प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार

इमेज
चंद्रपूरच्या प्रदूषणावर ना. पंकजा मुंडे ॲक्शन मोडवर ; विधानसभेतील लक्षवेधीत मांडली परखड भूमिका प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न माझ्यासाठी महत्वाचा मुंबई, दि. २५ - चंद्रपूरसारख्या अतिप्रदूषित औद्योगिक क्षेत्रासाठी शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लॉंग टर्म गोल्सचा स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला असून तो चंद्रपूरमध्ये पायलट प्रकल्प म्हणून राबविण्यात येणार आहे असे स्पष्ट करत हा आराखडा अंतिम करून सभागृहासमोर सादर करण्यात येईल, नागरिकांचे आरोग्य  माझ्यासाठी महत्वाचे आहे असं राज्याच्या  पर्यावरण मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज विधानसभेत परखडपणे सांगितलं.   आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरमधील कोल वॉशरी, कोळसा खाणी, सिमेंट उद्योग आणि थर्मल पॉवर प्रकल्पांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री मुंडे म्हणाल्या की, मी काही दिवसांपूर्वी चंद्रपूरचा दौरा केला.या दौऱ्यात मी स्वतः अनेक उद्योग, कोल वॉशरी आणि प्रभावित गावांना भेटी दिल्या. त्या भागातील प्रदूषणाची तीव्रता प्रत्यक्ष पाहिल...

MB NEWS-गीता परिवारच्या वतीने परळीत २१ रोजी कार्यकर्त्यांची कार्यशाळा

 गीता परिवारच्या वतीने परळीत २१ रोजी कार्यकर्त्यांची कार्यशाळा



परळी वैजनाथ ,प्रतिनिधी...
गीता परिवारच्या वतीने परळी येथे कार्यकर्त्यांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली असून या कार्यशाळेला गीता परिवार च्या राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रमिला दीदी माहेश्वरी या मार्गदर्शन करणार आहेत. याचा लाभ घ्यावा असे आवाहन गीता परिवार परळीच्या अध्यक्षा सौ.श्वेता आशिष काबरा,सचिव सौ राजकन्या मंत्री यांनी केले आहे.
         विठ्ठल मंदिर जाजूवाडी परळी येथे गीता परिवार च्या वतीने दि.२१ रोजी दुपारी ३ वा.कार्यकर्ता कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असून या कार्यशाळेचे अध्यक्षस्थानी जवाहर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष जुगलकिशोर लोहिया हे राहणार आहेत. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून परळीचे गटशिक्षणाधिकारी नवनाथ सोनवणे उपस्थित राहणार आहेत. या कार्यशाळेला गीता परिवार च्या राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रमिला दीदी माहेश्वरी यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. या कार्यशाळेचा मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आवाहन गीता परिवार परळीचे अध्यक्षा सौ.श्वेता काबरा, सचिव सौ.राजकन्या मंत्री व सदस्यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या