MB NEWS-राजस्थान मधील मरण पावलेल्या व्यक्तीचा परळीत न.प.मध्ये नोंद करण्याचा अर्ज न.प.ने फेटाळला

 मृत्यु नोंदबाबतची दीर्घकालीन न्यायालयीन लढाई: सारखेच नाव असल्याचा गैरफायदा घेऊन वारस बनण्याचा प्रयत्न; परळी न. प.ने अर्ज फेटाळला



*राजस्थान मधील मरण पावलेल्या व्यक्तीचा परळीत न.प.मध्ये नोंद करण्याचा अर्ज न.प.ने फेटाळला*


परळी वैजनाथ

राजस्थानमध्ये 1967 सुमारास मरण पावलेल्या व्यक्तीची परळी नगर परिषदेत नोंद करण्याचा अर्ज परळी नगर परिषदेचे मुख्याधिकारी सुंदर बोंदर यांनी दीर्घ न्यायालयीन लढाईनंतर फेटाळून लावला आहे.

थोडक्यात वृत्त असे की राजस्थान येथील नागोर जिल्ह्यातील बजरंगलाल पिता किशनलाल गुडगिल्ला हे 1967 च्या सुमारास राजस्थान येथे मयत झाले होते. बजरंग लाल यांना कोणतेही मूलबाळ नव्हते परंतु त्यांना चाळीस एकर जमीन होती. सदर जमीन बजरंग लाल यांचे भावांच्या वारसाकडे वंशपरंपरेने चालत आली होती. परंतु महसूल रेकॉर्डला बजरंगलाल यांचे नाव कमी झाले नव्हते म्हणून परळी येथील मयत पापालाल पिता किसनलाल सारस्वत यांचे नातु राजगोपाल विष्णुदास सारस्वत (शर्मा) ह.मु.इचलकंरजी यांनी किशनलाल हे सारखे नाव याचा गैरफायदा घेऊन परळीतील काही लोकांना हाताशी धरून पापालाल किशनलाल हेच बजरंगलाल किशनलाल आहेत व तशी नगरपरिषदेत 1985 च्या मृत्यू नोंद अभिलेखात नोंद न करताच वरच्या वर खोटे व बनावट मृत्यू प्रमाणपत्र तयार करून त्या आधारे राजस्थान येथे वारसाफेरफार घेऊन राजस्थान येथील मरण पावलेल्या व्यक्तीची करोडो रुपयांची मालमत्ता एका बिल्डरला विक्री केली होती. याबाबत खरे वारसदार अशोककुमार मोहनलाल शर्मा रा.राजस्थान ह.मु.पेठवडगाव जि.कोल्हापुर यांना माहिती झाल्यानंतर त्यांनी परळी येथे येऊन परळी न्यायालयात फिर्याद दाखल करून न्यायालयाच्या आदेशानुसार राजगोपाल विष्णुदास शर्मा सह इतर दोन व्यक्तीविरुद्ध गु.र.नं.219/2019 गुन्हा कलम 420 468 467 471 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.परळी शहर पोलिस स्टेशनचे सहा.पोलिस  निरीक्षक अशोक खरात व पोलीस कर्मचारी यांनी राजस्थान येथे जाऊन प्रकरणाची शहानिशा करून दोन्ही व्यक्ती वेगवेगळे आहेत व बनावट कागदपत्रे बनवून मालमत्ता विक्री केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर आरोपींना अटक करुन पोलीस कोठडी घेऊन नंतर न्यायालयीन कोठडीत पाठवले .प्रकरण न्यायालयात प्रलंबित असताना राजगोपाल विष्णुदास शर्मा यांनी औरंगाबाद येथील उच्च न्यायालयात रिट याचिका क्र.11819/2019 दाखल करुन परळी नगर परिषद यांना नावात उर्फ म्हणून दुरुस्ती करण्याची मागणी केली.मा.उच्च न्यायालयाने परळी नगर परिषदेला सुनावणी घेऊन 12 आठवड्यात निर्णय घेण्याबाबत आदेश दिला होता. त्यानुसार परळी नगर परिषद येथे मुख्याधिकारी श्री.सुंदर बोंदर यांनी सुनावणी घेतली.परळी वैजनाथ येथे 1985 मध्ये मृत्यू पावलेले व्यक्ती हेच राजस्थान येथील 1967 च्या सुमारास मृत्यू पावलेले बजरंगलाल आहेत याबाबत कोणतेही कागदोपत्री पुरावे नाहीत म्हणून पापालाल यांच्या नातु राजगोपाल यांचा पापालाल उर्फ बजरंगलाल सारस्वत उर्फ गुडगिल्ला अशी नावे घालून दुरुस्ती करण्याचा अर्ज फेटाळून लावला.

आक्षेप अर्जदार अशोककुमार शर्मा यांच्या वतीने अँड आर.व्ही.गित्ते नंदागौळकर यांनी काम पाहिले.मृत्यू नोंदीबाबत परळीच्या इतिहासात एवढी दिर्घ न्यायालयीन लढाई पहिलीच आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार