इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

MB NEWS-तळागाळातील लोकांची कामे केल्याने गुजरातमध्ये पुन्हा एकदा 'मोदींची'च सत्ता-पंकजाताई

 पंकजाताई मुंडेंचा गुजरात निवडणूकीत झंजावती प्रचार दौरा

तळागाळातील लोकांची कामे  केल्याने गुजरातमध्ये पुन्हा एकदा  'मोदींची'च  सत्ता

कालोल, गोधराच्या प्रचारसभेत व्यक्त केला विश्वास



मुंबई । दिनांक २३।

भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे सध्या गुजरात विधानसभा निवडणुकीच्या झंजावती प्रचार दौर्‍यावर आहेत.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कल्याणकारी योजना थेट तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचविल्याने गुजरातमध्ये पुन्हा 'मोदींची'च सत्ता येणार असल्याचा दृढ विश्वास त्यांनी प्रचार सभांमधून व्यक्त केला. मोदींचे हात बळकट करण्यासाठी   भाजपच्या उमेदवारांना प्रचंड बहुमतांनी विजयी करा असे आवाहन पंकजाताईंनी कालोल, गोधरा येथील सभेत बोलतांना केले.


   केंद्रीय स्तरावरील भाजपचे नेते सध्या गुजरात राज्यात प्रचार दौर्‍यावर असून त्याचाच एक भाग म्हणून पंकजाताई मुंडे हया देखील भाजपा उमेदवारांच्या प्रचारासाठी   आज सकाळीच मुंबई हून विमानाने गुजरातला रवाना झाल्या. सकाळी  अहमदाबाद  विमानतळावर  भाजपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी त्यांचं जोरदार स्वागत केलं.


    कालोल विधानसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार  फत्तेसिंह चौहान तर गोधरा येथील उमेदवार सी. के. राहूल यांच्या प्रचारार्थ पंकजाताई मुंडे यांच्या उत्स्फूर्त जाहीर सभा झाल्या. या सभांना मतदारांनी मोठी गर्दी केली होती. भाजपचे ज्येष्ठ नेते विनोद तावडे तसेच स्वतः उमेदवार व स्थानिक पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.


   आपल्या भाषणात पुढे बोलतांना पंकजाताई म्हणाल्या की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे गुजरात आज विकासाच्या बाबतीत पहिल्या क्रमांकांचे राज्य बनले आहे. भारताची व राज्याची संपूर्ण जगात एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे. बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेपासून ते थेट अंतराळापर्यंत भारताच्या प्रगतीत मोदींच्या नेतृत्वाचा मोठा वाटा आहे. त्यांनी जनतेसाठी आखलेल्या व अंमलात आणलेल्या कल्याणकारी योजनांचा फायदा तळागाळातील दुर्बल, वंचित घटकांपर्यंत पोचला आहे. गरीबातला गरीब माणूस भाजपला बहुमत देऊन पुन्हा एकदा गुजरातमध्ये त्यांचीच सत्ता आणणार आहे असा मला विश्वास आहे. मोदींचे हात बळकट करणे ही काळाची गरज आहे, त्यामुळे भाजपच्या उमेदवारांना प्रचंड मतदान करून विजयी करावे असे आवाहन पंकजाताई मुंडे यांनी मतदारांना यावेळी केले. या दौऱ्यात पंकजाताईंनी ठिक ठिकाणी मतदार व कार्यकर्त्यांशी देखील संवाद साधला.

••••

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!