MB NEWS- *प्रकल्पग्रस्त प्रगतकुशल प्रशिक्षणार्थींचा आमरण उपोषणाचा इशारा* _सरळ सेवा भरती मध्ये ५० टक्के आरक्षण व प्रतिवर्षी ५ गुण अथवा विशेष भरती करुन न्याय देण्याची प्रमुख मागणी_

 *प्रकल्पग्रस्त प्रगतकुशल प्रशिक्षणार्थींचा आमरण उपोषणाचा इशारा* 



_सरळ सेवा भरती मध्ये ५० टक्के आरक्षण व प्रतिवर्षी ५ गुण अथवा विशेष भरती करुन न्याय देण्याची प्रमुख मागणी_


परळी वैजनाथ, प्रतिनिधी...

        पदवी आधारे व प्रकल्पग्रस्ता अधारे थर्मल पावर स्टेशन, परळी येथील युनिट क्र.६, ७ व ८ मध्ये जलप्रक्रिया विभागामध्ये सन २०१७ पासून बी.एस.सी. (रसायनशास्त्र) शैक्षणिक अहर्तेवर प्रकल्पग्रस्त प्रगतकुशल प्रशिक्षणार्थी म्हणुन नियुक्त असलेल्या प्रकल्पग्रस्त प्रगतकुशल प्रशिक्षणार्थींना सरळ सेवा भरतीमध्ये न्याय द्यावा या मागणीसाठी दि.१० आॅगस्ट पासुन आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

         महाराष्ट्र राज्य विज निर्मिती कंपनी मर्या. प्रशासकीय परिपत्रक क्र. ३७४ दि. १८.०४.२०१७ काढण्यात आलेले आहे.सन २०१७ पासून बी.एस.सी. (रसायनशास्त्र) शैक्षणिक अहर्तेवर प्रकल्पग्रस्त प्रगतकुशल प्रशिक्षणार्थी म्हणुन नियुक्त असलेल्या प्रकल्पग्रस्त प्रगतकुशल प्रशिक्षणार्थींना या परिपत्रकात जाणुन बुजुन डावलण्यात आले आहे. प्रकल्पग्रस्त व पदवीधर, पदव्युत्तर पदवीधर प्रगतकुशल श्रेणीमध्ये समाविष्ट असतानाही सरळसेवा भरती मध्ये ५०% आरक्षण व प्रतिवर्षी ५ गुण  देण्यापासून वंचित ठेवले आहे.५० टक्के आरक्षण व ५ गुणांपासून वंचित ठेवल्यामुळे  महानिर्मिती कंपनीच्या निघणाऱ्या भरती प्रक्रियेमध्ये या उमेदवारांना प्रशिक्षणार्थी म्हणून काम करुन सुद्धा कुठलाही लाभ मिळत नाही.

       त्यामुळे प्रकल्पग्रस्त प्रगतकुशल प्रशिक्षणार्थीना सरळ सेवा भरती मध्ये ५० टक्के आरक्षण व प्रतिवर्षी ५ गुण अथवा विशेष भरती करुन न्याय देण्याची प्रमुख मागणी करण्यात आली आहे.या मागणीचे निवेदन सर्व संबंधितांना देण्यात आले आहे.या मागणीसाठी हे उमेदवार दि.१०.०८.२०२२ रोजी महाराष्ट्र राज्य विज निर्मिती कंपनी मर्या. परळी वै.जि.बीड येथील कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार आहेत.या निवेदनावरमंदाकिनी देविदास नागरगोजे,अंजली लक्ष्मीकांत डुबे,अंजली अशोकसिंह ठाकूर, दिपक उत्तमराव गित्ते,अनिल किशनराव मुंडे,सचिन लहुदास फड़,प्रविण दिलीपराव देशमुख, शशिकांत भास्करराव चाटे,विपीन लक्ष्मणराव कांबळे यांच्या सह्या आहेत.



-------------------------------------------------------

Video News :



--------------------------------------------------------

- video news-

--------------------------------------------------------

Video News :

-------------------------------------------------------

Video News :


-------------------------------------------------------





टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार