MB NEWS- *10 ऑक्टोबर रोजी बांधकाम कामगारांचा बीड येथील सरकारी कामगार अधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा*

 10 ऑक्टोबर रोजी बांधकाम कामगारांचा बीड येथील सरकारी कामगार अधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा






परळी वैजनाथ,  प्रतिनिधी...

        बीड जिल्हा सरकारी कामगार अधिकारी कार्यालयावर बीड जिल्हा बांधकाम कामगार संघटनेच्या वतीने दि 10 ऑक्टोबर  रोजी धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. अशी माहिती बीड जिल्हा बांधकाम कामगार संघटनेचे जिल्हा अध्यक्ष प्रा. बी जी खाडे  यांनी दिली आहे.

         आतापर्यंतचे प्रलंबित लाभाची प्रकरणे निकाली काढा, मेडीक्लेम  योजना सुरू करा, नोंदणी व नूतनीकरणाच्या लाभात सुधारणा करा, योजनेचा लाभ अर्ज मिळाल्या पासून एक महीन्यात निकाली काढा,  मध्यान्ह भोजन योजना बंद करून कामगारांच्या खात्यावर महीन्याला 2000 निधी द्या, बांधकाम कामगारांना दिपावलीसाठी २०००० (वीस हजार) रु बोनस द्या, साहित्य खरेदी योजना पुन्हा सुरू करा, अटल बांधकाम योजनेची अमलबजावनी तात्काळ करा आदी प्रमुख मागण्यासाठी मोर्चा आयोजीत केला आहे.


       मोर्चात मोठ्या संख्येने कामगारांनी सहभागी व्हावे असे आवाहन संघनेचे जिल्हाध्यक्ष प्रा.बी.जी खाडे, किरण सावजी, जालिंदर गिरी शिवाजी कुरे, अशोक थोरात, ओम पूरी, प्रकाश वाघमारे, बाबासाहेब रोडे, यासीन शेख, युनूस शेख यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार