MB NEWS-धनंजय मुंडेंच्या संकल्पनेतून परळीत तीन दिवसीय 'भीम महोत्सवाचे आयोजन

आज 75 कलाकारांचा चमू असलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाचा उदय साटम यांचा भीमगीतांचा 'वंदन भीमराया' कार्यक्रम 



परळी (दि. 14) - सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून परळी येथे तीन दिवसीय 'भीम महोत्सवाचे' आयोजन करण्यात आले असून शुक्रवारी (दि. 15) सायंकाळी 7 वा. प्रख्यात गायक उदय साटम यांचा भीमगीतांचा 'वंदन भीमराया' हा कार्यक्रम शहरातील मोंढा मैदान येथे होणार आहे. 


आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजलेला उदय साटम यांचा 75 कलाकारांचा चमू व त्यातून साकारण्यात येणारी भीम वंदना म्हणजे अलौकिक कार्यक्रम असून या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन महोत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे. 



या तीन दिवसीय महोत्सवांतर्गत दि. 15 एप्रिल रोजी सायंकाळी 7 वा. कलारंजना मुंबई, निर्मित व उदय साटम दिग्दर्शित 75 कलाकारांचा समावेश असलेला वंदन भीमराया हा कार्यक्रम होईल. दि. 16 एप्रिल रोजी प्रसिद्ध गायक आदर्श शिंदे यांचा लाईव्ह भीम गीतांचा जंगी कार्यक्रम होईल व अखेरच्या दिवशी 17 एप्रिल रोजी प्रा. प्रकाशकुमार वाघमारे प्रस्तुत 'भीमा तुझ्या जन्मामुळे' या प्रसिद्ध नाटकाचा प्रयोग होईल. हे तीनही कार्यक्रम परळी शहरातील मोंढा मैदानात सायंकाळी 7 वा. होणार असून, या कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे. 


परळी शहरात सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांसोबतच जातीपाती बाजूला ठेऊन सर्व महापुरुषांच्या जयंतीचे भव्य स्वरूपात आयोजन करण्याची परंपरा धनंजय मुंडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी मागील अनेक वर्षांपासून जोपासली आहे. त्याच परंपरेचा भाग म्हणून हा जयंती उत्सव कोविडच्या निर्बंध मुक्तीनंतर भव्य स्वरूपात आयोजित करण्यात येत आहे.

हे देखील वाचा/पहा🔸

• Click करा: अॅक्सिस बँकेत नौकरभरती


Click &Read: रिक्त शासकीय पदभरतीबाबत शासननिर्णय जारी


क्लिक करा व वाचा:🏵️ *आज 75 कलाकारांचा चमू असलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाचा उदय साटम यांचा भीमगीतांचा 'वंदन भीमराया' कार्यक्रम*


Click &read: अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून चाकुने वार करून पतीने केला एकाचा खुन तर पत्नीला केले जखमी*


Click &watch: *🏵️भक्तीरस:🏵️* *मोठ्या महादेवाची वारी झाली भाविक महादेवाची काठी घेऊन प्रभु वैद्यनाथाच्या भेटीला!*


Click &read:*राष्ट्रवादी काँग्रेस परळीच्या वतीने ना.धनंजय मुंडे यांच्या उत्तम आरोग्यासाठी प्रभु वैद्यनाथांना रुद्राभिषेक*


Click &Watch: 🏵️ *•लक्षवेधक•* 🏵️ *भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती:परळीत स्वखर्चाने उभारला आकर्षक देखावा.*


⬛ *पहा: उद्या रिलीज होणारे सौंदरमल माता-कन्येने गायिलेले "बागेचा माळी हाय माय जगा वेगळा" संपूर्ण गीत....!* _MB NEWS ला नक्की Subscribe करा._


Click:*प्रकृती स्थिर-विश्रांतीचा सल्ला : सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना ह्रदय विकाराचा त्रास; ब्रिच कॅन्डी रुग्णालयात उपचार*


Click:*भेटीनंतर बहिण पंकजा मुंडे यांनी दिली धनंजय मुंडे यांच्या तब्येतीबाबत महत्त्वाची माहिती*



जाहीरात/Advertis




---------------------------------------------
🔸 MB NEWS/माझी बातमी🔸
बातम्या व जाहीरातीसाठी संपर्क- महादेव शिंदे 7709500179 , प्रा.रविंद्र जोशी 9850642717.

-----------------------------
















🔸 MB NEWS/माझी बातमी🔸


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !