गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने घुले कुटुंबास पाच लाखाची मदत जाहीर

इमेज
  ना. पंकजा मुंडे यांनी मयत विलास घुलेंच्या परिवाराचे स्वीकारले पालकत्व ; दुःखात आणि न्यायाच्या लढाईतही पाठिशी बीड दि. २३ -- टाकळी- कदमवाडी (ता. केज) परिसरात झालेल्या घटनेत दुर्दैवी मृत्यू झालेल्या विलास घुले यांच्या परिवाराचे पालकत्व स्वीकारत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना.पंकजा मुंडे यांनी त्यांना मदतीचा हात दिला आहे. मयत घुले यांच्या पत्नीस गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने पाच लाख रूपयांची मदत आज त्यांनी जाहीर केली आहे.    विलास घुले याच्या हत्येच्या प्रकरणात झालेल्या दुर्दैवी घटनेचा तीव्र निषेध करत ना. पंकजा मुंडे यांनी पोलिस प्रशासनाला दोषींवर कडक कारवाई करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत, पण कोवळ्या वयात काहीही संबंध नसताना त्याचा हकनाक मृत्यू झाल्यामुळे त्याचे कुटुंब उघड्यावर पडले असून त्यांचेवर अकाली संकट आले आहे. विलास यांचे बंधू रमेश यांच्याशी ना. पंकजाताईंनी संपर्क साधून आपण विलासच्या मृत्यूबद्दल दुःख व्यक्त केले. तुमच्या दुःखात आणि न्यायाच्या लढाईत मी  परिवाराच्या पाठिशी  ठामपणे उभी असल्याचे सांगितले. गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या माध्यमातू...

MB NEWS-अभिमानास्पद : परळीच्या कन्येची ऑलिम्पिकसाठी निवड ; परळीच्या कु.श्रद्धा गायकवाडने पटकावले ३६ व्या नॅशनल गेम्स स्पर्धेत सुवर्ण पदक फ्रांस मध्ये होणाऱ्या ऑलम्पिक मध्ये भारतीय संघात निवड

 अभिमानास्पद : परळीच्या कन्येची ऑलिम्पिकसाठी निवड ; परळीच्या कु.श्रद्धा गायकवाडने पटकावले ३६ व्या नॅशनल गेम्स स्पर्धेत सुवर्ण पदक



फ्रांस मध्ये होणाऱ्या ऑलम्पिक मध्ये भारतीय संघात निवड

परळी वैजनाथ, प्रतिनिधी...
       परळी साठी अतिशय अभिमानाची बाब म्हणजे परळीची कन्या कुमारी श्रद्धा गायकवाड हिने 36 व्या नॅशनल गेम्स स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले असून फ्रान्समध्ये होणाऱ्या ऑलिंपिक साठी भारतीय संघात तिची निवड झाली आहे. या निवडीबद्दल तिचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. ऑलम्पिक साठी निवड होणारी परळीतील ती पहिलीच खेळाडू ठरली आहे. परळी साठी ही अत्यंत गौरवाची बाब ठरली आहे.
       अहमदाबाद येथे नुकत्याच संपन्न झालेल्या ३६ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत परळीच्या  कु.श्रध्दा रविंद्र गायकवाड हिने "स्केट बोर्डिंग" या स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले आहे.  तिची "स्केट बोर्डिंग" या क्रीडा प्रकारात फ्रांस मध्ये होणाऱ्या ऑलम्पिक मध्ये भारतीय संघात निवड झाली आहे. रविंद्र गायकवाड हे परळी येथील रहिवाशी असून ते सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करतात त्यांच्या कन्येने या क्रीडा प्रकारात घेतलेली आंतरराष्ट्रीय पातळीवरील परळीच्या अभिमानाची ठरली आहे.


        कु.श्रद्धा गायकवाड य परळीच्या सुवर्णकन्येने परळीचे नाव संपूर्ण भारत देशात गाजविले आहे.परळीचे रविंद्र गायकवाड यांची ती कन्या असुन परळीतील जाहिरात उद्घघोषक  बालाजी गायकवाड यांची ती पुतणी आहे. श्रद्धाचे वडील रविंद्र गायकवाड हे पुण्यामध्ये एका खाजगी कंपनी मध्ये सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात.अतिशय बिकट परिस्थिती मधून श्रद्धाने ही कामगिरी पूर्ण केली आहे. तिच्या यशाने परळीच्या नावलौकिकात मोठी भर पडली असून परळीतून आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड होणारी ती पहिलीच खेळाडू ठरली आहे. तिच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

@@@
        अहमदाबाद येथे नुकत्याच संपन्न झालेल्या ३६ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत परळीच्या  कु.श्रध्दा रविंद्र गायकवाड हिने "स्केट बोर्डिंग" या स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले असून तिची "स्केट बोर्डिंग" या क्रीडा प्रकारात फ्रांस मध्ये होणाऱ्या ऑलम्पिक मध्ये भारतीय संघात निवड झाली आहे. रविंद्र गायकवाड हे माझे बालमित्र आहेत.कु.श्रद्धा गायकवाड या आपल्या परळीच्या लेकरान परळीचे नाव संपूर्ण भारत देशात गाजविले आहे.एक परळीकर म्हणून श्रद्धाचा अभिमान वाटतो.फ्रांसमध्ये होणाऱ्या ऑलम्पिकमध्ये  श्रध्दाने सुवर्णपदक जिंकावे आणि आपले परळीचे नाव संपूर्ण विश्वात करावे ही  शुभकामना!!

        - बाजीराव भैय्या धर्माधिकारी,
        माजी नगराध्यक्ष परळी वैजनाथ

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या