पोस्ट्स

मे २६, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

४ जूनला विजयाचा मोठा ध्वज मुंडे साहेबांच्या चरणी अर्पण करण्याचं केलं आवाहन

इमेज
  लोकनेते मुंडे साहेबांचा ३ जूनला दहावा स्मृतीदिन ; पंकजाताई मुंडे यांचं राज्यभरातील कार्यकर्त्यांना आवाहन यंदा गोपीनाथ गडावर नाही आलात तरी चालेल ; जिथे आहात तिथूनच मुंडे साहेबांचं पुण्यस्मरण करा, फोटोचं पूजन करा, एखादा चांगला संकल्प करा लोकसभा मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांची अडचण होऊ नये म्हणून घेतला निर्णय ४ जूनला विजयाचा मोठा ध्वज मुंडे साहेबांच्या चरणी अर्पण करण्याचं केलं आवाहन परळी वैजनाथ।दिनांक ०१। लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांचा येत्या ३ जून रोजी दहावा स्मृतीदिन असून या पार्श्वभूमीवर भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी राज्यभरातील समस्त कार्यकर्त्यांना  यावर्षी गोपीनाथ गडावर न येता  जिथे आहात तिथूनच मुंडे साहेबांचं पुण्यस्मरण करा, त्यांच्या फोटोचं पूजन करा, एखादा चांगला संकल्प करा असं आवाहन केलं आहे. ४ जूनला लोकसभेची मतमोजणी असल्याने आपल्या विजयाचा मोठा ध्वज मुंडे साहेबांच्या चरणी अर्पण करा  असंही त्यांनी म्हटलं आहे.    यासंदर्भात सोशल मिडियावर एक व्हिडिओ जारी करून पंकजाताई मुंडे यांनी कार्यकर्त्यांना विनंतीवजा आवाहन केलं आहे. पंकजाताईंनी म्हटलं आहे की,

वीस हजारांची लाच घेताना कोतवालाला पकडलं; केजचे तहसीलदार फरार

इमेज
  वीस हजारांची लाच घेताना कोतवालाला पकडलं; केजचे  तहसीलदार  फरार केज : रेशन दुकानावर कारवाई न करण्यासाठी २० हजार रूपयांची लाच घेताना केजमधील कोतवाल एसीबीच्या जाळ्यात अडकला आहे. तसेच केजचा तहसीलदार अभिजित जगताप हा देखील यात आरोपी असून तो फरार झाला आहे. ही कारवाई धाराशिव येथील पथकाने शुक्रवारी रात्री १० वाजता केली.  एसीबीने अनेक कारवाया करूनही बीड जिल्ह्यातील लाचखोरीचे सत्र सूरूच आहे. अभिजीत जगताप हा केजचा तहसीलदार आहे. मच्छिंद्र माने हा कोतवाल असून जगताप याच्यासाठी वसूलीचे काम करतो. केज तालुक्यातीलच एका रेशन दुकानदारावर कारवाई प्रस्तावित होती. ती न करण्यासाठी तहसीलदार पाटील याने २० हजारांची लाच मागितली होती. हीच लाच कोतवाल माने याने स्विकारली. परंतू तहसीलदार जगताप हा फरार झाला आहे. धाराशिव येथील लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने आठवड्यातील दुसरी कारवाई बीड जिल्ह्यात केली आहे.

पत्रकार संघाचे नवनिर्वाचित पदाधिकारी व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

इमेज
  पत्रकार संघाचे नवनिर्वाचित पदाधिकारी व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार   गेवराई (प्रतिनिधी) :- श्री जगदंबा ज्येष्ठ नागरिक सेवाभावी संस्था गेवराई व ग्राहक पंचायत महाराष्ट्र शाखा गेवराई यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 30 मे रोजी ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र गेवराई येथे अंकुशराव आतकरे यांचा गेवराई तालुका अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल यथोचित सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर इतर पदाधिकारी पत्रकार यांचा सत्कार थाटामाटा संपन्न झाला. यावेळी बहुसंख्य नागरिक कार्यक्रमास उपस्थित होते तसेच सेवाभावी संस्थेचे पदाधिकारी व ग्राहक पंचायत चे पदाधिकारी याप्रसंगी उपस्थित होते. तसेच दहावी बोर्ड परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार यावेळी करण्यात आला.                   गेवराई तालुक्यातील मनमिळाऊ स्वभावाचे सर्व पत्रकारांना व सर्व सेवाभावी संस्थेला मार्गदर्शन वेळोवेळी त्यांच्या होणाऱ्या अडीअडचणी व पत्रकार मंडळीच्या अडीअडचणीसाठी सदैव उपलब्ध असणारे व सर्वांना मदत करणारे आमचे अंकुशराव आतकरे हे सलग बारा वर्षे पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी निवड असल्यामुळे सर्वांना आनंद द्विगुणीत होत आहे. याप्रसंगी अं

गझलकार दिवाकर जोशी यांना यावर्षीचा नाना बेरगुडे स्मृती गझलयात्री पुरस्कार जाहीर

इमेज
  गझलकार दिवाकर जोशी यांना यावर्षीचा नाना बेरगुडे स्मृती गझलयात्री पुरस्कार जाहीर परळी वै. दि. 29/05/24 (प्रतिनिधी) नाना बेरगुडे स्मृती समिती सेलू जि.परभणी यांच्या वतीने दरवर्षी देण्यात येणारा आणि मराठी गझलेच्या क्षेत्रातील प्रतिष्ठित व मानाचा समजला जाणारा नाना बेरगुडे स्मृती गझलयात्री पुरस्कार यावर्षी परळी येथील सुप्रसिध्द गझलकार दिवाकर जोशी यांना जाहीर झाला आहे. महाराष्ट्र काव्यक्षितिजावर , विशेषतः गझलेच्या प्रांतात अल्पावधीतच दिवाकर जोशी यांनी आपला एक वेगळा ठसा उमटवला आहे. तंत्रशुद्ध गझललेखन करून आपल्या प्रभावी सादरीकरणाने त्यांनी रसिक श्रोत्यांची मने जिंकली आहेत.  आशय आणि अभिव्यक्ती यांच्या अभिन्नत्वामुळे व गेय गझल सादरीकरणाने त्यांची गझल रसिकमनात कायमस्वरूपी घर करून राहते. त्यांच्या सातत्यपूर्ण, दर्जेदार व महाराष्ट्रातील तमाम रसिकांच्या पसंतीस उतरलेल्या गझललेखनाची दखल घेऊन समितीने आज या मानाच्या पुरस्काराची घोषणा केली. पाच हजार रुपये रोख, स्मृतीचिन्ह व सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप असून लवकरच एका विशेष समारंभात त्यांना  हा पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आ

अल्पवयीन मुलीस पळवून नेले : गुन्हा दाखल

इमेज
  अल्पवयीन मुलीस पळवून नेले : गुन्हा दाखल परळी वैजनाथ, प्रतिनिधी...     आपल्या 16 वर्षिय अल्पवयीन मुलीस पळवून नेल्याची फिर्याद पिडितेच्या आईने दिली असुन परळीच्या संभाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.        याबाबत पोलीस सुत्रांकडून प्राप्त अधिक माहितीनुसार, परळीतील सिद्धार्थनगर भागातून  एका 16 वर्षिय मुलीला कोणीतरी अज्ञात आरोपीने दि.29/05/2024 रोजी दुपारी 2.00 ते 5.30 वा. दरम्यान अज्ञात कारणासाठी अज्ञात, ठिकाणी पळवुन घेवुन गेले असल्याची फिर्याद देण्यात आली आहे. याप्रकरणी पो.स्टे. संभाजीनगर परळी वै येथे गुरन 87/2024 कलम 363 भा.द.वी. प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास सपोनि ससाने हे करीत आहेत. 

शनैश्वर जन्मोत्सवा निमित्त 31ते 7 विविध धार्मिक, सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन: रविवारी रक्तदान शिबीर

इमेज
शनैश्वर जन्मोत्सवा निमित्त 31ते 7 विविध धार्मिक, सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन रविवारी रक्तदान शिबीर परळी वैजनाथ दि.३० (प्रतिनिधी)         येथील शनिमंदिर देवस्थान ट्रस्ट च्यावतीने शनैश्वर जन्मोत्सवा निमित्ताने विविध धार्मिक, सामाजिक, आरोग्य विषयक कार्यक्रमाचे आयोजन शुक्रवार (ता.३१) ते शुक्रवार (ता.०७) करण्यात आले आहे.          येथे दरवर्षी शनैश्वर जन्मोत्सवा निमित्त राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपुरकर व सिध्दलिंग शिवाचार्य महाराज साखरखेर्डेकर यांच्या प्रेरणेने अखंड शिवनाम सप्ताह, श्री.ग्रंथराज परमरस्य पारायण सोहळा आयोजित केला जातो. यावर्षी अखंड शिवनाम सप्ताहाची सुरुवात शुक्रवारी (ता.३१) ते शुक्रवार (ता.०७) पर्यंत करण्यात आले आहे. यानिमित्ताने विविध धार्मिक, सामाजिक, आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले आहेत. गुरुवारी (ता.०६) संध्याकाळी ७ वाजून १४ मिनिटांनी शनैश्वर जन्मोत्सव साजरा होईल, यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. यावर्षी हा महाप्रसाद शनिमंदिर मध्ये होणार आहे.  त्याचबरोबर शुक्रवारी (ता.३१) सकाळी ८ वाजता शोभायात्रा हनुमान मंदिर मोंढा येथून राणी लक्ष्मीबाई टाँवर चौक मार्ग

मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन

इमेज
  परळीत उद्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंतीनिमित्त अभिवादन रॅली व शोभायात्रेचे आयोजन परळी वैजनाथ, प्रतिनिधी...     परळीत उद्या पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर जयंतीनिमित्त अभिवादन रॅली व शोभायात्रेचे आयोजन  करण्यात आले आहे. या कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन सकल धनगर समाजाच्या वतीने करण्यात आले आहेत.             सकल धनगर समाजाच्या वतीने परळी वैजनाथ येथे उद्या 31 मे रोजी पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर जयंती कार्यक्रम होणार आहे.होळकर चौक परळी वै. येथे सकाळी 9 वा. ध्वजारोहण होईल त्यानंतर पंचम ज्योतिर्लिंग वैद्यनाथ मंदिरातील पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी अभिवादन रॅली निघणार आहे.होळकर चौक, गणेशपार, अंबेवेस मार्गे ही रॅली वैद्यनाथ मंदिर येथे जाईल. वैद्यनाथ मंदिरात पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याचे पुजन व अभिवादन करण्यात येईल.सायं.4 वा. होळकर चौक  ते राणी लक्ष्मीबाई टॉवर चौक शोभायात्रा काढण्यात येणार आहे.      पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर जयंतीनिमित्त होणाऱ्या कार्यक्रमात मोठ्या संख्ये

आरटीई प्रवेश: आता उरला शेवटचा एक दिवस : यानंतर होणार नाही मुदतवाढ

इमेज
आरटीई प्रवेश: आता उरला शेवटचा एक दिवस : यानंतर होणार नाही मुदतवाढ परळी वैजनाथ, प्रतिनिधी....         आरटीई प्रवेशाकरिता अर्ज करण्याची मुदत ३१ मे असल्याने पालकांना आता अर्ज करण्याकरता शेवटचे दोन दिवस शिल्लक आहेत. कारण त्यानंतर मुदतवाढ दिली जाणार नसल्याचे शिक्षण विभागाने म्हटले आहे.       शिक्षण विभागातर्फे शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) प्रवेशासाठी ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया राबवली जात असून, ३१ मे अंतिम मुदत असल्याने त्यानंतर कोणत्याही परिस्थितीत मुदतवाढ दिली जाणार नाही. अर्थात, त्यापूर्वीच जागांपेक्षा दुप्पट अर्ज आल्याने आता शाळा प्रवेशासाठी सोडत (लॉटरी) काढावी लागणार हे स्पष्ट झाले आहे. आरटीई प्रवेशासाठी राज्य सरकारने विद्यार्थ्याच्या राहत्या ठिकाणापासून एक किलोमीटर परिसरातील अनुदानित, शासकीय किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेतच प्रवेश दिला जाईल, असा निर्णय घेतला होता. परंतु या निर्णयाला विरोध दर्शवत पालकांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. पालकांच्या याचिकेवर सुनावणीनंतर न्यायालयाने शासनाच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे. त्यामुळे आता सर्वसामान्य मुलांनाही इंग्रजी माध्यमांच्या खा

कोल्हापूर टस्कर संघामध्ये निवड

इमेज
परचुंडी तालुका परळी वैजनाथचा युवा क्रिकेटपटू भूषण नावंदे ‘एमपीएल’मध्ये चमकणार कोल्हापूर टस्कर संघामध्ये निवड परळी ता. 29 ः शहरातील उदयोन्मुख युवा क्रिकेटपटू भूषण नावंदे यंदाच्या महाराष्ट्र प्रिमियम लिगमध्ये (एमपीएल) चमकणार आहे. कोल्हापूर टस्कर संघात भारताचा धडाकेबाज क्रिकेटपटू केदार जाधव यांच्या नेतृत्वाखाली भूषण खेळणार आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनतर्फे ‘आयपीएल’च्या धर्तीवर महाराष्ट्र प्रिमियम लीगचे गेल्या काही वर्षांपासून आयोजन केले जात आहे. यंदा दोन जूनपासून सुरू होणाऱ्या ‘एमपीएल’मध्ये सहा संघ सहभागी झाले आहेत. त्यात छत्रपती संभाजी किंग्ज, ईगल नाशिक टायटन्स, कोल्हापूर टस्कर, पुणेरी बाप्पा, रत्नागिरी जेट्स, सोलापूर रॉयल्स संघांचा समावेश आहे. परचुंडी तालुका परळी वैजनाथ येथील भूषण नावंदे याची पुनीत बालन प्रायोजक असलेल्या कोल्हापूर टस्कर या संघामध्ये निवड झाली आहे. केदार जाधव यांच्या नेतृत्वाखालील संघात अंकित बावणे यांच्यासह अनेक दिग्गज खेळाडू आहेत. त्यात भूषण याची वर्णी लागली आहे. भूषण याने यापूर्वी अनेक स्पर्धा गाजविल्या आहेत. सय्यद मुश्‍ताक अली सराव शिबिरात त्याची निवड झाली होती.

संपर्क अधिकाऱ्यांची नावे, पत्ता व सपंर्क क्रमांक

इमेज
  शेतकऱ्यांसाठी तक्रार निवारण कक्षांची स्थापना बीड, दि. 29 (जिमाका) : बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना  वर्ष  २०२४-२५ मध्ये कृषि निविष्ठा वियाणे, खते व किटकनाशके योग्य दर्जाचे, योग्य वेळी व योग्य किमतीत मिळण्याच्या दृष्टीने तसेच तालुका निहाय पुरवठा होणा-या निविष्ठांची विक्री सुरळीतपणे होण्यासाठी कृषि निविष्ठा तक्रार निवारण कक्षांची स्थापना करण्यात आली आहे. कृषि निविष्ठा कक्ष हा खरीप हंगामसाठी दिनांक १५ मे  ते दिनांक १५ ऑगस्ट व रब्बी हंगामासाठी दिनांक  १५  सप्टेंबर ते दिनांक१५ नोव्हेंबर या कालावधी आपल्याकडील मुळ पदभार सांभाळुन  आदेशान्वये देण्यात आलेले काम नियमीत पार पाडण्याचे सांगीतले आहे. तक्रार निवारण कक्षात तक्रार निवारणा-या नोंदणीसाठी स्वतंत्र नोंदवही ठेवण्यात यावी. शेतक-यांकडुन तक्रारी प्राप्त होताच नोंदवही मध्ये तक्रारदार शेतक-यांचे नावे, तक्रारीच स्वरूपात तक्रार प्राप्त दिनांक, वेळ संपुर्ण पत्ता, मोबाईल क्रमांक इ.असणे आवश्यक आहे. तक्रार प्राप्त होताच तात्काळ उचित कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. यासाठी खालील अधिकाऱ्यांची नावे दिलेली आहेत. त्यांना सकाळी 10 ते सांयकाळी 7 वा

मतमोजणीच्या कालावधीत मतमोजणी परिसरात फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 144 लागू

इमेज
मतमोजणीच्या कालावधीत मतमोजणी परिसरात फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 144 लागू बीड, दि. 29 (जिमाका): भारत निवडणूक आयोगाने दि. 16 मार्च 2024 रोजी सन 2024 च्या सार्वत्रिक लोकसभा निवडणूकीचा कार्यक्रम घोषीत  केला असून कार्यक्रम घोषीत केल्याच्या दिनांकापासून आदर्श आचार संहिता अंमलात आहे. 39- बीड लोकसभा मतदारसंघाचे मतदान दिनांक 13 मे 2024 रोजी झाले असून विधानसभा निहाय मतमोजणी, दिनांक 04 जून 2024 रोजी शासकीय तंत्रनिकेतन, नाथापूर रोड बीड येथे विधानसभा निहाय सकाळी 8.00 वाजेपासून होणार आहे. बीड जिल्ह्यातील लोकसभा निवडणूकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातून आणि कायदा व सुव्यवस्था अबाधीत राखण्यासाठी ज्या ठिकाणी मतमोजणी होणार आहे, त्या ठिकाणी फौजदारी प्रक्रीया संहिता 1973 चे कलम 144 लागू करणे आवश्यक आहे. मतमोजणी केंद्राच्या ठिकाणापासून 200 मीटर परिसरातील सर्व पक्ष कार्यालय/उमेदवारांचे मंडप, सर्व दुकाने, मोबाईल, कॉर्डलेस फोन, पेजर, वायरलेस सेट, ध्वनीक्षेपके, सर्व प्रकारचे फेरीवाले व ईतर ईलेक्ट्रॉनिक उपकरणे, निवडणूकीच्या कामाव्यतिरीक्त खाजगी वाहन व निवडण

आईच्या सेवा गौरवाने मानवाचा इहलोक व परलोक सफल होतो - कुलगुरू डॉ .महावीर आचार्य

इमेज
माता कौशल्यादेवी लोहिया गौरवार्थ आयुष्कामेष्टी यज्ञ , ग्रंथतुला व मातृ-वंदना कार्यक्रम  आईच्या सेवा गौरवाने मानवाचा इहलोक व परलोक सफल होतो -कुलगुरू डॉ. महावीर आचार्य   परळी वैजनाथ दि.२९--         या जगात आई हे सर्वात मोठे  दैवत असून जीवनात सर्व काही मिळो वा न मिळो, पण ज्याला आईचे कृपाछत्र लाभते, ते  मानव भाग्यशाली समजले जातात. अशा मातेचा जे जीवनभर मनोभावे सेवा- सत्कार  करतात, त्यांना सर्व प्रकारच्या सुख व ऐश्वर्याची प्राप्ती होते आणि त्यांचा इहलोक व परलोक सफल ठरतो, असे उद्गार प्रसिद्ध विचारवंत व हरिद्वार येथील पतंजली विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. महावीर आचार्य यांनी काढले.           येथील अक्षता मंगल कार्यालयात आदर्श माता श्रीमती कौशल्यादेवी रामपाल लोहिया यांच्या ९१ व्या वर्षपूर्तीनिमित्त आयोजित ग्रंथतुला, आयुष्कामेष्टी यज्ञ व मातृ-वंदना समारंभात डॉ .श्री आचार्य हे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी शतायुषी तपस्वी समाजसेवक स्वामी सोमानंद सरस्वती हे होते. प्रारंभी श्रीमती लोहिया यांचा मान्यवरांच्या शुभहस्ते शाल ,मानपत्र व पुष्पहार प्रदान करून सत्कार करण्यात आला.            आपल्य

बोरखेड येथील शेतातील सौर उर्जा संच कोसळला

इमेज
शेतकऱ्यांच्या सौर उर्जा संचाचे वादळाने मोठे नुकसान  बोरखेड येथील शेतातील सौर उर्जा संच कोसळला परळी वैजनाथ (प्रतिनिधी) परळी तालुक्यात दि.25 व 26 मे रोजी आलेल्या वादळात विविध ठिकाणी मोठे नुकसान झाले आहे. या वादळात शेतकऱ्यांच्या सौर उर्जा संचाचेही वादळाने मोठे नुकसान झाले आहे.       भीषण दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांपुढे मोठे आव्हान उभे राहिले आहे.बोरखेड येथील शेतातील सौर उर्जा संच कोसळल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. बोरखेड शिवारातील गट नं.96 मधील विनय सुंदरराव वानखेडे यांच्या शेतातील सौर उर्जा संच, प्लेटस् असे कोसळले आहे.अचानक आलेल्या वादळामुळे संपूर्ण संच उडून गेल्याने मोठे नुकसान झाले आहे.या नुकसानीची प्रशासनाने नोंद घ्यावी अशी मागणी शेतकर्‍याकडून होत आहे.

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर जयंती सिरसाळा ग्रामपंचायत कार्यालय येथे मोठ्या उत्साहात साजरी

इमेज
  स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर जयंती सिरसाळा ग्रामपंचायत कार्यालय येथे मोठ्या उत्साहात साजरी सिरसाळा-  सिरसाळा ता. परळी वै  येथे दि. 28 मे रोजी सावरकर प्रेमीतर्फे  स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची 141वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.  यावेळी सिरसाळ्याचे सरपंच अन्वर पट्टेदार, सेवा सहकारी सोसायटी चे चेअरमन संतोष पांडे, देवराव काळे, रघुनाथ देशमुख, दत्ताकाका देशमुख, बाळासाहेब पांडे, हेमंत लोंढे, सतिश काळे, प्रशांत देशमुख, दिगंबर देशमुख , अविनाश देशमुख, अनिल देशमुख, सुनील देशमुख, व्यंकटेश काळे, अशोक चव्हाण, राजेंद्र जोशी,विश्वांभर देशमुख, बालासाहेब घनघाव इत्यादी सावरकर प्रेमी उपस्थित होते.

तीपन्ना धोत्रे यांचे निधन

इमेज
  तीपन्ना धोत्रे यांचे निधन परळी वै.(प्रतिनिधी)       परळी शहरातील सामाजिक कार्यात सतत सहभागी असणारे तिपन्ना लक्ष्मण धोत्रे यांचे दीर्घ आजाराने बुधवारदिनांक 29 रोजी सकाळी सात वाजण्याच्या दरम्यान निधन झाले मृत्यू समयी ते 68 वर्षाचे होते परळी माजी न.प.सभापती रुक्‍मीनबाई धोत्रे यांचे ते पती होते. दरम्यान  तीपन्ना धोत्रे हे अत्यंत सुस्वभावी होते. सामाजिक कार्यामध्ये ते नेहमी कोणाच्याही मदतीसाठी पुढाकार घेत असत. ते मागील काही दिवसापासून आजारी होते  बुधवार दिनांक 29 जून रोजी सकाळी सात वाजण्याच्या दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले पाच मुली नातवंडे असा परिवार आहे त्यांच्यावर बुधवारी सायंकाळी सहा वाजता वडार समाज स्मशान भूमीमध्ये   अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत.

तक्षशिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व साप्ताहिक मानपत्र च्या वतीने आयोजन

इमेज
  तक्षशिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व साप्ताहिक मानपत्र च्या वतीने 15 जून रोजी दहावी बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या सत्काराचे आयोजन बालासाहेब जगतकर                         परळी प्रतिनिधी-- परळी शहरातील तक्षशिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व साप्ताहिक मानपत्र च्या वतीने दिनांक 15 जून 2024 रोजी दहावी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले आहे.        दहावी व बारावीनंतर काय या विषयावर मार्गदर्शन ही होणार असून या विषयावर विविध क्षेत्रातील मान्यवरांना निमंत्रित करण्यात येणार असल्याची माहिती ही तक्षशिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष तथा साप्ताहिक मानपत्र चे संपादक बालासाहेब जगतकर यांनी दिली आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की गेल्या अनेक वर्षापासून परळी शहरातील तक्षशिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व साप्ताहिक मानपत्र च्या वतीने परळी शहरातील भीम नगर साठे नगर प्रबुद्ध नगर रमान नगर इत्यादी नगरच्या दहावी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या पाठीवर शाब्बासकीची कुणीतरी थाप मारावी जाने करून त्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळेल हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून दहावी

हार्दिक अभिनंदन!!!!

इमेज
  श्रीराम नितीन कुलकर्णी चे दहावी बोर्ड परीक्षेत उतुंग यश             परळी वैजनाथ:- विद्यावर्धिनी विद्यालय परळी वैजनाथ चा विद्यार्थी श्रीराम नितीन कुलकर्णी याने महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परीक्षेत (१० वी) 92.80% गुण घेऊन घवघवीत यश संपादन केले आहे.त्याच्या या उत्तुंग यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.       श्रीराम नितीन कुलकर्णी याने इयत्ता दहावी बोर्ड परीक्षेमध्ये 92.80% गुण घेऊन यश संपादन केले आहे. श्रीराम हा नाथ प्रतिष्ठानचे सचिव नितीन कुलकर्णी यांचा सुपुत्र आहे. श्रीरामने अथक परिश्रम करून सातत्य पूर्ण अभ्यास करून हे यश संपादन केले आहे. त्याच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. 

परभणी पोलीसांनी सराईत गुन्हेगाराला परळीतून उचलले !

इमेज
  परभणी पोलीसांनी सराईत गुन्हेगाराला परळीतून उचलले ! परळी वैजनाथ  ,प्रतिनिधी       परभणी जिल्ह्यासह परभणी शहरातील ठाण्याअंतर्गत वाढलेल्या मोटारसायकल चोरीचा आढावा पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी यांनी घेत तपासासाठी स्थानिक गुन्हा शाखेचे पथक तयार केले. पथकाने या चोरीचा छडा लावत आंबाजोगाई.येथील रहिवासी असलेल्या आरोपीला परळी येथून सापळा लावून मोठ्या शिताफीने ताब्यात घेत त्याच्याकडून 20 मोटारसायकली जप्त केल्या. त्या आरोपीची चौकशी केल्यानंतर परभणी, सोलापूर व लातूर जिल्ह्यातील दहा गुन्हे केल्याची कबुली दिली.          या अनुषंगाने फौजदार अजित बिरादार, अंमलदार बालासाहेब तुपसमुंद्रे, रवी जाधव, रफियोद्दीन शेख, निलेश परसोडेख हुसैन पठाण, सायबरचे गणेश कौटकर, बालाजी रेड्डी, गौस पठाण यांच्या पथकाने गोपनीय मिळालेल्या माहितीवरून अखिल महेबूब शेख (रा. मंगळवार पेठ, अंबाजोगाई जि. बीड, ह.मु. परभणी) याने मोटारसायकल चोरीचे अनेक गुन्हे केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर मोठ्या शिताफीने  परळी येथून त्याला ताब्यात घेतले.गुन्हे शाखेचे सपोनि. भारती, मुत्तेपोड, फौजदार गोपीनाथ वाघमारे, अजित बिरादार यांच्याअधिपत्याख

सोशल मीडियावरील 263 पोस्टही हटवल्या !

इमेज
बीड पोलीसांचा सोशल मीडियावर वाॅच: 400 जणांना नोटीस, 16 गुन्हे दाखल; सोशल मीडियावरील 263 पोस्टही हटवल्या बीड :  जिल्ह्यातील जातीय वादावर आता कायदेशीर कारवाई सुरू झाली असून पोलिसांनी सोशल मीडिया अकाऊंटवरही वॉच ठेवला आहे. बीड लोकसभा निवडणुकांच्या प्रचारादरम्यान मराठा विरुद्ध मराठेत्तर असा वाद पाहायला मिळाला. तर, निवडणुका पार पडल्यानंतरही त्याचे पडसाद दिसून येत आहेत. बीडमध्ये  मराठा आणि मराठेत्तर असा थेट राजकीय संघर्ष पाहायला मिळाला. त्यातूनच हा वाद सोशल मीडियातून अधिक तीव्र होतानाचे चित्र पाहायला मिळाले. त्यामुळे, बीड पोलीस प्रशासन आता खडबडून जागं झालं आहे. बीड  जिल्ह्यात जातीय सलोखा आणि शांतता टिकवून ठेवण्यासाठी पोलिसांनी  कारवाईला सुरुवात केली आहे. त्याच, अनुषंगाने जिल्ह्यात 16 गुन्हे दाखल झाले आहेत. लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड जिल्ह्यात टोकाच्या जातीय द्वेष पसरवण्याचं काम सोशल मीडियाच्या माध्यमातून होत झाल्याचं दिसून आलं. सोशल मीडियातील याच पोस्टमुळे अनेक ठिकाणी मोठा वाद निर्माण झाला असून काही ठिकाणी दगडफेकीच्याही घटना घडल्या आहेत. 400 जणांना नोटीसा बीड पोलिसांनी आता सोशल मीडियावर वॉच

महिला महाविद्यालयात स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती साजरी

इमेज
  महिला महाविद्यालयात स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती साजरी परळी वैजनाथ दि.२८ (प्रतिनिधी)               शहरातील लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.       कार्यक्रमाच्या सुरुवातीला संस्थेच्या संचालिका तथा महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ विद्याताई देशपांडे, माजी प्राचार्य डॉ लक्ष्मण मुंडे यांच्या हस्ते स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रा डॉ मनिषा रोकडे यांनी सावकरकर यांच्या जीवन कार्याच्या आढावा घेत असताना सांगितले की, सावरकर म्हणजे देशप्रेमाचे दुसरे नाव आहे. सावरकरांमध्ये देशभक्ती ठासून भरलेली होती. यावेळी प्रा डॉ मुंडे, प्राचार्या डॉ देशपांडे यांनी आपले मनोगते व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रा प्रविण फुटके यांनी मानले. कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

निकालाची उज्ज्वल परंपरा कायम

इमेज
  रेणुबाई देवी विद्यालयालाचा निकाल 98.86 टक्के निकालाची उज्ज्वल परंपरा कायम बीड|प्रतिनीधी दि.27ः वडवणी तालुक्यातील देवडी येथील रेणुबाई विद्यालयाचा निकाल 98.86 टक्के लागला असून 88 पैकी 48 विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य मिळवले तर उर्वरित विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले विद्यार्थ्यांनी विद्यालयाची उज्ज्वल परंपरा कायम ठेवली असून शार्दुलेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मोहनराव सोळंके (काका) यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.  मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या दहावी परिक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून विद्यालयातून कु .रेवती कैलास बादाडे हिने (92.40) टक्के मिळवून प्रथम क्रमांक मिळवला आहे. तर द्वितीय क्रमांक कु.अनुराधा विठ्ठल घाडगे हिने (89.40) टक्के तसेच तृतीय क्रमांक चि.सौरभ सिध्देश्वर होके याने (88.60) टक्के घेऊन विद्यालयाची यशाची उज्ज्वल परंपरा कायम ठेवली आहे. यावेळी संस्थेचे सचिव आर.व्ही सोळंके, तसेच शाळेचे मुख्याध्यापक पंडित तिडके,सर्व शिक्षक तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या आह

स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती परळी वैद्यनाथ येथे मोठ्या उत्साहात साजरी

इमेज
परळी वैद्यनाथ येथे स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर जयंती  मोठ्या उत्साहात साजरी परळी- आज दिनांक 28 मे रोजी परळी येथे सावरकर प्रेमी तर्फे हिंदुहृदयसम्राट स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची 141वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.         यावेळी अॅड.अरुण पाठक यांनी सावरकरांचा जीवन परिचय आणि संघर्ष याची उपस्थितांना माहिती दिली. यावेळी  किशोर कुलकर्णी,अॅड. अरुण पाठक, प्रमोद औटी,विशाल पाठक, जयराम गोंडे, दिनेश लोंढे, दत्ताभाऊ कुलकर्णी, प्रा. अतुल नरवाडकर, ऋषिकेश कुलकर्णी, राधाकिसन कुलकर्णी, अनंता कुलकर्णी, विश्वंभर देशमुख, राजेंद्र दगडगुंडे, सचिन अग्निहोत्री, सुशांत मुळी, नागेश जोशी गुरु इत्यादी उपस्थित होते.

कु. कौशिकी महेंद्र कुलकर्णी हिचे दहावी बोर्ड परीक्षेत उतुंग यश

इमेज
 कु. कौशिकी महेंद्र कुलकर्णी हिचे दहावी बोर्ड परीक्षेत उतुंग यश   गेवराई :- सेंट झेवियर्स स्कूल गेवराई, कु. कौशिकी महेंद्र कुलकर्णी हिने राज्य माध्यमिक शाळांत परीक्षेत 95% गुण घेऊन प्रथम श्रेणीत येण्याचा बहुमान मिळविला आहे. तिच्या या उत्तुंग यशाबद्दल तिचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.          कु. कौशिकी महेंद्र कुलकर्णी हिने इयत्ता दहावी बोर्ड परीक्षेमध्ये 95% गुण घेऊन यश संपादन केले आहे. कु. कौशिकी ही महेंद्र कुलकर्णी हे ग्रामीण रुग्णालय उमापूर येथे कार्यरत आहेत त्यांच्या कन्या आहेत. सौ. विजयश्री महेंद्र कुलकर्णी ग्राहक पंचायत महाराष्ट्र गेवराई येथील सदस्य आहेत. कु. कौशिकी हिने अथग परिश्रम करून सातत्य पूर्ण अभ्यास करून यश संपादन केले आहे. कु. कौशिकी ही खूप गुणवान असून लहानपणीपासून विविध स्पर्धा परीक्षेत यश संपादन केले आहे. कु . कौशिकी  हिने इंग्लिश विषयात 95 ,मराठी 89, गणित 95,सायन्स अँड टेक्नॉलॉजी 96,सोशल सायन्स 95, मार्क असे 500 पैकी 475 मार्क घेतले आहेत. तिच्या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. तिच्या यशाबद्दल ग्राहक पंचायत महाराष्ट्र बीड जिल्हा उपाध्यक्ष व श्री जगदंबा सेवाभावी स

दुख:द वार्ता : भावपूर्ण श्रद्धांजली !!!

इमेज
  कामगार नेते कॉ.प्रा.पंडित मुंडे यांचे निधन परळी / प्रतिनिधी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जेष्ठ कामगार नेते कॉ.प्रा.पंडितराव मुंडे प्रदीर्घ आजाराशी झुंज देत अखेर प्राणज्योत मालवली.परळी तालुक्यातील नाथरा येथील मूळचे रहिवासी असलेले प्रा.मुंडे हे हल्ली छत्रपती संभाजी नगर येथे वास्तव्यास होते. कॉ.प्रा.पंडित मुंडे हे छत्रपती संभाजी नगर येथील वसंतराव नाईक महाविद्यालयात वाणिज्य विभाग प्रमुख पदावरून सेवा निवृत्त झाले होते तर त्याच्या पत्नी श्रीमती सुलभा मुंडे (जाधवर)  ह्या मराठवाडा शिक्षक संघाच्या माजी कार्याध्यक्षा व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका राज्य पुरस्कार प्राप्त झालेल्या आहेत.दोन्ही दांपत्य आपल्या कर्तव्यासोबत सामाजिक कार्यात अग्रणी राहून कामगारांसाठी त्यांनी मोठे योगदान दिलेले आहे.कॉ.प्रा.पंडित मुंडे यांच्या पार्थिवावर दि 29 रोजी सकाळी 10 वाजता त्याच्या मूळगावी नाथरा ता-परळी येथे अंत्यसंस्कार होणार आहेत.कॉ.प्रा.पंडित मुंडे यांच्या या निधनाने जेष्ठ कामगार नेता गमावला आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती उत्साहात साजरी

इमेज
स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती उत्साहात साजरी  पाटोदा/प्रतिनिधी......        पाटोदा शहरातील ग्रामदैवत भामेश्वर मंदिर येथे दरवर्षी प्रमाणे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची जयंती प्रतिमा पूजन व अभिवादन करून साजरी करण्यात आली यावेळी प्रतिष्ठित व्यापारी दिलीप सेठ कांकरिया यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले.           यावेळी माजी नगरसेवक तथा पत्रकार विजय जोशी,राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉ.संजय कवठेकर , महावितरण चे सतीश गोरे , अशोक दीक्षित, प्रकाश महाराज नाईकनवरे, तेली संघटनेचे बाळासाहेब शिंदे, योगेश पंडित, हरिभाऊ राऊत , पत्रकार अमोल जोशी, गणेश पांडव, गणेश खंडागळे, जवाहर सेठ कांकरिया, भागवत भाकरे,सुहास नाईकनवरे, मधुकर शिंदे, यांच्यासह अनेक सावरकर प्रेमी नागरिक प्रतिमा पूजन व अभिवादन सोहळ्यास उपस्थित होते

12 th फेल चित्रपट कथानकाची परळीत पुनरावृत्ती :10th टाईम्स 10 th फेल !

इमेज
  12 th फेल चित्रपट कथानकाची परळीत पुनरावृत्ती :10th टाईम्स 10 th फेल ! बापाचा नाद खुळा ! मुलगा १० वेळा नापास तरीही जिद्द कायम;अखेर ११ व्या प्रयत्नात १० वीला गाठलं ‘मॅजिक सक्सेस’ परळी वैजनाथ, प्रतिनिधी...       12 th फेल या सत्यकथेवर आधारलेल्या चित्रपटच्या कथानकाची परळी तालुक्यात  पुनरावृत्ती झाल्याचे उदाहरण १० वी च्या निकालानंतर समोर आले आहे. अतिशय रंजक वाटावी अशी ही सत्य कथा असून तब्बल १० वेळा दहावीला नापास झालेल्या आपल्या मुलाला कोणत्याही परिस्थितीत पास होईपर्यंत परीक्षा द्यायलाच लावायची या जिद्दीला पेटलेल्या वडिलांची इच्छा अखेर पूर्ण झाली आहे. आज जाहीर झालेल्या निकालात ११ व्या प्रयत्नात या मुलाने अखेर मॅजिक सक्सेस मिळवले आहे मिळवले आहे. या गोष्टीचा त्याच्या कुटुंबीयालाच नाही तर अख्या गावाला आनंद झाला आहे.          १२ वी फेल हा २०२३ चा विधू विनोद चोप्रा दिग्दर्शित, निर्मित आणि लिखित भारतीय हिंदी-भाषेतील चरित्रात्मक नाट्य चित्रपट आहे. हे भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी बनण्यासाठी अत्यंत गरिबीवर मात करणाऱ्या मनोज कुमार शर्मा यांच्याविषयी अनुराग पाठक यांच्या २०१९ च्या नामांकित नॉन-फिक

व्हायरल....व्हायरल | video नंतर आता सोशल माध्यमातून अनावृत्तपत्र!

इमेज
  मुंडेवाडीच्या व्हायरल व्हिडिओ प्रकरणानंतर सोशल मीडियातून एक अनावृत्तपत्र मोठ्या प्रमाणावर व्हायरल बीड, प्रतिनिधी...       बीड जिल्ह्यातील जातीय तेढीची संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा सुरू झाली आहे.  मुंडेवाडी या केज तालुक्यातील गावाने मराठा समाजा बाबतीत एक ठराव घेतल्याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला. या व्हिडिओवरून मोठ्या प्रमाणावर क्रिया- प्रतिक्रिया सुरू आहेत. बीडच्या पोलीस अधीक्षकांनी तातडीने मुंडेवाडी येथे भेट देऊन नागरिकांची समजूत काढली आहे. तसेच जातीय सलोखा कायम राहण्यासाठी सर्व स्तरातून आवाहन करण्यात येत आहे. त्यानंतर आता सोशल माध्यमातून मराठा समाजाला उद्देशून एक अनावृत्तपत्र लिहण्यात आले असून हे अनावृत्तपत्र मोठ्या प्रमाणावर सोशल माध्यमातून व्हायरल होताना दिसत आहे. ' मराठा समाजाला उद्देशून एका वंजारी ऊसतोड कामगाराच्या मुलाने लिहिलेले अनावृत्त पत्र' या मथळ्याखाली हे पत्र लिहलेले असुन विविध सोशल मीडियावर हे मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतांना दिसत आहे. ■ नेमकं काय लिहिलंय या अनावृत्त पत्रात ? मराठा समाजाला उद्देशून एका वंजारी ऊसतोड कामगाराच्या मुलाने लिहिलेले अ

प्रत्येक तालुकानिहाय नियंत्रण कक्ष

इमेज
  वादळी वारे व वीज पडल्यामुळे शेतीपिकांचे नुकसान व पशुधनाची हानी: तातडीने पंचनामे करण्याचे  जिल्हाधिकाऱ्यांकडून आदेश बीड, प्रतिनिधी.....            दि. २५ / २६ मे रोजी बीड जिल्ह्याच्या काही भागात वादळी वारे व वीज पडल्यामुळे शेतीपिकांचे व पशुधनाची हानी झालेली आहे. या नूकसानीची पाहणी करुन पंचनामे करण्याबाबत सर्व उपविभागीय अधिकारी व तहसिलदार यांना जिल्हाधिकारी दिपा मुधोळ-मुंडे यांनी सुचना देण्यात आलेल्या आहेत.        बाधित व्यक्तींना मदत करण्यासाठी सर्व तहसिल कार्यालयांमध्ये नायब तहसिलदार महसूल यांचा समावेश असलेला नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे. कोणत्याही नागरिकांना नैसर्गिक आपत्तीमध्ये झालेल्या नुकसानीबाबत काही माहिती ‌द्यावयाची असल्यास त्यांनी खालील क्रमांकावर संपर्क साधावा. असे आवाहन श्रीमती. दीपा मुधोळ मुंडे, जिल्हाधिकारी बीड यांनी केले आहे. प्रत्येक तालुकानिहाय नियंत्रण कक्ष अ.क्र. १. बीड (श्री. सुरेंद्र डोके) ९४२२७४२६७५ २. गेवराई (श्री. सुभाष कट्टे)     ८४८४९१४४४४ ३.शिरूर (श्री. शिवनाथ खेडकर) ९९२२६२२०२५ ४. वडवणी (श्री. संजय जिरंगे) ९५५२०६४७६७ ५. धारूर (श्री. प्रक

कपडे धुण्यासाठी गेलेल्या मायलेकरांचा तलावात बुडून मृत्यू

इमेज
  कपडे धुण्यासाठी गेलेल्या मायलेकरांचा तलावात बुडून मृत्यू आष्टी, एमबी वृत्तसेवा  तालुक्यातील पिंपळगाव घाट गावामध्ये रहिवाशी वैष्णवी शंकर घोडके या त्यांच्या मुलांसोबत म्हणजे समर्थ घोडके सोबत गावालगत केळ पिंपळगाव व पिंपळगाव घाट या दोन्ही शिवाराच्या मधोमध असणाऱ्या तलावावर कपडे धुण्यासाठी गेलेल्या होत्या कपडे धुत असताना मुलगा समर्थ तलावामध्ये बुडत असताना पाहुन त्याची आई म्हणजे वैष्णवी यांनी त्याला वाचवण्यासाठी धाव घेतली परंतु त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात या दोन्ही मायलेकरांचा तलवात बुडून मृत्यू झाल्याची घटना दि.२५ मे रोजी दु.३ वाजण्याच्या सुमारास घडली या घटनेची माहिती मिळताच अंभोरा पोलिस ठाण्याचे सपोनि मंगेश साळवे, उपनिरीक्षक भडके, केदार, गर्जे,पैठने हे घटनास्थळी पोहोचुन पंचनामा केला व मृतदेह.     शव विच्छेदन साठी अहमदनगर येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. Video .....   आहे.

जिल्ह्यात ग्राहकांना योग्य दरात वाळू उपलब्ध करून द्या- अनिल बोर्डे

इमेज
  जिल्ह्यात ग्राहकांना योग्य दरात वाळू उपलब्ध करून द्या- अनिल बोर्डे                                                       गेवराई :- बीड जिल्ह्यात व गेवराई तालुक्यात गेवराई शहरामध्ये बांधकाम ग्राहकांना कमी किमतीत  रकमेमध्ये वाळू मिळावी असे शासनाचे धोरण असताना प्रत्यक्षात मात्र ग्राहकांना चढ्या दराने वाळू खरेदी करावी लागते याबाबत बीड जिल्हा ग्राहक पंचायतचे उपाध्यक्ष व गेवराई ग्राहक पंचायत मार्गदर्शन केंद्रप्रमुख अनिल बोर्डे यांनी गेवराई येथील नायब तहसीलदार श्री संजय जी सोनवणे यांच्याकडे निवेदन सादर करण्यात आले आहे.                  सध्या बीड जिल्ह्यात व इतर नद्यांमधून व गोदावरी पात्रातून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा होत असल्याचे निदर्शनास येत आहे . यावर शासनाने वेळीच  कार्यवाही  करणे आवश्यक आहे. परंतु तसे होताना निदर्शनास येत नाही. त्यामुळे ग्राहकांना वाळू चढ्या दराने घ्यावी लागते. त्यामुळे शासनाचा महसूल देखील वसूल होत असल्याचे दिसत नाही. त्यामध्ये शासनाची मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन ग्राहकाची देखील पिळवणूक होत आहे. महाराष्ट्र शासनाच्या नियमाप्रमाणे ग्राहकांना योग्य दरात वाळू उपलब्ध व्हावी