगरा येथील तरुणाचा दोन दिवसांपूर्वी वाढदिवस होता. वाढदिवसाच्या निमित्ताने त्याने मित्रांसह केक कापून वाढदिवस साजरा केला. मात्र, केक कापण्यासाठी त्याने तलवारीचा वापर केला. याबाबतचा फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावरही टाकला. यानंतर दिंद्रुड पोलिस ठाण्याचे पोलिस कर्मचारी श्रीडोळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून अतुल किशन पांढरपोटे, महादेव पांढरपोटे, अभिषेक पांढरपोटे, नागेश पांढरपोटे, भैय्या पांढरपोटे आणि ज्ञानेश्वर पांढरपोटे (सर्व रा. मोगरा, ता. माजलगाव) यांच्याविरोधात दिंद्रुड पोलिस ठाण्यात गुन्हा नंबर 94/2024 कलम 4/25 आर्मी ॲक्ट प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आरोपीने गुन्ह्यात वापरलेले हत्यार जप्त केले असून आरोपीस अटक करण्यात  आली आहे.

तलवारीचे घाव घालून गाडी फोडली

इमेज
  तलवारीचे घाव घालून गाडी फोडली परळी वैजनाथ, प्रतिनिधी....   परळीतील पद्मावती गल्ली या शहरातील शांत व सुसंस्कृत भागातील एका प्रमुख भाजप कार्यकर्त्याची घरासमोर लावलेली गाडी तलवारीचे घाव घालून फोडल्याची घटना घडली आहे.याप्रकरणी एका जणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.           याबाबत पोलीस सुत्रांकडून प्राप्त अधिक माहितीनुसार,  राहुल रामचरण केंद्रे वय 41  रा. पद्मावती गल्ली परळी वै, हे आपल्या कुटुंबासह गेल्या अनेक वर्षांपासून या भागात राहतात. दि. 18/05/2024 रोजी सायंकाळी 8.00वा. सुमारास  त्यांची क्रेटा SX .MH -25, AD 2599 ही पद्मावती गल्लीतील हनुमान मंदीरा समोर लावलेली होती. आरोपी आकाश लिंबाळकर रा. पद्मावती गल्ली हा  कारवर तलवारीने मारून काचा फोडत आहे असे राहुल केंद्रे यांना गल्लीतील लहान मुलांनी येवुन सांगीतले. राहुल केंद्रे ताबडतोब गाडीजवळ गेले तेंव्हा आकाश लिंबाळकर हा गाडीच्या डाव्या बाजुला व बोनेटवर दगड मारून पाठीमागील काच तलवारीने फोडत होता.त्यास फोडु नको असे म्हणताच तो पळुन गेला.त्याने आपल्या गाडीचे नुकसान केले. अशाप्रकारची फिर्याद राहुल केंद्रे यांनी पोलीस ठाण्यात दिली.        

आखाड्यावरून मोटारसायकल घेऊन गेला तो परतलाच नाही

इमेज
  शेतातील  आखाड्यावरून मोटारसायकल घेऊन गेला तो परतलाच नाही परळी वैजनाथ, प्रतिनिधी...    शेतातील आखाड्यावरून कोणालाही न सांगता शेत मालकाची मोटरसायकल घेऊन गेला तो संपला परतलाच नसल्याप्रकरणी एका जणाविरुद्ध मोटरसायकल चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.     याबाबत पोलीस सुत्रांकडून प्राप्त अधिक माहितीनुसार, फिर्यादी  सुभाष माधवराव मुंडे वय 60 वर्षे व्यवसाय शेती रा. नाथरा ता. परळी वै. यांच्या मालकीची हिरो होंडा कंपनीची मोटारसायकल क्र. MH23 D 1477 ज्याचा चेसिज क्र. 95) 12F01466 इंजीन क्र. 95) 10E0 1790 ही जीचा मोडेल 1995 ची जुनी वापरती किंमत अंदाजे 12000/- ही मोटारसायकल यातील आरोपी राहुल बालाजी कांबळे रा. दिपेवडगाव ता. केज जि. बीड हा कोणालाही काहीएक न सांगता कोठेतरी चोरुन घेऊन गेला आहे तो आजपर्यंत परत आला नाही. त्यामुळे आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोह/1429 केकान हे करीत आहेत.

निष्काळजी व हलगर्जी

इमेज
  निष्काळजी व हलगर्जी: अज्ञात वाहनाने धडक देवुन वृद्धाला केलं जखमी परळी वैजनाथ ,प्रतिनिधी...      शहरातील रस्त्यांवर भरधाव वेगात वाहने चालवुन व धडक देवुनही जखमी किंवा आपघातग्रस्तांना उपचार व मदत मिळण्यासाठी न थांबता बिनदिक्कत निघून जाण्याचे प्रकार सर्रास घडत आहेत.असाच प्रकार एका वृद्ध इसमासोबत घडला असुन याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.       पोलीस सुत्रांकडून प्राप्त अधिक माहितीनुसार, प्रकाशराव विष्णुपंत चौलवार वय 65 वर्षे रा. परळी वै. प्रेमपन्नानगर आय.सी. सी. बँक परळी वै. यांना अज्ञात वाहनचालकाने आपल्या ताब्यातील वाहन निष्काळजीपणे व भरधाव वेगात चालवुन जोराची धडक देवुन  जखमी केले व निघून गेला. याप्रकरणी पिडीताचा मुलगा पांडुरंग प्रकाशराव चौलवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील  तपास पोह/1429 केकाण हे करीत आहेत.

पशुधनाची चोरी: चोऱ्या वाढल्या

इमेज
  दुष्काळाच्या झळा - चोर्‍यामा र्‍या वाढल्या: अंबलटेकमधून दोन गाईंची गोठ्यातून चोरी परळी वैजनाथ, प्रतिनिधी....      यावर्षी दुष्काळी झळा सहन कराव्या लागत आहेत या दरम्यानच चोर्‍यामा र्‍यांच्या घटनांतही मोठी वाढ झाली आहे.ग्रामीण भागात पशुधन चोरीला जाण्याच्या घटना मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. अंबलटेकमधून दोन गाईंची गोठ्यातून चोरी झाल्याचा प्रकार समोर आला आहे.         याबाबत पोलीस सुत्रांकडून प्राप्त अधिक माहितीनुसार, फिर्यादी निवृत्ती पाडुरंग मुंडे वय 33 वर्षे व्यवसाय- शेती रा.अंबलटेक यांची काळ्या चांभळ्या रंगाची एक गाय तीची किमंत अंदाजे 20000 रुपये व याच गावात राहणारे  धनराज भगवान नागरगोजे यांची एक लाल रंगाची गाय किमंत अंदाजे 25000 रुपये राहते घरुन गाईच्या गोठ्यातुन चोरीस गेल्या आहेत. या दोन गाई पांढ-या रंगाच्या पिकप मधील चार अज्ञात चोरट्यांनी अंधाराचा फायदा घेवुन चोरुन नेल्या असल्याचा कयास आहे. याप्रकरणी परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोह पी.व्ही. वाले हे करीत आहेत. 

प्रासंगिक लेख:✍️प्रा.डॉ.सिद्धार्थ आबाजी तायडे ●गुरुवर्य प्रा.सुरेश पुरी :अथांग स्नेहसागर

इमेज
  गुरुवर्य प्रा.सुरेश पुरी :अथांग स्नेहसागर "काही माणसं असतात  पिंपळाच्या पानासारखी कायमच हृदयाच्या पुस्तकात राहण्यासारखी" आदरणीय प्रा. सुरेश पुरी सर,म्हणजे  विद्यार्थ्यांवर निरपेक्षपणे प्रेम करणारा अथांग स्नेहसागर! जन्मापासून आपण आपल्या संपर्कात येणार्‍या प्रत्येक गोष्टीपासून, व्यक्ती पासून काही ना काही शिकत असतो. आणि म्हणून तर आपण जगण्यायोग्य बनत जातो .प्रत्येक गोष्ट ही आपल्याला शिकवण देते .ती आपली गुरुच असते.आपल्या आयुष्यात शिक्षकांची/गुरूंची खूप महत्त्वपूर्ण भूमिका असते. विद्यार्थ्यांवर चांगले आणि योग्य संस्कार करण्याची.  मनाला विविध पैलू पाडण्याचे काम उत्तम प्रकारे जी व्यक्ती करीत असते ती व्यक्ती म्हणजे आपले गुरू!प्रा. सुरेश पुरी सर,म्हणजे विद्यार्थ्यांना घडविणारे विद्यापीठच..प्रत्येक विद्यार्थ्याला मग तो वर्गातील असो किंवा वर्गाबाहेरील असो पुरी सर प्रत्येकावर आत्मीयतेने संस्कार करीत असतात. स्वतःच्या आचरणाने त्यांच्यात चांगले गुण परोपकार,त्याग,शौर्य इतरांशी वागण्याची पद्धत मोठ्यांविषयी आदर, सर्वांसाठी प्रेमाची भावना इत्यादी चांगल्या बाबी विद्यार्थ्यांमध्ये रुजवत असतात.