MB NEWS-परळी तालुक्यातील नंदनज- कासारवाडीचा 'बोरणा' तलाव १०० टक्के भरला(Video & News)

 परळी तालुक्यातील नंदनज- कासारवाडीचा 'बोरणा' तलाव १०० टक्के  भरला



परळी वैजनाथ | एमबी न्युज वृत्तसेवा..


        परळी तालुक्यातील नंदनज- कासारवाडी येथील 'बोरणा' मध्यम प्रकल्प  १०० टक्के  भरला आहे. तालुक्यातील जलसाठे भरत असल्याने समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. परळी चा मुख्य जलस्त्रोत असलेल्या नागापूर येथील वाण प्रकल्पात यापुर्वीच १०० पाण्याचा साठा झालेला आहे व सध्यस्थितीत पाण्याचा मोठा ओघ सुरू आहे. 


                 परळी तालुक्यात चांगला  पाऊस  झाला आहे. त्यामुळे सर्वत्र पाणी साठवण होण्यासाठी मोठी मदत होत आहे. परळी तालुक्याचा मुख्य जलस्त्रोत नागापूर येथील  'वाण प्रकल्प' पूर्ण क्षमतेने भरलेला आहे. तालुक्यातील बोधेगाव, करेवाडी, चांदापुर, कन्हेरवाडी, गुट्टेवाडी, मोहा, मालेवाडी, गोपाळपुर, खोडवा सावरगाव, दैठणाघाट, करेवाडी आदींमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साठवण होण्यास सुरुवात झाली आहे. 

बोरणा तलावाच्या सांडव्यावरुन पाणी प्रवाहित ....

   दरम्यान परळी पासून जवळच असलेल्या नंदनज-कासारवाडी येथील बोरणा तलावात 100 टक्के  पाणीसाठा झाला  आहे.मध्यम प्रकल्प असलेल्या बोरणा प्रकल्पाची प्रकल्पिय पाणीसाठा क्षमता 10. 814 द. ल. घ. मी. एवढी आहे. मृतसाठा 1.842 द. ल. घ. मी. इतका असून सद्यस्थितीत बोरणा प्रकल्पात सांडव्यावरुन पाणी प्रवाहित झाले आहे.

Video 





टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !