MB NEWS-*हो प्रचंडच ....! भगवानभक्ती गड अतिविराट जनसागराने ओसंडला !*

 हो प्रचंडच ....!  भगवानभक्ती गड अतिविराट जनसागराने ओसंडला !



पदर पसरून मिळणाऱ्या पदांचा आपल्याला मोह नाही ; आपला स्वाभिमान कायम जपूया - पंकजाताई मुंडे

 2024 ला स्वाभिमानाची ताकद दाखवून देऊ  ; भगवान भक्ती गडावरून पंकजाताई मुंडे यांची घोषणा


बीड ।दिनांक०५।

कोणावर चिखलफेक करून नाही तर चिखल तुडवत संघर्ष करण्याचा आपला संस्कार आहे .चिखल तुडवत, कष्ट करत संघर्ष करणे हे आपल्या रक्तातच असून कोणापुढे पदर पसरून मिळणाऱ्या पदांपेक्षा आपला स्वाभिमान कायम जपूया. त्यामुळे 2024 च्या जोरदार तयारीला लागा अशी घोषणा भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी भगवान भक्ती गडावरून आज केली.


   राष्ट्रसंत भगवानबाबा यांचे जन्मगाव असलेल्या सावरगाव घाट येथील भगवान भक्ती गडावर आज पारंपारिक व ऐतिहासिक दसरा मेळावा मोठया उत्साहात पार पडला. हा मेळावा अतिविशाल गर्दीने व लाखोंच्या संख्येने उपस्थित मुंडे समर्थकांमुळे प्रचंड असा झाला. या मेळाव्याला पंकजाताई मुंडे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी व्यासपीठाव खा.डॉ .प्रीतमताई मुंडे ,नगरचे खासदार डॉ.सुजय विखे, माजी मंत्री महादेव जानकर , ॲड. यशश्री मुंडे, आमदार मोनिका राजळे, आमदार मेघना बोर्डीकर, आमदार सुरेश धस, माजी आमदार भीमराव धोंडे, माजी आमदार शिवाजीराव कर्डिले, ह भ प राधाताई सानप आदींसह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.


  मेळाव्याच्या प्रारंभी राष्ट्रसंत भगवान बाबा यांच्या पुनर्प्रतिष्ठापना करण्यात आलेल्या मूर्तीचे पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते पूजन व आरती करण्यात आली. त्यानंतर मेळाव्याला प्रारंभ झाला. पंकजाताई मुंडे यांच्या मार्गदर्शनापूर्वी महादेव जानकर, डॉ. सुजय विखे, खासदार डॉक्टर प्रीतमताई मुंडे आदींची भाषणे झाली. 


*पंकजाताई मुंडे*......

---------

यावेळी बोलताना पंकजाताई म्हणाल्या,  विजयादशमी मेळावा  ही आपली परंपरा असून संघर्ष करणे हे आपल्या रक्तातच आहे. संघर्ष कोणाला चुकला नाही. संत भगवान बाबाच्या आयुष्यातही त्यांनी संघर्षातूनच भगवानगड संस्थापित केला. मुंडे साहेबांनीही आयुष्यभर संघर्ष केला परंतु कधीही आपला स्वाभिमान कमी होऊ दिला नाही. त्याच वारशाने आपण वाटचाल करत आहोत. कोणावरही चिखल फेक आपण करत नाही कारण हा मेळाला चिखलफेक करणारांचा नाही तर चिखल तुडविणा-यांचा आहे. मी संघर्ष नाकारुच शकत नाही.मी संघर्षाला घाबरतही नाही. ही  हकीकत, हे सत्य आहे. भगवानबाबांनीही संघर्ष व सत्य सोडलं नाही.मुंडे साहेबांनीही शेवटपर्यंत सतत संघर्ष केला. छत्रपती शिवराय, संभाजीराजेंचा आदर्श व भगवानबाबा आणि गोपीनाथ मुंडेचं हे रक्त आहे. त्यामुळे मी थकणार नाही, रुकणार नाही, कधी कोणासमोर झुकणार नाही.


*आता तो विषय पूर्ण बंद करा......*

-------------

 आपली सध्या समर्पणाची भूमिका असून मुंडे साहेबांनी दिलेला वारसा व विचार हाच नरेंद्र मोदींचा, जेपी नड्डांचा आणि  अमित शहा यांचाही आहे. आपण त्याच मुशीतून घडलो आहोत आणि त्याच कुशीतून जन्माला आलो आहोत. त्यामुळे आता कोणत्याही पदाची अपेक्षा ठेवू नका. वेळ येईल त्यावेळी निश्चित सत्याला न्याय मिळणार असतो. सत्य कधी कधी अस्वस्थ होऊ शकते परंतु पराजित होऊ शकत नाही. त्यामुळे संयम सोडू नका समर्पण द्या. अफवा पसरत असतात ,पसरवल्या जात असतात परंतु हकीकत जाणून घेण्याकडे प्राधान्य द्या. आपल्या ध्येयापासून  विचलित होऊ नका असे आवाहन त्यांनी आपल्या समर्थकांना केले. कोणापुढे पदर पसरून आपल्याला कोणतेही पद नको. त्या पदाचा आपल्याला मोह नाही. आपल्याला शोभेल असाच स्वाभिमानी बाणा कायम ठेवूया. 2024 च्या जोरदार तयारीला लागा असे आवाहन त्यांनी आपल्या समर्थकांना यावेळी केले.


 *आपली कोणावरही नाराजी नाही*

------------

काहीही झाले की लगेच पंकजा मुंडे नाराज अशा प्रकारच्या बातम्या चालवल्या जातात परंतु आता हा विषय कायमचा बंद करा. कुठल्या निवडणुका असतील तर आपले नाव चालवणे बातम्यातून बंद करा अशी मिडियाला विनंती आहे. माझ्या लेखी हा विषय आता संपलेला आहे. आपली कोणावरही नाराजी नाही किंवा आपण नाराज नाही असे पंकजाताई  यांनी यावेळी स्पष्ट केले.


*परमपूज्य मोहन भागवतांच्या दसरा मेळाव्यातील संदेशाचा आवर्जून उल्लेख*

------------

यावेळी आपल्या मेळाव्याची सुरुवात करतानाच त्यांनी सांगितले की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक  परमपूज्य मोहनजी भागवत यांनी आज सकाळीच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या झालेल्या मेळाव्यात मातृशक्तीचा सन्मान केला असून या मेळाव्याला प्रमुख पाहुणे म्हणून एका महिलेला बोलावले ही आपली परंपरा आहे. त्या विचाराची शिदोरी घेऊनच आपण वाटचाल करत असल्याचे पंकजा मुंडे यांनी आवर्जून सांगितले.

••••

पहा :संपूर्ण भाषण  VIDEO 




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !