इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

MB NEWS- प्रा. रंजना प्रल्हादराव शहाणे-उडानशिव यांना पी एच डी.प्रदान

 प्रा. रंजना प्रल्हादराव शहाणे-उडानशिव यांना पी एच डी.प्रदान 



परळी वैजनाथ.....

         येथील कै. लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभागप्रमुख प्रा. रंजना प्रल्हादराव शहाणे- उडानशिव यांना नुकतीच विद्या वाचस्पती (पी.एच. डी.) पदवी मिळाली. 



Click:● *एका संवेदनशील रेल्वे प्रवाशाचे मनोगत* ✍️सुनील फुलारी. >>>>>>>>>>>>> *रेल्वेने कात टाकली....दृष्ट लागावी अशी प्रगती*


.       मानव विद्या शाखे अंतर्गत राज्यशास्त्र या विषयात,"महीला राजकरणात बचत गटाची भूमिका: बीड जिल्ह्याचा विशेष संदर्भ"या शीर्षकाखाली संशोधक मार्गदर्षक डॉ. दिनकर आर. तांदळे. यशवंतराव चव्हाण महाविद्यालय अंबाजोगाई यांच्या मार्गदर्शनात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात प्रबंध सादर केला.त्यास विद्यापीठाने मान्यता देवून प्रा. रंजना शहाणे उडानशिव यांना पी एच डी पदवी बहाल केली. प्रा. शहाणे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!