MB NEWS-कामगार कल्याण केंद्र परळी थर्मल येथे वर्धापनदिन उत्साहात साजरा

 कामगार कल्याण केंद्र परळी थर्मल येथे वर्धापनदिन उत्साहात साजरा



परळी वैजनाथ,  प्रतिनिधी...

      महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ  कामगार कल्याण केंद्र परळी थर्मल येथे वर्धापनदिन उत्साहात साजरा करण्यात आला.


       या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री विजय कुमार डाखोरे तर प्रमुख पाहुणे श्री अब्दुल नइम ,सौ चाटे सौ मुंढे  व सौ बाविस्कर या उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केंद्र महिला कल्याण  सहयिका श्रीमती उज्वला बडवे मॅडम यांनी केले.केंद्राचे केंद्र संचालक श्री व्ही व्ही वायाल सर  यांनी सर्व निमंत्रित पाहुण्यांचे स्वागत केले ,तर प्रस्तावित मध्ये श्रीमती बडवे यांनी केंद्राच्या  उपक्रमाची माहिती दिली .


.      यावेळी केंद्र सभासद ,शिशुमन्दिर मुलं, सर्व पालक उपस्थित होते.कार्यक्रमात महिलांना हळदीकुंकू व मुलांना गोड खाऊ देण्यात आला, कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी श्री मंडलिक, गंगाधर कांबळे, सौ लोखंडे मॅडम सौ निर्मला सिरसाट यांनी परिश्रम घेतले.

टिप्पण्या