पोस्ट्स

MB NEWS-जेष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे निधन !

इमेज
  जेष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे निधन ! पुणे- साहित्य,लेखन,अभिनय,दिग्दर्शन अशा विविध क्षेत्रात आपली छाप सोडणारे चतुरस्त्र अभिनेते विक्रम गोखले यांचे अल्पशा आजाराने पुण्यात निधन झाले.गेल्या पंधरा दिवसापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते.तुझेच मी गीत गात आहे या टीव्ही मालिकेत ते सध्या काम करत होते.गोखले यांच्या निधनाने मराठी चित्रपट सृष्टीवर शोककळा पसरली आहे. अभिनेते विक्रम गोखले यांनी गेल्याच महिन्यात ३० ऑक्टोबर रोजी ८२ वा वाढदिवस साजरा केला. त्यानंतर काहीच दिवसात अभिनेत्याच्या तब्येतीविषयी चिंताजनक माहिती समोर आली आहे. विक्रम यांनी रंगभूमी, टेलिव्हिजन आणि सिनेमा हे सर्वच व्यासपीठ गाजवले आहेत. रंगभूमीवर तर त्यांनी एक मोठा काळ गाजवला आहे. सध्या विक्रम गोखले ‘तुझेच मी गीत गात आहे’ या स्टार प्रवाहवरील मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. मालिकांविषयी बोलायचे झाल्यास काही वर्षांपूर्वी आलेली त्यांची स्टार प्रवाहची मालिका ‘अग्निहोत्र’ विशेष गाजली होती. या मालिकेत विक्रम यांनी साकारलेले मोरेश्वर अग्निहोत्री हे पात्र आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे.  चित्रपट, मालिका आणि नाटक अशा

MB NEWS- प्रा. रंजना प्रल्हादराव शहाणे-उडानशिव यांना पी एच डी.प्रदान

इमेज
 प्रा. रंजना प्रल्हादराव शहाणे-उडानशिव यांना पी एच डी.प्रदान  परळी वैजनाथ.....          येथील कै. लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभागप्रमुख प्रा. रंजना प्रल्हादराव शहाणे- उडानशिव यांना नुकतीच विद्या वाचस्पती (पी.एच. डी.) पदवी मिळाली.  Click: ● *एका संवेदनशील रेल्वे प्रवाशाचे मनोगत* ✍️सुनील फुलारी. >>>>>>>>>>>>> *रेल्वेने कात टाकली....दृष्ट लागावी अशी प्रगती* .       मानव विद्या शाखे अंतर्गत राज्यशास्त्र या विषयात,"महीला राजकरणात बचत गटाची भूमिका: बीड जिल्ह्याचा विशेष संदर्भ"या शीर्षकाखाली संशोधक मार्गदर्षक डॉ. दिनकर आर. तांदळे. यशवंतराव चव्हाण महाविद्यालय अंबाजोगाई यांच्या मार्गदर्शनात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात प्रबंध सादर केला.त्यास विद्यापीठाने मान्यता देवून प्रा. रंजना शहाणे उडानशिव यांना पी एच डी पदवी बहाल केली. प्रा. शहाणे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

MB NEWS-एका संवेदनशील रेल्वे प्रवाशाचे मनोगत

इमेज
  एका संवेदनशील रेल्वे प्रवाशाचे  मनोगत   रेल्वेने कात टाकली....दृष्ट लागावी अशी प्रगती                     ✍️ सुनील फुलारी. ---------------------------------------------- --------------------------------------------- अ सं म्हणतात रेल्वे म्हणजे एक अजगर असं अजस्त्र धूड आहे. कारण रेल्वेच्या पटरीवर पळणारी लोखंडी अवजाराने बनवलेले हे वजनदार  यंत्र जेव्हा वळणा वळणाने पळते तेव्हा एखादा अजगर जंगलात धावताना दिसतो त्यासम याचे दृश्य असते. याच प्रमाणे या विभागाचा, मंत्रालयाचा कारभारही असतो ज्याप्रमाणे अजगर सुस्त पडून असतो आणि एकदा तो शिकारीला निघाला की शिकार घेतल्यावरच थांबतो. त्याप्रमाणे रेल्वे विभाग ही एकदा काम हातात घेतल्यावर संपवल्याशिवाय थांबत नाहीत ....नाहीतर मग कित्येक दिवस त्या कामाला मुहूर्त लागत नाही.हा अनुभव परळीकर यांनी घेतलाय. जेव्हा मीटरगेज काढून परभणी ते परळी याचे ब्रॉडगेज झालं अतिशय वेगाने झाले होते. छाया:सुनील फुलारी     सध्या मराठवाड्याला स्वप्नवत असणारी गोष्ट म्हणजे हैदराबाद,उदगीर, परळी ,परभणी हा मार्ग विद्युतीकरण होतो आहे. आणि अतिशय वेगाने होणाऱ्या या विद्युकरणाचा टप्पा आता

MB NEWS-स.न.वि.वि....... राहुल गांधींचे महाराष्ट्राला पत्र

इमेज
  स.न.वि.वि....... राहुल  गांधींचे महाराष्ट्राला पत्र ए मबी न्युज ऑनलाईन डेस्क : कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली गेले काही दिवस देशभरात भारत जोडो यात्रा  सुरु आहे.  या यात्रेने ७ नोव्हेंबरला  महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यात प्रवेश केला. जवळपास दोन आठवडे ही यात्रा महाराष्ट्रात होती. दोन दिवसापूर्वी भारत जोडो यात्रा आंध्रप्रदेशमध्ये प्रवेश केला. राहुल गांधी यांनी महाराष्ट्राला निरोपाचं पत्र लिहलं आहे. राहुल  गांधी यांच महाराष्ट्राला लिहलेलं पत्र त्यांच्याच शब्दांमध्‍ये. महाराष्ट्रात भारत जोडो यात्रेचा शुभारंभ देगलूर येथून छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घेऊन सुरु झाला आणि शिवाजी महाराज यांचा मातृ जिल्हा, (जिजाऊ मांसाहेबांचा जन्म जिल्हा) बुलढाणा येथून ती मध्य प्रदेशमध्ये जात आहे. महाराष्ट्रातील छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, साईबाबा आणि गजानन महाराज तसेच येथील सर्व संतांच्या विचारांपासून प्रेरणा घेत आम्ही वाटचाल करणार आहोत. या संतांच्या विचाराने शेकडो वर्ष समतेचा, सामाजिक न्यायाचा, बंधुत्वाचा विचार

MB NEWS-तळागाळातील लोकांची कामे केल्याने गुजरातमध्ये पुन्हा एकदा 'मोदींची'च सत्ता-पंकजाताई

इमेज
  पंकजाताई मुंडेंचा गुजरात निवडणूकीत झंजावती प्रचार दौरा तळागाळातील लोकांची कामे  केल्याने गुजरातमध्ये पुन्हा एकदा  'मोदींची'च  सत्ता कालोल, गोधराच्या प्रचारसभेत व्यक्त केला विश्वास मुंबई । दिनांक २३। भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे सध्या गुजरात विधानसभा निवडणुकीच्या झंजावती प्रचार दौर्‍यावर आहेत.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कल्याणकारी योजना थेट तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचविल्याने गुजरातमध्ये पुन्हा 'मोदींची'च सत्ता येणार असल्याचा दृढ विश्वास त्यांनी प्रचार सभांमधून व्यक्त केला. मोदींचे हात बळकट करण्यासाठी   भाजपच्या उमेदवारांना प्रचंड बहुमतांनी विजयी करा असे आवाहन पंकजाताईंनी कालोल, गोधरा येथील सभेत बोलतांना केले.    केंद्रीय स्तरावरील भाजपचे नेते सध्या गुजरात राज्यात प्रचार दौर्‍यावर असून त्याचाच एक भाग म्हणून पंकजाताई मुंडे हया देखील भाजपा उमेदवारांच्या प्रचारासाठी   आज सकाळीच मुंबई हून विमानाने गुजरातला रवाना झाल्या. सकाळी  अहमदाबाद  विमानतळावर  भाजपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी त्यांचं जोरदार स्वागत केलं.     कालोल विधानसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवा

MB NEWS-काशी कॉरिडॉरप्रमाणे पंचवटी-त्र्यंबकेश्वर कॉरिडॉर विकसित व्हावा – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

इमेज
   ● परळी वैजनाथ काॅरिडाॅरसाठीही राज्यपालांकडे निवेदन करणे आवश्यक  काशी कॉरिडॉरप्रमाणे पंचवटी-त्र्यंबकेश्वर कॉरिडॉर विकसित व्हावा – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी मुंबई, दि. 22 : भारतीय संस्कृती पुरातन – नित्यनूतन असून युरोपमधील पुनर्जागरणाप्रमाणे आज भारतीय पुनर्जागरण होत आहे. अशा वेळी भारतीय संस्कृती व सभ्यतेचा प्रचार प्रसार कसा होईल या दृष्टीने प्रयत्न झाले पाहिजेत, असे सांगताना काशी व अयोध्येच्या पुनरुत्थानाप्रमाणेच राज्यात देखील पंचवटी – त्र्यंबकेश्वर कॉरिडॉर विकसित व्हावा, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज येथे केले. केंद्रीय शिक्षण मंत्रालय भारत सरकार यांच्या सूचनेनुसार केंद्रीय संस्कृत विद्यापीठ नवी दिल्ली तर्फे आयोजित ‘भारतीय बौद्धिक संपदा व सांस्कृतिक वारशाचे नवे आयाम’ या विषयावरील ‘विकास यात्रा’ या  एक दिवसीय चर्चासत्राचे उद्घाटन राज्यपाल श्री. कोश्यारी यांच्या उपस्थितीत गिरगाव चौपाटी मुंबई येथील भारतीय विद्या भवनच्या सभागृहात पार पडले, त्यावेळी ते बोलत होते. Click-संबंधित बातमी: ■ *ज्योतिर्लिंग वैद्यनाथ कॉरिडॉर: 'आस्था जगाची, अस्मिता परळीची' संकल्पनेसा

MB NEWS-कामगार कल्याण केंद्र परळी थर्मल येथे वर्धापनदिन उत्साहात साजरा

इमेज
  कामगार कल्याण केंद्र परळी थर्मल येथे वर्धापनदिन उत्साहात साजरा परळी वैजनाथ,  प्रतिनिधी...       महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ  कामगार कल्याण केंद्र परळी थर्मल येथे वर्धापनदिन उत्साहात साजरा करण्यात आला.        या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री विजय कुमार डाखोरे तर प्रमुख पाहुणे श्री अब्दुल नइम ,सौ चाटे सौ मुंढे  व सौ बाविस्कर या उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केंद्र महिला कल्याण  सहयिका श्रीमती उज्वला बडवे मॅडम यांनी केले.केंद्राचे केंद्र संचालक श्री व्ही व्ही वायाल सर  यांनी सर्व निमंत्रित पाहुण्यांचे स्वागत केले ,तर प्रस्तावित मध्ये श्रीमती बडवे यांनी केंद्राच्या  उपक्रमाची माहिती दिली . .      यावेळी केंद्र सभासद ,शिशुमन्दिर मुलं, सर्व पालक उपस्थित होते.कार्यक्रमात महिलांना हळदीकुंकू व मुलांना गोड खाऊ देण्यात आला, कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी श्री मंडलिक, गंगाधर कांबळे, सौ लोखंडे मॅडम सौ निर्मला सिरसाट यांनी परिश्रम घेतले.

MB NEWS-• तालुकास्तरीय स्पर्धेत शाळांचा हिरिरीने उत्स्फूर्त सहभाग

इमेज
  कै. राजीव गांधी अनुसूचित जाती जमाती निवासी आश्रमशाळा खडका येथे तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा उत्साहात • तालुकास्तरीय स्पर्धेत शाळांचा हिरिरीने उत्स्फूर्त सहभाग     सोनपेठ, प्रतिनिधी....        तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा 2022 23 अंतर्गत सोनपेठ तालुक्यातील शाळांच्या तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा कै. राजीव गांधी अनुसूचित जाती जमाती निवासी आश्रम शाळा खडका येथे मोठ्या उत्साहात पार पडल्या.या क्रीडा स्पर्धेसाठी तालुक्यातील बहुसंख्य शाळांमधील क्रीडापटूंनी सहभाग घेतला.           कै. राजीव गांधी अनुसूचित जाती जमाती निवासी आश्रम शाळा खडका येथील भव्य क्रीडांगणावर आज मंगळवार दि.२२ रोजी तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या. तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन उपस्थित विविध शाळांच्या क्रीडा शिक्षकांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी तालुका क्रीडा संयोजक शिवाजी तळेकर कै. राजीव गांधी अनुसूचित जाती निवासी आश्रम शाळेचे मुख्याध्यापक डी एल सोनकांबळे यांच्यासह राजकुमार धबडे, गुलाबराव कदम, देशपांडे सर, विठ्ठल राठोड, राजभोज, लहाने, पारेकर, यु.डी. राठोड, मोरे, कांबळे  आरबाड, नेळगे, जालमिले, चाटे,चव्हा

MB NEWS-शुक्रवारी धरणे आंदोलन

इमेज
  किसान सभा व माकपचे विविध मागण्यांसाठी शुक्रवारी धरणे आंदोलन परळी वै.ता.२२ प्रतिनिधी अतिवृष्टीचे अनुदान लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावे, बांधकाम कामगारांना २० हजार बोनस द्यावा यासह इतर मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य किसान सभा व मार्क्सवादी कम्युनिष्ट पक्षाच्या वतीने शुक्रवारी (ता.२५) परळी तहसिल कार्यालया समोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात शेतकरी व बांधकाम कामगारांनी मोठया संख्येनी सहभागी व्हावे असे आवाहन किसान सभा व माकप कडून करण्यात आले आहे. शेतकऱ्यांना खरीप २०२२ चा पिकविमा सरसगट देण्यात यावा. शेतक-यांना २०२२ खरीप हंगाम अग्रीम तात्काळ वाटप करा. अतिवृष्टी नुकसानीचे वाटप तात्काळ करावे, शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडू नये, नागपिपरी येथील सबस्टेशनचे काम त्वरीत सुरू करावे, नागापुर येथील सबस्टेशन मधील संच तात्काळ सुरू करावे या मागणीसाठी अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने परळी तहसील कार्यालयावर धरणे आंदोलन होणार आहे.  तर माकपा परळीच्या वतीने  बांधकाम कामगारांना २० हजार रुपये बोनस दयावा, योजनेचे लाभ अर्ज मिळाल्यावर एक महिण्याच्या आत दयावा,२०२२ पर्यंत सर्वांना घरे या मोदी

MB NEWS-● थरारक: लग्नाला नकार दिल्याने प्रियकराने पेटवून घेत, प्रेयसीला मिठी मारली

इमेज
● थरारक: लग्नाला नकार दिल्याने प्रियकराने पेटवून घेत, प्रेयसीला मिठी मारली लग्नास नकार दिल्याने संतापलेल्या प्रियकराने अंगावर पेट्रोल ओतून स्वतःला पेटवून प्रेयसीला मिठी मारली. या घटनेत दोघेही गंभीर भाजले होते. घाटी रुग्णालयात दोघांवर उपचार सुरू असताना 95 टक्के भाजलेल्या तरुणाचा रात्री 10 वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला तर तरुणीवर उपचार सुरू आहेत. विद्यापीठ परिसरातील शासकीय न्याय सहायक विज्ञान संस्थेच्या प्रयोगशाळेत हा भयंकर थरार घडला. या प्रकरणी बेगमपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Click:- ● *विशेष दंगा नियंत्रण पथक म्हणून देशभरात सुपरिचित असलेले रॅपिड अ‍ॅक्शन फोर्स परळीत दाखल.* #mbnews #subscribe #like #share #comments परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्याच्या दाभा गावातील गजानन खुशालराव मुंढे (30) हा विद्यापीठ परिसरातील वसतिगृहात राहत होता. तो विद्यापीठात प्राणिशास्त्रामध्ये पीएच.डी.चे संशोधन करत तासिका तत्त्वावर काम करत होता. सिल्लोड तालुक्यातील पूजा कडुबा साळवे (28, सिडको एन-7) ही शासकीय विज्ञान संस्थेत बायोफिजिक्समध्ये पीएच.डी. करते आणि तीदेखील तासिका तत्त्वावर काम

MB NEWS-कामगार कल्याण केंद्र परळी शहर येथे कौमी एकता सप्ताह साजरा

इमेज
  कामगार कल्याण केंद्र परळी  येथे कौमी एकता सप्ताह साजरा परळी वैजनाथ.... महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ कामगार कल्याण केंद्र परळी शहर येथे कौमी एकता सप्ताह साजरा करण्यात आला.     या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री इंगोले सर(छत्रपती शिवाजी विद्यालय)  तसेच श्री केशव कुकडे (कामगार) तर अध्यक्ष सौ रुपनर अंजली  या लाभल्या,कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती बडवे मॅडम यांनी केले,यावेळी बोलताना श्री इंगोले यांनी भारत देशात अनेकता तुन एकता  याचं सुंदर उदाहरण देऊन उपस्थित सर्वांचे लक्ष वेधून घेतले व स्त्री जीवनावर आधारित कविता सादर केली.   तसेच कुकडे यांनी  देशात  अखंडता कशी ठेवता येईल यावर मार्गदर्शन केले व स्नेह मेळ  ही सुंदर कविता सादर केली,यावेळी केंद्रा चे केंद्र संचालक श्री  वायाल सर ,मंडलिक श्रीमती बडवे मॅडम,लोखंडे मॅडम,सिरसाट मॅडम,गंगाधर कांबळे हे उपस्थित होते, कार्यक्रमाचे आभार लोखंडे मॅडम यांनी केले.

MB NEWS -वैशालीताई विलासराव देशमुख यांनी घेतले प्रभु वैद्यनाथाचे दर्शन

इमेज
  वैशालीताई विलासराव देशमुख यांनी घेतले प्रभु वैद्यनाथाचे दर्शन  परळी वैजनाथ (प्रतिनिधी):       श्रीमती वैशालीताई विलासरावजी देशमुख यांनी एकादशी निमित्त आज रविवार दि.२० / ११ / २२ रोजी श्री प्रभु वैद्यनाथाचे दर्शन घेतले.        परळी येथे त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग असलेल्या प्रभु वैद्यनाथाच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतले. यावेळी *वैद्यनाथ देवस्थांन कमिटीचे  सेक्रेटरी राजेश देशमुख* यांनी त्यांचे पुष्पहार व श्री वैघनाथ प्रतिमा देउन सत्कार केला.

MB NEWS-भारताला विश्वगुरूपद कायम ठेवायचे असेल तर वारसा स्थळांचे जतन केले पाहिजे -श्री नितीन शेटे

इमेज
  भारताला विश्वगुरूपद कायम ठेवायचे असेल तर वारसा स्थळांचे जतन केले पाहिजे -नितीन शेटे  अंबाजोगाई........ "भारताला विश्वगुरूपद जर कायम ठेवावयाचे असेल तर केदारेश्वर मंदिरांसारख्या इतरही अनेक वारसा स्थळांचा वारसा आपण जतन केला पाहिजे,"असे प्रतिपादन भा.शि.प्र. संस्थेचे माजी कार्यवाह तथा उद्घाटक श्री. नितीन शेटे यांनी केले. ते पुरातत्व विभाग महाराष्ट्र शासन औरंगाबाद, इतिहास संकलन संस्था महाराष्ट्र आणि खोलेश्वर महाविद्यालय, अंबाजोगाई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केदारेश्वर महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख उद्घाटक म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुरेंद्र आलूरकर हे उपस्थित होते तर मंचावर पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक श्री. अनिल गोटे तसेच पुरातत्व विभागाचे समन्वयक श्री. मयुरेश खडके, केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य श्री. अप्पाराव यादव,सौ. वर्षाताई मुंडे, श्री. राम कुलकर्णी, दीनदयाळ नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष तथा महाविद्यालयीन विकास समितीचे सदस्य एड. मकरंदजी पत्की, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मुकुंद देवर्षी आदी मान्यव

MB NEWS-ग्रामपंचायत निवडणुकांवर लक्ष केंद्रित करणार -भास्कर रोडे

इमेज
  रिपाईच्या विभागीय सचिव पदी निवड झाल्याबद्दल प्रा.दासु वाघमारे यांचा सत्कार  ग्रामपंचायत निवडणुकांवर लक्ष केंद्रित करणार -भास्कर रोडे परळी (प्रतिनिधी)    रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या मराठवाडा विभागीय सचिव पदी प्रा . दासू वाघमारे यांची निवड झाल्याबद्दल रिपाईचे राज्य सरचिटणीस भास्कर (नाना) रोडे यांच्या हस्ते नुकताच त्यांचा सत्कार संपन्न झाला. यावेळी बोलतांना भास्कर रोडे म्हणाले की,बीड जिल्ह्यातील आगामी ग्रामपंचायत निवडणुकीत आघाडी पक्षासोबत राहून जास्तीत जास्त उमेदवार व सरपंच आणणे यावर लक्ष केंद्रित करणार.       रिपाईचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय समाज कल्याण मंत्री खा. रामदासजी आठवले यांच्या नेतृत्वाखाली संपन्न झालेल्या बैठकीत नुकतीच प्रा. दासू वाघमारे यांची रिपाईच्या मराठवाडा विभागीय सचिव पदी नियुक्ती करण्यात आली होती. या नियुक्ती बद्दल परळी शहरात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राज्याचे सरचिटणीस भास्कर नाना रोडे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जेष्ठ नेते गंगाधर (आप्पा )रोडे हे उपस्थित होते.यावेळी भास्कर रोडे यांनी रिपाईच्या ताब्यात जास्तीत जास्त ग्रामपंचायती कशा येतील

MB NEWS-नियुक्तीपासून वंचित राहिलेल्या एसईबीसी उमेदवारांना दिलासा

इमेज
  नियुक्तीपासून वंचित राहिलेल्या एसईबीसी उमेदवारांना दिलासा एसईबीसीमधून ईडब्ल्यूएसमध्ये विकल्प दिलेल्या व ज्यांची निवड दिनांक ९ सप्टेंबर २०२० पूर्वी झालेली आहे अशा उमेदवारांना ईडब्ल्यूएस प्रवर्गाचा लाभ देऊन निवड प्रक्रिया व उमेदवारांच्या वैध शिफारशीनुसार नियुक्ती देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला. महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित याचिकांवरील अंतिम निकालाच्या अधीन राहून ही नियुक्ती असेल या निर्णयाचा लाभ २०१४ ते ९.९.२०२० या कालावधीमध्ये निवड झालेल्या एसईबीसी उमेदवारांना अनुज्ञेय करण्यात आलेला ईडब्ल्यूएस विकल्प ग्राहय धरून, नंतर पूर्ण करण्यात आलेल्या निवड प्रक्रियेमधील नियुक्तीपासून वंचित राहिलेल्या उमेदवारांना मिळणार आहे. मराठा आरक्षण कायदा, २०१८ या कायदयास मा. सर्वोच्च न्यायालयाने दिनांक ९ सप्टेंबर २०२० रोजी अंतरीम स्थगिती दिली व दिनांक ५ मे २०२१ रोजी कायदा रद्द केला. ईएसबीसी कायदा, २०१४ व एसईबीसी कायदा, २०१८ अन्वये निवड झालेल्या उमेदवारांना सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती देण्यापूर्वी, नोकरभरती वरील निबंध, कोविड- १९, लॉकडाऊन व न्यायालयीन

MB NEWS-पदभरतीच्या स्पर्धा परीक्षा टीसीएस, आयबीपीएस कंपन्यांकडून घेण्यास मान्यता

इमेज
  पदभरतीच्या स्पर्धा परीक्षा टीसीएस, आयबीपीएस कंपन्यांकडून घेण्यास मान्यता राज्यातील पदभरतीच्या स्पर्धा परीक्षा टीसीएस-आयओएन व आयबीपीएस या कंपन्यांकडून घेण्यास आज मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. यामुळे भरती प्रक्रिया सुरु होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील म्हणजेच लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील गट ब, गट क आणि गट ड ही पदे सरळ सेवेने भरताना आता या कंपन्यांमार्फत स्पर्धा परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येतील. यासाठी परीक्षा घेण्याचे दर, परीक्षांची विहित कार्यपद्धती व इतर अटी शर्ती माहिती तंत्रज्ञान विभागाच्या उच्चाधिकार समितीच्या मान्यतेने करण्यास देखील मंत्रिमंडळाने मंजुरी दिली होती. या अनुषंगाने उच्चाधिकार समितीच्या बैठकीत या प्रस्तावावर चर्चा होऊन आज या दोन्ही कंपन्यांनी दिलेल्या कराराच्या प्रारुपास मान्यता देण्यात आली. संबंधित विभागाने पदभरती करताना ऑनलाईन पद्धतीने प्रत्येक पदभरती प्रक्रीया व स्पर्धा परीक्षा घेण्यासाठी या कंपन्यांबरोबर सामंजस्य करार करावयाचा आहे. या संदर्भातील विस्

MB NEWS- वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासन दखल घेत नाही; तक्रारकर्त्याचा अमरण उपोषणाचा इशारा

इमेज
  अवैध आणि धोकादायक इमारतीवर कारवाई करण्याची मागणी वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासन दखल घेत नाही; तक्रारकर्त्याचा अमरण उपोषणाचा इशारा परळी वैजनाथ (प्रतिनिधी) परळी वैजनाथ येथील वॉर्ड क्र.४, घर क्रमांक १०४ च्या दक्षिण बाजूस असलेले शेजारी महादेव व मोहन भालचंद्र तिडके यांचा घर क्रमांक १०५ असा आहे. त्यांनी विना परवानगी निकृष्ट दर्जाचे अतिरिक्त जागेत अतिक्रमनित करून बांधकाम केलेल्या धोकादायक इमारतीवर कारवाई करण्याची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून रामकृष्ण भोजने हे करत आहेत. मात्र वारंवार पाठपुरावा करूनही नगर पालिका प्रशासनाला जाग येत नसल्याने जिल्हाधिकारी बीड यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. याबाबत सविस्तर असे की, शहरातील नेहरू चौकातील तिडके यांनी अतिक्रमण करून धोकादायक इमारत उभी केलेली आहे. ही इमारत विनापरवाना बांधलेली असून, सदरील इमारतीस कोणतेही मजबूत सिमेंट व गजाळीचे फाऊंडेशन (कॉलम, पाया अथवा बिम) नाही. यामुळे कुठल्याही क्षणी धोका होऊ शकतो आणि इमारत कोसळू शकते. मालवणी मालाड किंवा बीड येथील इमारत दुर्घटनेची येथे पुनरावृत्ती होऊ शकते. जिल्हाधिाऱ्यांच्या निव

MB NEWS-महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाचा 27 नोव्हेंबर रोजी विजयी मेळावा

इमेज
  महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाचा 27 नोव्हेंबर रोजी विजयी मेळावा परळी (प्रतिनिधी. )  महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाच्या वतीने लोकशाही मार्गाचा अवलंब करून महाराष्ट्रातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या आर्थिक मागण्यासाठी प्रखर आंदोलने केली होती. या आंदोलनामुळे अल्प वेतनापासून वेतनश्रेणीच्या कायम सेवेसाठी दिलेल्या लढ्याला यश मिळाले आहे. त्याबद्दल 27  नोव्हेंबर रोजी बीड येथे राज्यस्तरीय विजय मेळावा तथा उद्दिष्टपूर्ती संकल्प महासभेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती परळी तालुका अध्यक्ष उत्तम गीते यांनी दिली आहे.      बीड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात 27  नोव्हेंबर 2022 रविवार रोजी दुपारी बारा वाजता या राज्यस्तरीय विजय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महासंघाचे अध्यक्ष प्रा. काँम्रेड तानाजी ठोंबरे हे राहणार आहेत. तर कार्याध्यक्ष मिलिंद गणवीर, सखाराम दुर्गुडे,एक.बी. कुलकर्णी संघटन सचिव मंगेश म्हात्रे,  बबन पाटील, अडवोकेट सुधीर ठोकेकर,  उज्वल गांगर्डे ,वसंतराव वाघ आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.      या राज्यस्तरीय विजयी मेळाव्यासा

MB NEWS-उत्पत्ती एकादशीनिमित्त वैद्यनाथास गर्दी

इमेज
उत्पत्ती एकादशीनिमित्त वैद्यनाथास गर्दी  परळी ,उत्पत्ती एकादशी व आळंदी यात्रा निमित्त प्रभू वैद्यानाथ ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेण्यासाठी रविवारी भाविकांची  प्रचंड गर्दी झाली होती .हजारो भाविकांनी रांगेत थांबून प्रभू वैद्यनाथाचे दर्शन घेतले तसेच वैद्यनाथ मंदिर जवळील संत जगमित्र नागा मंदिरातही भाविकांची गर्दी झाली होती.                            उत्पत्ती एकादशी व आळंदी यात्रा असल्याने हजारो वारकऱ्यांनी परळी वैजनाथ ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतले .रांगेत थांबून एक तासाच्या आत दर्शन झाले असे भाविकांनी सांगितले.              रविवारी सकाळ पासूनच  वैद्यनाथ मंदिरात   भाविकांची प्रचंड गर्दी झाल्याने पोलीस बंदोबस्त वाढवावा लागला तसेच वैद्यनाथ मंदिरातिल खाजगी सुरक्षा रक्षकांनी कडक बंदोबस्त ठेवल्याने हजारो भक्तांना दर्शन घेणे सुलभ झाले , वैद्यनाथ देवस्थान ट्रस्ट चे सेक्रेटरी राजेश देशमुख ,विश्वस्त नागनाथराव देशमुख हे मंदिरात थांबून होते,

MB NEWS-संभाजी ब्रिगेड वर्धापन दिनाच्या पूर्वतयारीसाठी अंबाजोगाई येथे जिल्हा आढावा बैठक

इमेज
  संभाजी ब्रिगेड वर्धापन दिनाच्या पूर्वतयारीसाठी अंबाजोगाई येथे जिल्हा आढावा बैठक  अंबेजोगाई : 30 नोव्हेंबर रोजी संभाजी ब्रिगेडचा वर्धापन दिन नाशिक येथे संपन्न होणार आहे. वर्धापन दिनाच्या पूर्व तयारी बैठक अंबाजोगाई येथे संपन्न झाली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघ जिल्हाध्यक्ष रामकिसन मस्के सर तर प्रमुख मार्गदर्शक संभाजी ब्रिगेडचे बीड जिल्हा अध्यक्ष प्रवीण ठोंबरे सर संभाजी ब्रिगेड परळी तालुकाध्यक्ष देवराव लुगडे महाराज हे होते. बैठकीमध्ये काही  याबैठकी दरम्यान काही पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या यामध्ये संभाजी ब्रिगेडच्या बीड जिल्हा उपाध्यक्षपदी परमेश्वर मिसाळ, तालुका उपाध्यक्ष पदी अतुल सुरवसे, संभाजी ब्रिगेड विद्यार्थी आघाडी अंबाजोगाई तालुका उपाध्यक्षपदी सौरभ सुरवसे, संभाजी ब्रिगेड महिला आघाडी कोषाध्यक्षपदी कोमल देशमाने, महिला आघाडी तालुका सहसचिव ममता माळी यांच्या निवडी करण्यात आल्या. तसेच या आढावा बैठकीमध्ये होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या संदर्भात चर्चा झाली याप्रसंगी मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष रामकिसन मस्के सर, संभाजी ब्रिगेड बीड जिल्हा अध्यक्ष प्रवीण ठो

MB NEWS-श्री. सुर्वेश्वर मंदिर येथे मंगळवारी भव्य शिव सत्संगाचे आयोजन; कार्यक्रमाचा भाविकांनी लाभ घेण्याचे आवाहन

इमेज
श्री. सुर्वेश्वर मंदिर येथे मंगळवारी भव्य शिव सत्संगाचे आयोजन; कार्यक्रमाचा भाविकांनी लाभ घेण्याचे आवाहन परळी वैजनाथ /प्रतिनिधी       येथील श्री  सुर्वेश्वर मंदिर येथे मंगळवार दिनांक 22 नोव्हेंबर रोजी भव्य शिव सत्संग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या धार्मिक कार्यक्रमाचा परळी शहर व पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन श्री सुर्वेश्वरनगर विकास समितीच्या वतीने करण्यात आले आहे. श्री  सुर्वेश्वर मंदिर येथे मंगळवारी भव्य शिव सत्संग कार्यक्रम रात्री नऊ ते बारा वाजेपर्यंत परळी वैजनाथ येथील आर्ट ऑफ लिव्हींग सत्संग मंडळाचे सदस्य यांच्या सुमधुर व ओजस्वी वाणीतून हा कार्यक्रम संपन्न होणार असून या कार्यक्रमास परळी शहर व पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी हजारोच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन श्री सुर्वेश्वर नगर विकास समिती परळी वैजनाथ यांनी केले आहे. .

MB NEWS-गीता परिवारच्या वतीने परळीत २१ रोजी कार्यकर्त्यांची कार्यशाळा

इमेज
  गीता परिवारच्या वतीने परळीत २१ रोजी कार्यकर्त्यांची कार्यशाळा परळी वैजनाथ ,प्रतिनिधी... गीता परिवारच्या वतीने परळी येथे कार्यकर्त्यांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली असून या कार्यशाळेला गीता परिवार च्या राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रमिला दीदी माहेश्वरी या मार्गदर्शन करणार आहेत. याचा लाभ घ्यावा असे आवाहन गीता परिवार परळीच्या अध्यक्षा सौ.श्वेता आशिष काबरा, सचिव सौ राजकन्या मंत्री यांनी केले आहे.          विठ्ठल मंदिर जाजूवाडी परळी येथे गीता परिवार च्या वतीने दि.२१ रोजी दुपारी ३ वा.कार्यकर्ता कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असून या कार्यशाळेचे अध्यक्षस्थानी जवाहर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष जुगलकिशोर लोहिया हे राहणार आहेत. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून परळीचे गटशिक्षणाधिकारी नवनाथ सोनवणे उपस्थित राहणार आहेत. या कार्यशाळेला गीता परिवार च्या राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रमिला दीदी माहेश्वरी यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. या कार्यशाळेचा मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आवाहन गीता परिवार परळीचे अध्यक्षा सौ.श्वेता काबरा, सचिव सौ.राजकन्या मंत्री व सदस्यांनी केले आहे.

MB NEWS-श्रद्धा वालकर हत्या प्रकरणानंतर राज्य सरकारचं मोठं पाऊल; आंतरधर्मीय विवाह केलेल्या मुलींच्या सद्यस्थितीबाबत दिली महत्त्वपूर्ण सूचना

इमेज
  श्रद्धा वालकर हत्या प्रकरणानंतर राज्य सरकारचं मोठं पाऊल; आंतरधर्मीय विवाह केलेल्या मुलींच्या सद्यस्थितीबाबत दिली महत्त्वपूर्ण सूचना मुंबई - लिव्ह इन पार्टनरकडून झालेल्या श्रद्धा वालकर हिच्या क्रूर हत्येच्या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. दरम्यान, आंतरधर्मीय विवाह केलेल्या महिला, मुलींचा सध्याची स्थिती काय आहे, तसेच त्या सुखरूप आहेत का याची माहिती घेण्यासाठी विशेष पथक स्थापन करण्याची सूचना महिला आणि बालकल्याणमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी राज्य महिला आयोगला दिली आहे. याबाबत मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले की, काल महिला आयोगाच कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमामध्ये श्रद्धा वालकर प्रकरणाबाबत चर्चा झाली.  श्रध्दा वालकरप्रमाणेच इतरही अनेक प्रकरणे आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत. ज्या मुलींचे आपल्या परिवारासोबत संबंध तुटत आहेत. त्यांच्यासाठी महिला आयोगाने पुढे येऊन अश्या मुलींचा शोध घेतला पाहिजे. त्यांची काय स्थिती आहे त्याचा आढावा घेतला पाहिजे. तसेच या मुलींना माहिला आयोग काय मदत करु शकते याकडे लक्ष दिले पाहिजे, असे आदेश मी दिले आहेत. आंतरधर्मीय विवाह झालेल्यांची सध्याची परिस्थिती काय आहे. संबंधित

MB NEWS-काळभैरवनाथ मंदिरात काळभैरवनाथ जयंती उत्सव

इमेज
  काळभैरवनाथ मंदिरात  काळभैरवनाथ जयंती उत्सव परळी, येथील नेहरुचौक तळ भागातील काळभैरवनाथ मंदिरात गुरुवारी  काळभैरवनाथ जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले,गुरुवारी पहाटे ५ ते ७ लघुरुद्राचा अभिषेक, ७ ते ९ महापुजा व भैरवनाथास श्रृंगार चढवण्यात आला .१० ते १२ संगीत भजन , दुपारी १२ ते २ महाआरती करण्यात आली .दुपारी  ४ वाजता आरती व पुजा भाजपाचे जेष्ठ नेते फुलचंदराव कराड यांच्या हस्ते करण्यात आले, आरतीसाठी भरत महाराज जोगी,परळी चे माजी नगराध्यक्ष  बाजीराव धर्माधिकारी ,  ,  जयराज देशमुख यांच्यासह इतर भाविक उपस्थित होते, ,४ ते ६ स्वामी समर्थ केंद्रातील   जवळपास २५० ते ३०० सेवेकरी यांनी  १०८ भैरवनाथ स्तोत्राचे पठण केले, रात्री १० ते १२ पारंपारीक नाथांचे ब्रम्हानंदी पद व भजन नंतर भैरवनाथाचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला . दिवसभरात २५००० भाविकानी दर्शनाचा लाभ घेतला असे भरत महाराज जोगी यांनी कळविले

MB NEWS-राजस्थान मधील मरण पावलेल्या व्यक्तीचा परळीत न.प.मध्ये नोंद करण्याचा अर्ज न.प.ने फेटाळला

इमेज
  मृत्यु नोंदबाबतची दीर्घकालीन न्यायालयीन लढाई: सारखेच नाव असल्याचा गैरफायदा घेऊन वारस बनण्याचा प्रयत्न; परळी न. प.ने अर्ज फेटाळला *राजस्थान मधील मरण पावलेल्या व्यक्तीचा परळीत न.प.मध्ये नोंद करण्याचा अर्ज न.प.ने फेटाळला* परळी वैजनाथ राजस्थानमध्ये 1967 सुमारास मरण पावलेल्या व्यक्तीची परळी नगर परिषदेत नोंद करण्याचा अर्ज परळी नगर परिषदेचे मुख्याधिकारी सुंदर बोंदर यांनी दीर्घ न्यायालयीन लढाईनंतर फेटाळून लावला आहे. थोडक्यात वृत्त असे की राजस्थान येथील नागोर जिल्ह्यातील बजरंगलाल पिता किशनलाल गुडगिल्ला हे 1967 च्या सुमारास राजस्थान येथे मयत झाले होते. बजरंग लाल यांना कोणतेही मूलबाळ नव्हते परंतु त्यांना चाळीस एकर जमीन होती. सदर जमीन बजरंग लाल यांचे भावांच्या वारसाकडे वंशपरंपरेने चालत आली होती. परंतु महसूल रेकॉर्डला बजरंगलाल यांचे नाव कमी झाले नव्हते म्हणून परळी येथील मयत पापालाल पिता किसनलाल सारस्वत यांचे नातु राजगोपाल विष्णुदास सारस्वत (शर्मा) ह.मु.इचलकंरजी यांनी किशनलाल हे सारखे नाव याचा गैरफायदा घेऊन परळीतील काही लोकांना हाताशी धरून पापालाल किशनलाल हेच बजरंगलाल किशनलाल आहेत व तशी नगरपरिषदेत