MB NEWS-नीट परीक्षेसाठी जाणार्‍या विद्यार्थ्यांच्या जीपला अपघात : दोन विद्यार्थी व दोन पालक जखमी

 नीट परीक्षेसाठी जाणार्‍या विद्यार्थ्यांच्या जीपला अपघात : दोन विद्यार्थी व दोन पालक जखमी



केज (दि.१५) :- परभणी जिल्ह्यातील पाथरी येथील विद्यार्थी हे त्यांच्या पालका सोबत अहमदनगर येथे नीटच्या परीक्षेसाठी जात असताना अंबाजोगाई-केज रस्त्यावर होळ नजीक त्यांच्या गाडीला अपघात होऊन पलटी झाली. त्यात दोन विद्यार्थी व दोन पालक असे चौघे जखमी झाले आहेत.

      दि. १५ जुलै शुक्रवार रोजी पाथरी जि. परभणी येथील सुरेश सिरसाट वय (५० वर्ष), विनोद सिरसाट वय (४२ वर्ष), सौरभ सिरसाट वय ( १९ वर्ष ) आणि सुजित सिरसाट वय (१८वर्ष) व अन्य एकजण असे पाचजण अहमदनगर येथे नीट परीक्षेसाठी बोलेरो गाडीतून जात होते. त्यांची गाडी केजच्या दिशेने होळ पासून पुढे आली असता होळ ते चंदनसावरगाव दरम्यान त्यांची बोलेरो गाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात जाऊन पलटी झाली. या अपघातमध्ये सौरभ सिरसाट वय (१९ वर्ष) आणि सुजित सिरसाट वय (१८वर्ष) हे दोन विद्यार्थी व सुरेश सिरसाट वय (५० वर्ष) आणि विनोद सिरसाट वय (४२ वर्ष) हे दोन पालक जखमी झाले आहेत.जखमींना अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तिर्थ ग्रामिण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय येथे आपत्कालीन विभागात उपचारासाठी दाखल केले. 

      

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !