पोस्ट्स

परळी लेबलसह पोस्ट दाखवत आहे

MB NEWS-अभिमानास्पद : परळीच्या कन्येची ऑलिम्पिकसाठी निवड ; परळीच्या कु.श्रद्धा गायकवाडने पटकावले ३६ व्या नॅशनल गेम्स स्पर्धेत सुवर्ण पदक फ्रांस मध्ये होणाऱ्या ऑलम्पिक मध्ये भारतीय संघात निवड

इमेज
  अभिमानास्पद : परळीच्या कन्येची ऑलिम्पिकसाठी निवड ; परळीच्या कु.श्रद्धा गायकवाडने पटकावले ३६ व्या नॅशनल गेम्स स्पर्धेत सुवर्ण पदक फ्रांस मध्ये होणाऱ्या ऑलम्पिक मध्ये भारतीय संघात निवड परळी वैजनाथ, प्रतिनिधी...        परळी साठी अतिशय अभिमानाची बाब म्हणजे परळीची कन्या कुमारी श्रद्धा गायकवाड हिने 36 व्या नॅशनल गेम्स स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले असून फ्रान्समध्ये होणाऱ्या ऑलिंपिक साठी भारतीय संघात तिची निवड झाली आहे. या निवडीबद्दल तिचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. ऑलम्पिक साठी निवड होणारी परळीतील ती पहिलीच खेळाडू ठरली आहे. परळी साठी ही अत्यंत गौरवाची बाब ठरली आहे.        अहमदाबाद येथे नुकत्याच संपन्न झालेल्या ३६ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत परळीच्या  कु.श्रध्दा रविंद्र गायकवाड हिने "स्केट बोर्डिंग" या स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले आहे.  तिची "स्केट बोर्डिंग" या क्रीडा प्रकारात फ्रांस मध्ये होणाऱ्या ऑलम्पिक मध्ये भारतीय संघात निवड झाली आहे. रविंद्र गायकवाड हे परळी येथील रहिवाशी असून ते सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करतात त्यांच्या कन्येने या क्रीडा प्रकारात घेतलेली आं

MB NEWS- *10 ऑक्टोबर रोजी बांधकाम कामगारांचा बीड येथील सरकारी कामगार अधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा*

इमेज
  10 ऑक्टोबर रोजी बांधकाम कामगारांचा बीड येथील सरकारी कामगार अधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा परळी वैजनाथ,  प्रतिनिधी...         बीड जिल्हा सरकारी कामगार अधिकारी कार्यालयावर बीड जिल्हा बांधकाम कामगार संघटनेच्या वतीने दि 10 ऑक्टोबर  रोजी धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. अशी माहिती बीड जिल्हा बांधकाम कामगार संघटनेचे जिल्हा अध्यक्ष प्रा. बी जी खाडे  यांनी दिली आहे.          आतापर्यंतचे प्रलंबित लाभाची प्रकरणे निकाली काढा, मेडीक्लेम  योजना सुरू करा, नोंदणी व नूतनीकरणाच्या लाभात सुधारणा करा, योजनेचा लाभ अर्ज मिळाल्या पासून एक महीन्यात निकाली काढा,  मध्यान्ह भोजन योजना बंद करून कामगारांच्या खात्यावर महीन्याला 2000 निधी द्या, बांधकाम कामगारांना दिपावलीसाठी २०००० (वीस हजार) रु बोनस द्या, साहित्य खरेदी योजना पुन्हा सुरू करा, अटल बांधकाम योजनेची अमलबजावनी तात्काळ करा आदी प्रमुख मागण्यासाठी मोर्चा आयोजीत केला आहे.        मोर्चात मोठ्या संख्येने कामगारांनी सहभागी व्हावे असे आवाहन संघनेचे जिल्हाध्यक्ष प्रा.बी.जी खाडे, किरण सावजी, जालिंदर गिरी शिवाजी कुरे, अशोक थोरात, ओम पूरी, प्रकाश वाघमारे, बाबासाहे

MB NEWS-*हो प्रचंडच ....! भगवानभक्ती गड अतिविराट जनसागराने ओसंडला !*

इमेज
  हो प्रचंडच ....!  भगवानभक्ती गड अतिविराट जनसागराने ओसंडला ! पदर पसरून मिळणाऱ्या पदांचा आपल्याला मोह नाही ; आपला स्वाभिमान कायम जपूया - पंकजाताई मुंडे  2024 ला स्वाभिमानाची ताकद दाखवून देऊ  ; भगवान भक्ती गडावरून पंकजाताई मुंडे यांची घोषणा बीड ।दिनांक०५। कोणावर चिखलफेक करून नाही तर चिखल तुडवत संघर्ष करण्याचा आपला संस्कार आहे .चिखल तुडवत, कष्ट करत संघर्ष करणे हे आपल्या रक्तातच असून कोणापुढे पदर पसरून मिळणाऱ्या पदांपेक्षा आपला स्वाभिमान कायम जपूया. त्यामुळे 2024 च्या जोरदार तयारीला लागा अशी घोषणा भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी भगवान भक्ती गडावरून आज केली.    राष्ट्रसंत भगवानबाबा यांचे जन्मगाव असलेल्या सावरगाव घाट येथील भगवान भक्ती गडावर आज पारंपारिक व ऐतिहासिक दसरा मेळावा मोठया उत्साहात पार पडला. हा मेळावा अतिविशाल गर्दीने व लाखोंच्या संख्येने उपस्थित मुंडे समर्थकांमुळे प्रचंड असा झाला. या मेळाव्याला पंकजाताई मुंडे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी व्यासपीठाव खा.डॉ .प्रीतमताई मुंडे ,नगरचे खासदार डॉ.सुजय विखे, माजी मंत्री महादेव जानकर , ॲड. यशश्री मुंडे, आमदार मोनिका राजळे, आम
इमेज
  हृदयद्रावक घटना: खेळत खेळत राखेच्या तलावात गेलेल्या चार वर्षिय चिमुरडीचा पाण्यात बुडून मृत्यू   परळी वैजनाथ, प्रतिनिधी..              अतिशय हृदयद्रावक अशा प्रकारची घटना आज (दि.25) सकाळच्या सुमारास परळी -गंगाखेड रस्त्यावरील औष्णिक विद्युत केंद्राचे राख साठवणूक तळे आहे त्या ठिकाणी घडली. या ठिकाणी साचलेल्या पाण्याच्या एका डबक्यात पडून चार वर्षाच्या चिमुरडीचा मृत्यू झाला.      राखेच्या तळ्यापासून केवळ शंभर मीटर अंतरावर राहत असलेल्या पवार कुटुंबातील  तीन भावंडं खेळत खेळत  राखेच्या तलावात साचलेल्या डबक्याच्या पाण्यात गेले. त्या ठिकाणी मयत साक्षी व तिची दुसरी बहीण या पाण्याच्या डबक्यात खेळू लागले. खेळता खेळता ते पाण्यात पडले याच ठिकाणी असलेला त्यांचा सात वर्षाचा मोठा भाऊ याने ती घटना बघितली आणि धावत जाऊन त्याने आपल्या पालकांना ही बाब सांगितली. साक्षीचे वडील घटनास्थळावर येऊन त्यांना पाण्यातून बाहेर काढेपर्यंत चार वर्षाची साक्षी या चिमुरडीचा मृत्यू झाला. एका मुलीला सुखरूप बाहेर काढण्यात त्यांना यश आले. परळी गंगाखेड रस्त्यावरील पांडे पेट्रोल पंपाच्या पाठीमागील बाजूस पवार कुटुंब राहते. राखेच्

MB NEWS-परळीत पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत 13 ऑगस्ट रोजी तिरंगा रॅली

इमेज
  परळीत पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत 13 ऑगस्ट रोजी तिरंगा रॅली परळी वैजनाथ, प्रतिनिधी.......        भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त परळी शहरात येत्या शनिवारी म्हणजे 13 ऑगस्ट रोजी भव्य तिरंगा रॅली काढण्यात येणार आहे.भाजप राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही रॅली 13 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वा. छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून निघणार आहे. Click &watch : ■ *मंत्रीमंडळ विस्तारानंतर पंकजा मुंडेंचे ट्विट*    या रॅलीत  पदाधिकारी, कार्यकर्ते, बुथ प्रमुख, शक्तीप्रमुख, विविध आघाड्यांचे पदाधिकारी यांनी   तसेच शाळा, महाविद्यालयातील शिक्षक, प्राध्यापक, विद्यार्थी, विद्यार्थीनी, डाॅक्टर्स, वकील, स्वयंसेवी संस्था तसेच समाजाच्या सर्व घटकांतील नागरिक रॅलीत रॅलीत सहभागी होणार आहे. सर्वांनी रॅलीत पांढऱ्या शुभ्र गणवेशात यायचे आहे. अतिशय जल्लोषात आणि भव्य अशी ही रॅली व्हावी या दृष्टिकोनातून तयारी करण्यात येत आहे.या रॅलीत मोठ्या संख्यने सहभागी व्हावे असे आवाहन भाजपाकडून करण्यात आले आहे. ------------------------------------------------------- Video News : ------------------------

MB NEWS- *प्रकल्पग्रस्त प्रगतकुशल प्रशिक्षणार्थींचा आमरण उपोषणाचा इशारा* _सरळ सेवा भरती मध्ये ५० टक्के आरक्षण व प्रतिवर्षी ५ गुण अथवा विशेष भरती करुन न्याय देण्याची प्रमुख मागणी_

इमेज
 *प्रकल्पग्रस्त प्रगतकुशल प्रशिक्षणार्थींचा आमरण उपोषणाचा इशारा*  _सरळ सेवा भरती मध्ये ५० टक्के आरक्षण व प्रतिवर्षी ५ गुण अथवा विशेष भरती करुन न्याय देण्याची प्रमुख मागणी_ परळी वैजनाथ, प्रतिनिधी...         पदवी आधारे व प्रकल्पग्रस्ता अधारे थर्मल पावर स्टेशन, परळी येथील युनिट क्र.६, ७ व ८ मध्ये जलप्रक्रिया विभागामध्ये सन २०१७ पासून बी.एस.सी. (रसायनशास्त्र) शैक्षणिक अहर्तेवर प्रकल्पग्रस्त प्रगतकुशल प्रशिक्षणार्थी म्हणुन नियुक्त असलेल्या प्रकल्पग्रस्त प्रगतकुशल प्रशिक्षणार्थींना सरळ सेवा भरतीमध्ये न्याय द्यावा या मागणीसाठी दि.१० आॅगस्ट पासुन आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.          महाराष्ट्र राज्य विज निर्मिती कंपनी मर्या. प्रशासकीय परिपत्रक क्र. ३७४ दि. १८.०४.२०१७ काढण्यात आलेले आहे.सन २०१७ पासून बी.एस.सी. (रसायनशास्त्र) शैक्षणिक अहर्तेवर प्रकल्पग्रस्त प्रगतकुशल प्रशिक्षणार्थी म्हणुन नियुक्त असलेल्या प्रकल्पग्रस्त प्रगतकुशल प्रशिक्षणार्थींना या परिपत्रकात जाणुन बुजुन डावलण्यात आले आहे. प्रकल्पग्रस्त व पदवीधर, पदव्युत्तर पदवीधर प्रगतकुशल श्रेणीमध्ये समाविष्ट असतानाही सरळसेवा

MB NEWS-परळी तालुक्यातील नंदनज- कासारवाडीचा 'बोरणा' तलाव १०० टक्के भरला(Video & News)

इमेज
  परळी तालुक्यातील नंदनज- कासारवाडीचा 'बोरणा' तलाव १०० टक्के  भरला परळी वैजनाथ | एमबी न्युज वृत्तसेवा..         परळी तालुक्यातील नंदनज- कासारवाडी येथील 'बोरणा' मध्यम प्रकल्प  १०० टक्के  भरला आहे. तालुक्यातील जलसाठे भरत असल्याने समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. परळी चा मुख्य जलस्त्रोत असलेल्या नागापूर येथील वाण प्रकल्पात यापुर्वीच १०० पाण्याचा साठा झालेला आहे व सध्यस्थितीत पाण्याचा मोठा ओघ सुरू आहे.                   परळी तालुक्यात चांगला  पाऊस  झाला आहे. त्यामुळे सर्वत्र पाणी साठवण होण्यासाठी मोठी मदत होत आहे. परळी तालुक्याचा मुख्य जलस्त्रोत नागापूर येथील  'वाण प्रकल्प' पूर्ण क्षमतेने भरलेला आहे. तालुक्यातील बोधेगाव, करेवाडी, चांदापुर, कन्हेरवाडी, गुट्टेवाडी, मोहा, मालेवाडी, गोपाळपुर, खोडवा सावरगाव, दैठणाघाट, करेवाडी आदींमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साठवण होण्यास सुरुवात झाली आहे.  बोरणा तलावाच्या सांडव्यावरुन पाणी प्रवाहित ....    दरम्यान परळी पासून जवळच असलेल्या नंदनज-कासारवाडी येथील बोरणा तलावात 100 टक्के  पाणीसाठा झाला  आहे.मध्यम प्रकल्प असलेल्या बोरणा प्र

MB NEWS-नीट परीक्षेसाठी जाणार्‍या विद्यार्थ्यांच्या जीपला अपघात : दोन विद्यार्थी व दोन पालक जखमी

इमेज
  नीट परीक्षेसाठी जाणार्‍या विद्यार्थ्यांच्या जीपला अपघात : दोन विद्यार्थी व दोन पालक जखमी केज (दि.१५) :- परभणी जिल्ह्यातील पाथरी येथील विद्यार्थी हे त्यांच्या पालका सोबत अहमदनगर येथे नीटच्या परीक्षेसाठी जात असताना अंबाजोगाई-केज रस्त्यावर होळ नजीक त्यांच्या गाडीला अपघात होऊन पलटी झाली. त्यात दोन विद्यार्थी व दोन पालक असे चौघे जखमी झाले आहेत.       दि. १५ जुलै शुक्रवार रोजी पाथरी जि. परभणी येथील सुरेश सिरसाट वय (५० वर्ष), विनोद सिरसाट वय (४२ वर्ष), सौरभ सिरसाट वय ( १९ वर्ष ) आणि सुजित सिरसाट वय (१८वर्ष) व अन्य एकजण असे पाचजण अहमदनगर येथे नीट परीक्षेसाठी बोलेरो गाडीतून जात होते. त्यांची गाडी केजच्या दिशेने होळ पासून पुढे आली असता होळ ते चंदनसावरगाव दरम्यान त्यांची बोलेरो गाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात जाऊन पलटी झाली. या अपघातमध्ये सौरभ सिरसाट वय (१९ वर्ष) आणि सुजित सिरसाट वय (१८वर्ष) हे दोन विद्यार्थी व सुरेश सिरसाट वय (५० वर्ष) आणि विनोद सिरसाट वय (४२ वर्ष) हे दोन पालक जखमी झाले आहेत.जखमींना अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तिर्थ ग्रामिण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय येथे आपत्

MB NEWS- मोहन साखरे यांचा लेख>>>> माजी मंत्री आ.धनंजय मुंडे म्हणजे अविरत जनसेवेचा ध्यास-'आपला माणुस' असा सामान्यांना विश्वास!

इमेज
 माजी मंत्री आ.धनंजय मुंडे म्हणजे अविरत जनसेवेचा ध्यास-'आपला माणुस' असा सामान्यांना विश्वास!        महाराष्ट्राच्या विधीमंडळात अग्रभागी नेत्यांमध्ये घेतलं जाणारं नाव म्हणजे परळी मतदारसंघाचे भाग्यविधाते  आमदार राज्याचे  माजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे. अविरत कार्य, जनसेवेचा ध्यास घेऊन चोविस तास जनहितार्थ वाहिलेले जीवन आणि  'आपला माणुस' असा सामान्यांना विश्वास असणारे हे खंबीर नेतृत्व आहे.आ.धनंजय मुंडे  यांचा आज वाढदिवस आहे.त्यानिमित्ताने या प्रेरणादायी व आमचे शक्तीपीठ असलेल्या व्यक्तीमत्वाला लक्ष लक्ष शुभेच्छा !!!         महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरील संघर्षयात्री म्हणून स्वकर्तृत्वाने नेतृत्व सिद्ध केलेला सर्व सामान्यांशी पक्की नाळ जोडलेला 'जननायक' म्हणजे आ.धनंजय मुंडे हे आहेत. आ.धनंजय मुंडे यांचे जीवन म्हणजे महाराष्ट्रातील जनतेच्या सेवेला समर्पित केलेले मुर्तीमंत उदाहरण होय. जिल्हा परिषदेचा सदस्य ते विरोधी पक्षनेता ते राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री हा प्रवास थक्क करणारा आहे. पण या पदांची उंची गाठण्यासाठी चालतांना रस्त्यात अ

MB NEWS-धक्कादायक: तिसऱ्या मजल्यावरून विवाहितेला दिले फेकुन; खुनाचा गुन्हा दाखल

इमेज
  धक्कादायक: तिसऱ्या मजल्यावरून विवाहितेला दिले फेकुन; खुनाचा गुन्हा दाखल बीड- सहा महिन्यांपूर्वी विवाह करून सासरी आलेल्या  विवाहितेला तिसऱ्या मजल्यावरून फेकून देत खून केल्याच्या घटनेवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बीड शहरातील शाहू नगर भागात यास्मिन शेख हिच्या मृत्युनंतर पतीसह सासरच्या लोकांवर गुन्हा दाखल झाला असून पतीला पोलिसांनी अटक केली आहे. या धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे. शहरातील इस्लामपुरा भागात राहणारे रहीम शरिफोद्दिन शेख यांची मुलगी यास्मिन शेख हिचा विवाह २६ ऑक्टोबर २०२१रोजी तिचा विवाह शकूर बशीर शेख (२९) याच्याशी लावला होता. शकूर हा मिस्त्रकाम करतो. लग्न होऊन एक महिना उलटल्यानंतर यासमीनला सासरी जाच होण्यास सुरुवात झाली. गुरुवारी (दि २४ रोजी) सकाळी ७ वाजता ती घराच्या तिसऱ्या मजल्यावरून खाली पडली असल्याचा निरोप सासरच्या लोकांनी दिला. त्यावरून ते तत्काळ तिच्या घरी पोहोचले. यासमीनला तिसऱ्या मजल्यावरून फेकून संपविल्याचा आरोप त्यांनी केला. त्यावरून पती शकूर बशीर बेग, दीर शेख नसीर बशीर, जाऊ सोफेया नसीर शेख विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास उपनिरीक्षक बाळराजे दराडे