परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

MB NEWS- मोहन साखरे यांचा लेख>>>> माजी मंत्री आ.धनंजय मुंडे म्हणजे अविरत जनसेवेचा ध्यास-'आपला माणुस' असा सामान्यांना विश्वास!

 माजी मंत्री आ.धनंजय मुंडे म्हणजे अविरत जनसेवेचा ध्यास-'आपला माणुस' असा सामान्यांना विश्वास!


      




महाराष्ट्राच्या विधीमंडळात अग्रभागी नेत्यांमध्ये घेतलं जाणारं नाव म्हणजे परळी मतदारसंघाचे भाग्यविधाते  आमदार राज्याचे  माजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे. अविरत कार्य, जनसेवेचा ध्यास घेऊन चोविस तास जनहितार्थ वाहिलेले जीवन आणि  'आपला माणुस' असा सामान्यांना विश्वास असणारे हे खंबीर नेतृत्व आहे.आ.धनंजय मुंडे  यांचा आज वाढदिवस आहे.त्यानिमित्ताने या प्रेरणादायी व आमचे शक्तीपीठ असलेल्या व्यक्तीमत्वाला लक्ष लक्ष शुभेच्छा !!!

        महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरील संघर्षयात्री म्हणून स्वकर्तृत्वाने नेतृत्व सिद्ध केलेला सर्व सामान्यांशी पक्की नाळ जोडलेला 'जननायक' म्हणजे आ.धनंजय मुंडे हे आहेत. आ.धनंजय मुंडे यांचे जीवन म्हणजे महाराष्ट्रातील जनतेच्या सेवेला समर्पित केलेले मुर्तीमंत उदाहरण होय. जिल्हा परिषदेचा सदस्य ते विरोधी पक्षनेता ते राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री हा प्रवास थक्क करणारा आहे. पण या पदांची उंची गाठण्यासाठी चालतांना रस्त्यात अनेक संकटं आली, कधी पाय रक्ताळलेल, तर कधी मनाला दु:ख आणि वेदनांचा चिखल तुडवत पुढे जावे लागले. अनेकदा विरोधकांनी धनंजय मुंडे संपल्याचा कांगावा करत आनंद ही साजरा केला, पण तो फार काळ टिकला नाही. सर्व मार्गांनी कोंडीत पकडण्याचे प्रयत्न अनेकांनी अनेक प्रकारे केले. पण कर्तृत्वाची नीव एवढी पक्की की सगळ्या संकटांना आणि राजकीय कुरघोड्यांवर मात करून हे आमचं धिरोदात्त नेतृत्व 'जब जब भी बिखरा हुं,नयी रफ्तार से निखरा हुं' याप्रमाणे सिद्ध झाल्याचे उभ्या महाराष्ट्राला दिसुन आले आहे.आज आमचा  नेता महाराष्ट्रातील जनतेच्या गळ्यातील ताईत आहे. प्रत्येक सभेला लाखोंचा जनसमुदाय आणि शब्दा शब्दांवर समुद्राच्या लाटाप्रमाणे उसळणारा जनसागर पाहिला की उर अभिमानाने भरून येतो. 

     राज्याचे सामाजिक न्याय मंत्री म्हणून धनंजय मुंडे यांनी धुरा हाती घेतली आणि राज्यातील वंचित - उपेक्षितांच्या आयुष्यात उन्नतीचे रंग भरण्याचे काम त्यांनी केले. बीड जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून जिल्ह्यात विकासाची खरीखुरी गंगा आणण्याचे काम ना. धनंजय मुंडे यांनी केले आहे. गोरगरीब, वंचित - उपेक्षितांच्या आयुष्यात उन्नती व विकासाचा रंग भरण्यातच खरे सार्थक आहे हे उद्दिष्ट ठेऊनमुंडें यांनी वाटचाल केली आहे. जनतेच्या प्रश्नात खर्याखुर्या पालकाची जबाबदारी पार पाडली आहे.आपल्या मंत्रिपदाच्या कारकीर्दीत त्यांनी आपल्या कामाच्या शैलीने वेगळा ठसा उमटवून सोडला आहे.राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री म्हणून गोरगरीब, वंचित, उपेक्षित,दिव्यांग, विविध सामाजिक घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणारा मंत्री अशी त्यांची ओळख वर्षानुवर्ष राहणार आहे.

         सामाजिक न्याय विभागासारख्या लोकाभिमुख खात्याला खरोखर न्याय मिळवून देण्याचे काम त्यांनी आपल्या कार्यकाळात केले आहे. परळी मतदारसंघात विकासाची गंगा प्रवाहित करुन चौफेर व सर्वंकष विकासाचा दृष्टिकोन प्रत्यक्षात साकार करण्यासाठी त्यांचा सातत्याने प्रयत्न आहे.परळी मतदार संघाचे भाग्यविधाते आमदार असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

           आ.धनंजय मुंडे  यांचा आज वाढदिवस आहे.त्यानिमित्ताने या प्रेरणादायी व आमचे शक्तीपीठ असलेल्या व्यक्तीमत्वाला लक्ष लक्ष शुभेच्छा !!!  लाडक्या नेत्याला आरोग्य आणि दीर्घ आयुष्य लाभो आणि महाराष्ट्रातील जनतेची त्यांच्या हातुन सेवा घडो हीच प्रभु वैद्यनाथ चरणी विनम्र प्रार्थना...!

    - मोहन साखरे,परळी वैजनाथ.

_____________________________________

संबंधित लेख: 

● क्लिक करा>● *भक्तराम फड यांचा लेख* 》》》 *_वाढदिवस अभिष्टचिंतन: मी अनुभवलेले आ.धनंजय मुंडे_*

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!