इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

MB NEWS-एका संवेदनशील रेल्वे प्रवाशाचे मनोगत

 एका संवेदनशील रेल्वे प्रवाशाचे  मनोगत

 रेल्वेने कात टाकली....दृष्ट लागावी अशी प्रगती

                    ✍️सुनील फुलारी.

----------------------------------------------


---------------------------------------------

सं म्हणतात रेल्वे म्हणजे एक अजगर असं अजस्त्र धूड आहे. कारण रेल्वेच्या पटरीवर पळणारी लोखंडी अवजाराने बनवलेले हे वजनदार  यंत्र जेव्हा वळणा वळणाने पळते तेव्हा एखादा अजगर जंगलात धावताना दिसतो त्यासम याचे दृश्य असते. याच प्रमाणे या विभागाचा, मंत्रालयाचा कारभारही असतो ज्याप्रमाणे अजगर सुस्त पडून असतो आणि एकदा तो शिकारीला निघाला की शिकार घेतल्यावरच थांबतो. त्याप्रमाणे रेल्वे विभाग ही एकदा काम हातात घेतल्यावर संपवल्याशिवाय थांबत नाहीत ....नाहीतर मग कित्येक दिवस त्या कामाला मुहूर्त लागत नाही.हा अनुभव परळीकर यांनी घेतलाय. जेव्हा मीटरगेज काढून परभणी ते परळी याचे ब्रॉडगेज झालं अतिशय वेगाने झाले होते.

छाया:सुनील फुलारी

    सध्या मराठवाड्याला स्वप्नवत असणारी गोष्ट म्हणजे हैदराबाद,उदगीर, परळी ,परभणी हा मार्ग विद्युतीकरण होतो आहे. आणि अतिशय वेगाने होणाऱ्या या विद्युकरणाचा टप्पा आता पूर्णत्वात कडे गेल्यामुळे लवकरच वीस तीस वर्षांपूर्वी पुण्या मुंबईच्या लाईट वरच्या रेल्वे पाहून हरकून जाणारी मंडळी ,आता प्रत्यक्ष आपल्या गावात या लाईट वरील रेल्वेचा आनंद घेणार आहेत. कोळशाची आणि वाफेची दमदार, जोरदार इंजिन पाहिलेल्या पिढीला नंतर डिझेल म्हणजे फक्त मालगाडी वाहतूक करणारे असे माहित होते. पण नंतर वाफेचे इंजिन बंद होऊन नंतरच्या काळात आलेली सर्वच रेल्वेला डिझेल इंजिन लागल्याने आता यात बदल लवकर होणे शक्य नाही असे वाटत असताना, अगदी कल्पनेच्या बाहेर जाऊन जोरदार वेग व विकास घेत  रेल्वे मंत्रालयाने आधुनिकतेची कास घेतल्याने, रेल्वेविभाग अतिशय प्रगतीपथावर आहे असे म्हणल्यास वावगे होणार नाही.सेवा सुविधा, सुरक्षा व आधुनिक तंत्रज्ञान विकसित केले आहे. 


संबंधित बातमी :पहा- 🛑 *GROUND REPORT:-परळी वैजनाथ रेल्वे मार्ग विद्युतीकरणाचे काम अंतिम टप्प्यात.#mbnews #subscribe #like #share #comments


    थोड्याच दिवसापूर्वी जिकडे तिकडे नुसते खड्डेच खड्डे असणाऱ्या ठिकाणी लोखंडी पोल व त्याचबरोबर वेगाने तार ओढून अतिशय वेगवान काम पूर्णतः आले आहे. आता प्रतीक्षा आहे ती याची चाचणी आणि त्याचबरोबर उद्घाटन, हेही काम लवकरच होईल या प्रतीक्षेतच सर्वजण आवर्जून या विद्युतकरणाकडे आकर्षित होत आहेत.पोल, तार पाहून हर्ष उल्हासित होत आहेत हे निश्चित. या लाईट रेल्वेमुळे वेगाने प्रवास व वेळेची बचत दोन्ही गोष्टी साध्य होणार  आहेत.आता लवकरच लाईटवरची रेल्वे येईल , काही नवीन लांबपल्याच्या गाड्याही धावतील आणि परळी रेल्वे स्टेशन गजबजून होऊन जाईल. व्यवसाय, व्यापार, पर्यटन आवक-जावक, दळणवळण, वाढेल ही अपेक्षा.

                ●प्रतिक्षेत एक प्रवासी●

✍️सुनील फुलारी.

छायाचित्रकार . परळी वैजनाथ.

23/11/2022.

----------------------------------------------------


टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या