MB NEWS-धक्कादायक: तिसऱ्या मजल्यावरून विवाहितेला दिले फेकुन; खुनाचा गुन्हा दाखल

 धक्कादायक: तिसऱ्या मजल्यावरून विवाहितेला दिले फेकुन; खुनाचा गुन्हा दाखल



बीड- सहा महिन्यांपूर्वी विवाह करून सासरी आलेल्या  विवाहितेला तिसऱ्या मजल्यावरून फेकून देत खून केल्याच्या घटनेवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बीड शहरातील शाहू नगर भागात यास्मिन शेख हिच्या मृत्युनंतर पतीसह सासरच्या लोकांवर गुन्हा दाखल झाला असून पतीला पोलिसांनी अटक केली आहे. या धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे.


शहरातील इस्लामपुरा भागात राहणारे रहीम शरिफोद्दिन शेख यांची मुलगी यास्मिन शेख हिचा विवाह २६ ऑक्टोबर २०२१रोजी तिचा विवाह शकूर बशीर शेख (२९) याच्याशी लावला होता. शकूर हा मिस्त्रकाम करतो. लग्न होऊन एक महिना उलटल्यानंतर यासमीनला सासरी जाच होण्यास सुरुवात झाली. गुरुवारी (दि २४ रोजी) सकाळी ७ वाजता ती घराच्या तिसऱ्या मजल्यावरून खाली पडली असल्याचा निरोप सासरच्या लोकांनी दिला. त्यावरून ते तत्काळ तिच्या घरी पोहोचले. यासमीनला तिसऱ्या मजल्यावरून फेकून संपविल्याचा आरोप त्यांनी केला. त्यावरून पती शकूर बशीर बेग, दीर शेख नसीर बशीर, जाऊ सोफेया नसीर शेख विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास उपनिरीक्षक बाळराजे दराडे करत आहेत.

••••••••••••••••••••••••••••••••

🔸हे देखील वाचा/पहा🔸

••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

Click -🔸 *तुकाराम बीज ✍️ भागवतमर्मज्ञ ह.भ.प. सुरेंद्र(बाळु) महाराज उखळीकर यांनी केलेले प्रासंगिक चिंतन.....! 👉⭕ *"तुका तोची तो हा परब्रह्म ठेवा......!"*⭕

Click -लक्षवेधी: जय महाराष्ट्र शिवजयंती उत्सवात मुलींनी दाखवली मर्दानी खेळाची प्रात्यक्षिके

Click -🏵️ *आला होळीचा सण,लय भारी:* *’लेंगी’च्या पारंपरिक बंजारा गीतांवर थिरकली पाउले!*

Click -🏵️ *पंकजाताई मुंडे यांनी दत्तक घेतलेल्या उदयोन्मुख गायिकेच्या मधुर आवाजाची एक झलक......!*

Click -🏵️होळी पेटवून का मारल्या जातात बोंबा?? घ्या जाणुन.*

Click -☘️ *पळसाला पाने तीन अन् फुलाचे रंग दोन! काय आहे पळस व होळीचा संबंध? पळसपापडी माहिती आहे का?-बघा.*☘️

Click -⭕ *मंत्री धनंजय मुंडे यांची आज की 'बात'.....'इशारो ही इशारों में!'*

••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••          जाहिरात/ADVERTIS

••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••






























टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार