पोस्ट्स

MB NEWS-"त्या" शिक्षकाच्या आत्महत्येप्रकरणी एकावर गुन्हा दाखल

इमेज
  सहकारी शिक्षकाने शिवीगाळ करून मारहाण केली: आपमान सहन न झाल्याने केली शाळेतच आत्महत्या  "त्या" शिक्षकाच्या आत्महत्येप्रकरणी एकावर गुन्हा दाखल  सोनपेठ, प्रतिनिधी....            गंगाखेड ते परभणी राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या रुमणा पाटीवर शिवीगाळ करून मारहाण केल्याने अपमानित झालेले शिक्षक विठ्ठलराव अनंतराव रत्नपारखी यांनी धारासुर तांडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सकाळी दहा वाजता गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत सोनपेठ पोलीस ठाण्यात दिनांक 26 डिसेंबर रोजी   दिलेल्या तक्रारीवरून आरोपी धारासुर तांडा येथील जिल्हा परिषद शिक्षक राठोड यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.            हृदय पिळवटून टाकणाऱ्या या घटनेने शैक्षणिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. धारासुर जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक मयत रत्नपारखी यांना सोमवारी सकाळी आरोपी शिक्षक राठोड यांनी फोन करून धारासुर शाळेवर येण्यास सांगितले. तेव्हा मयत शिक्षक रत्नपारखी यांनी मी पंचायत समितीत नोकरीवर आहे शाळेत येऊ शकत नाही असे आरोपीस सांगितले. आरोपी शिक्षकाने फोनवर अरेरावीची भाषा वापरल्याने मयत शिक्षक

MB NEWS:पंतप्रधान मोदी यांच्या भावाच्या कारला अपघात : तिघे गंभीर जखमी

इमेज
  पंतप्रधान मोदी यांच्या भावाच्या कारला अपघात : तिघे गंभीर जखमी   पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाऊ प्रल्हाद मोदी यांच्या कारला कर्नाटकातील म्हैसूरमध्ये अपघात झाला. म्हैसूर तालुक्यातील काडाकोलाजवळ आज (दि२७) झालेल्या अपघातात प्रल्हाद मोदी यांच्यासह त्यांचा नातू आणि सून गंभीर जखमी झाले आहेत. प्रल्हाद मोदी त्यांच्या मर्सिडीज बेंझ कारने बंगळुरूहून बांदीपूरला जात होते. यावेळी त्यांचा मुलगा, सून आणि नातूही कारमध्ये होते. या अपघातात प्रल्हाद मोदी, त्यांची सून आणि नातू गंभीर जखमी झाले आहेत. मुलगा आणि चालक किरकोळ जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने म्हैसूरच्या जेएसएस रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. म्हैसूरच्या पोलीस अधीक्षक सीमा लाटकर तातडीने घटनास्थळी रवाना झाल्या आहेत.

MB NEWS:प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांसादर्भात धनंजय मुंडे यांनी घेतली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट

इमेज
  औष्णिक विद्युत केंद्रातील प्रकल्पग्रस्तांच्या नोकरीचा प्रश्न तातडीने सोडवा - धनंजय मुंडे यांची देवेंद्र फडणवीसांकडे मागणी एकही प्रकल्पग्रस्त उमेदवारावर अन्याय होऊ देणार नाही - फडणवीसांचे आश्वासन नागपूर (दि. 28) - परळी वैद्यनाथ सह  राज्यातील विविध औष्णिक विद्युत केंद्रातील प्रकल्पग्रस्त उमेदवारांना शासकीय नियमाप्रमाणे नोकरी देणे व अन्य मागण्या तातडीने मान्य करण्यात याव्यात अशी मागणी माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांनी आज उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. धनंजय मुंडे यांनी सध्या नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या दरम्यान उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन प्रकल्पग्रस्तांच्या विविध मागण्यांचे निवेदन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले. यावेळी ऊर्जा प्रकल्पांसाठी जमिनी संपादित केलेल्या एकही प्रकल्पग्रस्त उमेदवारावर अन्याय होऊ देणार नाही, असे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांना दिले आहे. परळी वैद्यनाथ येथील औष्णिक विद्युत केंद्र येथील काही प्रकल्पग्रस्त अद्याप न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. सरकारने वेळोवेळी

MB NEWS:परळी पेंटर युनियन च्या माध्यमातून पेंटराच्याच्या विविध समस्या साठी लढणार - पिराजी किर्ते

इमेज
  परळी पेंटर युनियन च्या माध्यमातून पेंटराच्याच्या विविध समस्या साठी लढणार - पिराजी किर्ते  परळी प्रतिनिधी - शहरातील पेंटर युनियनच्या माध्यमातून लढणार असल्याचे प्रतिपादन पिराजी  किर्ते यांनी केले. ते परळी येथे आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत बोलत होते.परळी येथील जिजामाता उद्यान येथे पेंटर युनियनची नुकतीच बैठक संपन्न झाली.      पेंटर युनियनचे अध्यक्ष पिराजी किर्ते म्हणाले की, वाढती महागाई पाहता पेंटर लेबर ची मजुरी वाढवून देण्यात यावी.तसा  ठराव यावेळी सर्वानुमते घेण्यात आला.    यावेळी पेंटर युनियनची कार्यकारणी निवडण्यात आली. अध्यक्ष म्हणून पिराजी कीर्ती, तर उपाध्यक्ष सय्यद ताहीर भाई ,सचिव संतोष रोडे, कोषाध्यक्ष गंगाधर वाघमारे यांची निवड करण्यात आली.तर सदस्य राजेश शिंदे,राजेश होके, बालाजी देशमुख,विनोद वाघमारे , विनोद आचार्य ,संघपाल कसबे, निलेश जाधव यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली  यावेळी मुख्य मार्गदर्शक म्हणून ओमकार मिरकले, बाळू फुन्ने,  सतीश गोरे ,शिवाजी दराडे,देविदास मिरकले ,पद्माकर सरोदे ,शिवाजी केसापुरी, लक्ष्मण कांबळे, प्रशांत सोनवणे, विठ्ठल जाधव ,सुनील गायकवाड, दीपक व्हावळे ,कन

MB NEWS:सीमाप्रश्नी कर्नाटक सरकारविरोधातील ठराव एकमताने मंजूर

इमेज
  सीमाप्रश्नी कर्नाटक सरकारविरोधातील ठराव एकमताने मंजूर         :  सीमाप्रश्नी कर्नाटक सरकारविरोधातील ठराव विधीमंडळात आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मांडला. हा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. सीमेवरील ८६५ गावे महाराष्ट्रात आणण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल. बेळगाव, निपाणी, बिदरसह कारवार महाराष्ट्रात आणणार, असा निर्धार मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला. ठराव मांडण्यात आल्यानंतर विधानसभेत घोषणाबाजी करण्यात आली. सीमेवरील ८६५ गावे महाराष्ट्रात आणण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल. बेळगाव, निपाणी, बिदर, कारवार, भालकीसह ८६५ गावे महाराष्ट्रात आणण्याचा प्रयत्न करण्यात येईल. सीमा भागात काम करणाऱ्या मराठी संस्था, संघटनांना अर्थ सहाय्य केले जाईल. विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक जागा राखीव ठेवण्यात येईल. सीमाप्रश्नी बलिदान देणाऱ्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्याची घोषणा यावेळी मुख्यमंत्र्यांनी केली. ८६५ गावातील नागरिकांना महाराष्ट्राचे नागरिक समजण्यात येईल. त्यांच्या सांस्कृतिक, शैक्षणिक विकासासाठी आर्थिक मदत केली जाईल. तसेच अनेक योजनांसाठी निधी दिली जाईल, अशी घोषणाही मुख्यमंत्री शिंदे  यांनी केली. द

MB NEWS:लव्ह जिहाद व धर्मांतरण विरोध कायदा करण्यात यावा- प्रमुख मागणी

इमेज
  29 डिसेंबर रोजी परळी वैजनाथ येथे हिंदू धर्मरक्षण मूक मोर्चा   लव्ह जिहाद व धर्मांतरण विरोध कायदा करण्यात यावा- प्रमुख मागणी परळी वैजनाथ :- राज्यात व देशात लव जिहादच्या घटना सातत्याने घडत आहेत.  यासाठी कठोर कायदा असावा तसेच धर्मांतरणाला ही बंदी घातली पाहिजे.लव्ह जिहाद व धर्मांतरण विरोध कायदा करण्यात यावा या प्रमुख मागणीसाठी 29 डिसेंबर रोजी परळी वैजनाथ येथे हिंदू धर्मरक्षण मूक मोर्चा काढण्यात येणार आहे.         जबरदस्तीने असो किंवा मर्जीने कोणत्याही प्रकारचे धर्मांतरणास परवानगी नसावी. प्रत्येकाने आपापल्या धर्माचे पालन करावे व इतर धर्मामध्ये ढवळाढवळ करु नये. तसेच लव जिहाद च्या नावाखाली अनेक तरुणींना फसवून, नादाला लावून पुन्हा हत्या केल्या गेल्या आहेत. त्यांच्या गुन्हेगाराना तातडीने फाशी देण्यात येण्यासाठी कठोर कायदा करावा या मागणी साठी समस्त हिंदू समाजाचा  मुकमोर्चा गुरूवार दि 29 डिसेंबर रोजी राणी लक्ष्मीबाई टॉवर पासून निघून तहसील कार्यालय परळी पर्यंत निघणार आहे.       या मोर्चास समस्त हिंदू बंधु भगिनींनी उपस्थित रहावे असे आवाहन समस्त हिंदू समाजाकडून करण्यात आले आहे. ● असा असेल मोर्

MB NEWS:एमपीएससी मार्फत पात्र ठरलेल्या स्थापत्य अभियंत्यांना मिळणार न्याय

इमेज
 'त्या' 111 उमेदवारांनाही एमपीएससी मार्फत नियुक्ती देण्यात येणार - उपमुख्यमंत्र्यांची धनंजय मुंडेंच्या प्रश्नावर घोषणा एमपीएससी मार्फत पात्र ठरलेल्या स्थापत्य अभियंत्यांना मिळणार न्याय नागपूर (दि. 27) - राज्य लोकसेवा आयोगाने 2019 साली घेतलेल्या स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा 2019 अंतर्गत पात्र ठरलेल्या मात्र ई डब्ल्यू एस कोट्यातून आरक्षणाची अडचण झाल्याने नियुक्ती प्रलंबित राहिलेल्या 111 उमेदवारांच्या नियुक्ती साठी राज्य सरकार मॅट कडे भक्कमपणे बाजू मांडणार असून, या सर्व उमेदवारांना नियुक्ती मिळवून देणार असल्याची घोषणा आज विधानसभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नावर उत्तर देताना केली आहे.    राज्य लोकसेवा आयोगाने 2019 साली आयोजित केलेल्या स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षेत एकूण 1143 उमेदवार पात्र ठरले होते. यांपैकी 1032 उमेदवारांना काही दिवसांपूर्वी ऑनलाइन पद्धतीने तारांकित प्रश्न उपस्थित झाल्याचे लक्षात आल्याने तसेच नियुक्ती मिळण्यासाठी उमेदवारांनी उपोषणाचे व आंदोलनाचे अस्त्र उपसल्याने दि. 1 डिसेंबर रोजी 1032 उमेदवारा

MB NEWS:व्याख्यान, निमंत्रितांचे कविसंमेलन व सांस्कृतिक कार्यक्रम

इमेज
  १६ जानेवारीपासून स्व.श्यामराव देशमुख स्मृति समारोह व्याख्यान, निमंत्रितांचे कविसंमेलन व सांस्कृतिक कार्यक्रम  परळी वैजनाथ (प्रतिनिधी)...    येथील कै.लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयाच्या प्रांगणात दिनांक 16 जानेवारी 2023ते 19 जानेवारी 2023 दरम्यान संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्व.श्यामराव देशमुख यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ स्मृतिसमारोहाचे आयोजन करण्यात आले आहे.  सोमवार दि .16 / 01 / 2023 रोजी सकाळी 11:00 वा.  नंदकुमार ठाकूर (पोलीस अधीक्षक ,बीड ) यांच्या शुभहस्ते या स्मृतिसमारोहाचे उद्घाटन संपन्न होईल. यावेळी सुप्रसिद्ध कवी प्रभाकर साळेगावकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असतील. या समारोहात सुप्रसिद्ध व्याख्याते अविनाश भारती (औरंगाबाद )यांच्या 'आई - बाप दैवत माझे' या विषयावरील व्याख्यानाने स्मृतिसमारोहाची सुरुवात होईल.हे व्याख्यान 16 जानेवारी 2023 रोजी सायंकाळी सहा वाजता महाविद्यालयाच्या प्रांगणात होईल.17 जानेवारी 2023 रोजी सायंकाळी सहा वाजता सुप्रसिद्ध व्याख्याते मा.गणेश शिंदे(पुणे)यांचे 'जीवन सुंदर आहे ' या विषयावर व्याख्यान आयोजित केले आहे.  Click &watch  ■ *

MB NEWS:सर्वांना ठेका धरायला लावणारी हलगी झाली अबोल: परळीतील प्रसिद्ध वादक बाबू आवचारे यांचे निधन

इमेज
  सर्वांना ठेका धरायला लावणारी हलगी झाली अबोल: परळीतील प्रसिद्ध वादक बाबूराव आवचारे यांचे निधन परळी वैजनाथ, प्रतिनिधी...            आपल्या हलगीच्या ठेक्यावर सर्वांना ठेका धरायला लावणारी हलगी अबोल झाली आहे. मराठवाड्यात आपल्या हलगीवादनाने व बॅण्डने प्रसिद्ध असलेले प्रसिद्ध वादक परळी भुषण बाबू आवचारे यांचे  आज (दि.26)  सायंकाळी निधन झाले.    आपल्या हलगीच्या ठेक्यावर सर्वांना ठेका धरायला लावणारी हलगी वादन बाबू आवचारे करत. त्यावर अनेकांच्या लेझमीने ठेका धरला. प्रसिध्द हालगीवादक बाबू आवचारे म्हणजे परळीतील कुठलाही  कार्यक्रम असो, त्यांचे हालगीवादन ठरलेले. परळीचे  भुषण व  गजा ढोलपथकाचे व्यवस्थापक मालक बाबुराव अवचारे अतिशय सुस्वभावी, संयमी व सर्वपरिचित व्यक्तिमत्व म्हणून परिचित होते.        परळीभुषण, सुप्रसिद्ध वादक बाबुराव अवचारे यांना  हृदयविकाराचा त्रास झाला.परळीतील एका   हाॅस्पीटल येथे उपचारादरम्यान सायं. 7:00 वा दुःखद निधन झाले. मृत्युसमयी  ते 75 वर्षे वयाचे होते.त्यांच्या पश्चात 6 मुलं एक मुलगी जावई, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.  उद्या दिनांक.27 रोजी अंत्यविधी....      दरम

MB NEWS:परळी वैजनाथ थर्मलमधील 'वाघ' एसीबीच्या 'सापळ्यात' पकडला

इमेज
  परळी वैजनाथ थर्मलमधील लाचखोरी:'वाघ' एसीबीने 'सापळ्यात' पकडला परळी वैजनाथ दि. 26 : परळीतील परळी थर्मल पॉवर स्टेशन म.रा.वि.नि.कंपनी मर्यादित येथील उप कार्यकारी अभियंता याने राख वाहतुकीसाठी गेटपास देण्यासाठी खाजगी इसमाच्या मार्फत 80 हजाराची लाच स्वीकारली. या प्रकरणी दोघांवर परळीत कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई सोमवारी (दि. 26) बीड एसीबीच्या टीमने केली आहे. अनिल रामदास वाघ (वय 36 उप कार्यकारी अभियंता, परळी थर्मल पॉवर स्टेशन म.रा.वि.नि. कंपनी मर्यादित) व एक खाजगी इसम अशी लाचखोरांचे नाव आहे. त्यांनी तक्रारदार यांना थर्मल केंद्र, परळी येथील राख वाहतुकीसाठी 20 गेटपास देण्यासाठी लोकसेवक यांनी प्रत्येकी गेटपास 4000 रूपये प्रमाणे एकुण 80 हजार रुपये लाचेची मागणी करून लाच रक्कम खाजगी व्यक्तीकडे देण्यास सांगितली व सदर लाच रक्कम 80 हजार रुपये खाजगी व्यक्तीने स्वतः पंच साक्षीदार समक्ष स्वीकारली असता लाच रकमेसह रंगेहाथ पकडले आहे. ही कारवाई बीड एसीबीने केली. ही कारवाई पोलीस अधिक्षक संदीप आटोळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधिक्षक शंकर शिंदे यांच्या टिमने केली. श्री. रविंद्र पर

MB NEWS:परळी वैजनाथ तालुक्यातील उपसरपंच निवडीचे वेळापत्रक प्रशासनाने केले जाहीर

इमेज
  परळी वैजनाथ तालुक्यातील उपसरपंच निवडीचे वेळापत्रक प्रशासनाने केले जाहीर परळी वैजनाथ तालुक्यातील उपसरपंच निवडणुक तारखा जाहीर याप्रमाणे होणार उपसरपंचाची निवड 1)दि 29 -12-2022 रोजी 37 ग्रामपंचायत  2)दि 30-12-2022 रोजी 37 ग्रामपंचायत  3)31-12-2022 रोजी 05 ग्रामपंचायत  4)01-01-2022 रोजी 01 ग्रामपंचायत  याप्रमाणे 80 ग्रामपंचायत उपसरपंच निवडणुक होणार आहेत.                        श्री सुरेश शेजूळ                     तहसीलदार परळी वै

MB NEWS:आज गांधीगिरी केलीय यानंतर भगतसिंगगिरी करु : डॉ. संतोष मुंडेॅचा प्रशासनाला सज्जड इशारा

इमेज
आज गांधीगिरी केलीय यानंतर भगतसिंगगिरी करु : डॉ. संतोष मुंडेॅचा प्रशासनाला सज्जड इशारा परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-   दिव्यांग, विधवा, परित्यक्ता  ज्येष्ठ नागरिक यांना लाभ मिळवून देणाऱ्या योजनांची अंमलबजावणी होत नसल्याने या घटकांचे प्रश्न प्रलंबित आहेत. अशा घटकांच्या विविध मागण्यांसाठी परळी तहसील कार्यालयावर सोमवार, २६ डिसेंबर रोजी दिव्यांगाचे कैवारी तथा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे  प्रदेश उपाध्यक्ष डॉ. संतोष मुंडे यांच्या नेतृवाखाली आणि माजी मंत्री आ. धनंजय मुंडेंच्या मार्गदर्शनाखाली पाच ते सहा हजारपेक्षा अधिक नागरिकांनी विराट आंदोलन केले.          याप्रसंगी बोलताना दिव्यांग, विधवा, परित्यक्ता  ज्येष्ठ नागरिक यांना न्याय देण्यासाठी गांधीगिरी करूच वेळ आली तर भगतसिंगगिरी करू असे प्रतिपादन यावेळी बोलताना डॉ. संतोष मुंडे यांनी केले. आंदोलनातील विविध मागण्या पुढीलप्रमाणेवरील;  १. वरील सर्वांना अंत्यादोयामध्ये (2 रू. प्रति किलो गहू व 3 रुपये प्रति किलो तांदूळ) समावेश करून घ्यावा.  २. तहसीलद्वारे या घटकांना देण्यात येणाऱ्या पगारी नियमित करणे तसेच त्यात कमी जास्त न करणे. ३. वरील घटकांना सरसकट

MB NEWS-जि.प.शिक्षकाची शाळेतच गळफास लावून आत्महत्या

इमेज
  जि.प.शिक्षकाची शाळेतच गळफास लावून आत्महत्या गंगाखेड, प्रतिनिधी...           गंगाखेड तालुक्यातील धारासुर येथील जिल्हा परिषद शाळेत कार्यरत शिक्षकाने शाळेतच गळफास लावून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.या घटनेने शिक्षण वर्तुळात खळबळ उडाली आहे.             गंगाखेड तालुक्यातील धारासुर येथील जिल्हा परिषद शाळेत कार्यरत शिक्षक  विठ्ठल अनंतराव रत्नपारखे हे नेहमीप्रमाणे शाळेत ड्युटीसाठी घरून निघाले. शाळेत आले.परत कधीच वर्गावर मुलांना शिकवणार नाही असा कार्यक्रम आखून त्यांनी स्वत: आॅफिसमधिल हुकाला पॅकिंगच्या पांढऱ्या पट्टीने गळफास घेतला.शाळेत गेल्यावर मुलांना शंभर रुपये काढून देत मुलांना बिस्किटे आणायला सांगून आज शाळेत कार्यक्रम होणार आहे असे सांगितले.  मुले बाहेर जाताच ऑफिसमध्येच विठ्ठल रत्नपारखी यांनी आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.       या घटनेची माहिती सरपंच राजेभाऊ गवळी यांनी सोनपेठ पोलिसांना कळवताच सोनपेठ पोलीस ठाण्याचे स.पोलीस निरीक्षक संदीप बोरकर यांनी घटनास्थळावर धाव घेतली. मृतदेह रुग्णालयात उत्तरीय तपासणी करिता पाठवण्यात आला आहे. या घटनेची फिर्या

MB NEWS:चिचखंडी खून प्रकरणात दोघेजण संशयीत ताब्यात

इमेज
  चिचखंडी  खून प्रकरणात दोघेजण संशयीत ताब्यात अंबाजोगाई - तालुक्यातील चिचखंडी शिवारात एका 22 वर्षीय तरुणाचा निर्घृण खून करून त्याचा मृतदेह आढळून आल्यानंतर परिसरात मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणात खूनाचे कारण स्पष्ट झाले नव्हते. आज ग्रामिण पोलिसांनी या भागातील दोघा संशयीतांना ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे.  अंबाजोगाई तालुक्यातील चिचखंडी येथील अर्जून पंढरी गडदे (वय 22) हा तरूण दोन दिवसापासून बेपत्ता झाला होता. रविवारी सकाळी त्याचा मृतदेह रस्त्यालगत आढळून आल्यानंतर नातेवाईकांसह ग्रामिण पोलिसांनी घटनास्थळावर भेट देवून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी स्वाराती रूग्णालयात आणण्यात आला. याची तपासणी झाल्यानंतर या तरूणाचा गळा दाबून दगडाने ठेचून खून करण्यात आल्याचे उत्तरीय तपासणीत आढळून आले. संबंधीत तरूणाचा खून कुठल्या कारणास्तवर करण्यात आला.  याचे उत्तर अनुत्तरीत असल्यामुळे ग्रामिण पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक श्रीनिवास  सावंत यांनी सोमवारी गावात जावून तपासाची चक्रे फिरवली. या खून प्रकरणात दोघा जणांना सशयीत म्हणून ताब्यात घेतले असून त्यांच्या जवाबानंतरच खूनाचे कारण स्पष्ट

MB NEWS:महाराष्ट्र आशा- गटप्रवर्तक फेडरेशनचा नागपूरला धडक मोर्चा : परळीतील १०० पेक्षा अधिक आशा-गटप्रवर्तक रवाना

इमेज
  महाराष्ट्र आशा- गटप्रवर्तक फेडरेशनचा नागपूरला धडक मोर्चा : परळीतील १०० पेक्षा अधिक आशा-गटप्रवर्तक रवाना परळी वैजनाथ, प्रतिनिधी....     अशा व गटप्रवर्तकांच्या विविध न्याय मागणीसाठी नागपूर अधिवेशनावर राज्यस्तरीय धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून उद्या दिनांक 27 रोजी अधिवेशनावर हा मोर्चा धडकणार आहे या मोर्चासाठी परळीतील शंभर पेक्षा अधिक अशा गटप्रवर्तक आंदोलनासाठी रवाना झाले आहेत आशा व गटप्रवर्तकांचा राज्य स्तरीय धडक मोर्चा चाचा नेहरू बाल भवन गांधीसागर उद्यान, नागपूर येथून दिनांक 27 रोजी दुपारी १२ वा. निघणार आहे.1) आशा वर्कर व गटप्रवर्तक यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्या.2) किमान वेतन 26 हजार रू. महीना लागू करण्यात यावे.3) सेवा निवृत्ती नंतर 5 लाख रू. द्यावे.4) 10 हजार रू. मासिक पेन्शन द्या.5) आशा वर्कर व गटप्रवर्तक यांना सम्मानजनक वागणूक द्या.6) आशा वर्कर व गटप्रवर्तक यांचे परिवाराला आजीवन मोफत आरोग्य विमा योजना लागू करा. आदी मागण्या करण्यात येणार आहेत. मोर्चाचे नेतृत्व कॉ. आनंदी अवघडे राज्य अध्यक्षा,कॉ. पुष्पा पाटिल राज्य सरचिटणिस,अध्यक्ष कॉ. राजेंद्र साठे,महासचिव कॉ. प्रिती मे

MB NEWS:कृषी मंत्र्यांचे धनंजय मुंडे यांच्या प्रश्नाला उत्तर

इमेज
  गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेतील प्रलंबित प्रस्ताव निकाली काढणार - कृषी मंत्र्यांचे धनंजय मुंडे यांच्या प्रश्नाला उत्तर नागपूर (दि. 26 ) ------ स्व. गोपीनाथराव मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेतील 7 एप्रिल ते 22 ऑगस्ट या कालावधीला कोणतीही विमा कंपनी नसल्याने खंडित कालावधी म्हणून घोषित करण्यात येत असून या कालावधीत प्रलंबित राहिलेले सर्व प्रस्ताव निकाली काढण्यासाठी विशेष बाब म्हणून मान्यता दिली असल्याचे लेखी उत्तरात कृषिमंत्री अब्दुल सत्त्तार यांनी म्हटले आहे.  आमदार धनंजय मुंडे यांनी राज्यात जून महिन्यानंतर बोजवारा उडालेल्या शेतकरी अपघात विम्याबाबत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. या योजनेतून अपघातात मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना 2 लाख, दोन अवयव निकामी झाल्यास 2 लाख तसेच एक अवयव निकामी झाल्यास एक लाख इतकी मदत करण्यात येते. मात्र ही मदत तोकडी आहे, तसेच योजनेतील त्रुटी व प्रलंबित प्रस्तावांची संख्या खूप मोठी आहे. शिवाय ज्याच्या नावावर शेती नाही, अशा शेतकरी किंवा शेतमजुरास अर्ज करता येत नाही. यात सुधारणा करण्यात यावी, तसेच मदतीची रक्कमही किमान 5 लाख रुपये करावी, विम

MB NEWS-माळेगाव यात्रेहुन येणार्या दुचाकीला उडवले; एकाचा जागीच मृत्यु तर एक जण गंभीर जखमी

इमेज
  माळेगाव यात्रेहुन येणाऱ्या दुचाकीला उडवले; एकाचा जागीच मृत्यु तर एक जण गंभीर जखमी अंबाजोगाई - माळेगाव यात्रा करून परत निघालेल्या घाटनांदूर (ता. अंबाजोगाई) युवकांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील एक युवक ठार झाला तर दुसरा गंभीर जखमी आहे. हा अपघात उजनी पाटी (ता.अंबाजोगाई) येथे आज रविवारी सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास झाला. घाटनांदूर येथील पांडुरंग हैबत वैद्य (वय १७) आणि श्रीकांत वामन मिसाळ (वय १७) हे दोघे यात्रेनिमित्त माळेगावला गेले होते. यात्रा आटोपून ते रविवारी सायंकाळी घाटनांदूरला माघारी निघाले होते. ते उजनी पाटीजवळ आले असता अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात पांडुरंग वैद्य याचा मृत्यू झाला तर श्रीकांत मिसाळ गंभीर जखमी झाला. त्याच्यावर अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र प्रकृती चिंताजनक झाल्याने त्यास पुढील उपचारासाठी लातूरला हलवण्यात आले आहे.

MB NEWS:मान्यवरांच्या उपस्थितीत कुत्र्याची अंडी कथासंग्रहाचा प्रकाशन सोहळा

इमेज
  साहित्य हे माणसाला उन्नत करणारे असावे-  प्राचार्य डि.व्ही. मेश्राम मान्यवरांच्या उपस्थितीत कुत्र्याची अंडी कथासंग्रहाचा प्रकाशन सोहळा  परळी, प्रतिनिधी.......        साहित्य हे माणसाला उन्नत करणारे असावे, माणूस जोडणारे असावे असे माणुसकेंद्री साहित्य रानबा गायकवाड यांच्या कथासंग्रहातून व साहित्य लेखनातून दिसून येते असे प्रतिपादन वैद्यनाथ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. व्ही. मेश्राम यांनी केले. ते रानबा गायकवाड यांच्या कुत्र्याची अंडी या कथासंग्रहाच्या प्रकाशन सोहळ्यात अध्यक्ष स्थानावरून बोलत होते. यावेळी बोलताना मसापाचे अध्यक्ष चंदुलाल बियाणी यांनी हा कथासंग्रह जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करू असे सांगितले. तर अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे परळी अध्यक्ष बाजीराव (भैय्या)  धर्माधिकारी यांनी कथासंग्रहाचे स्वागत करून असे दर्जेदार साहित्य यापुढेही रानबा गायकवाड यांनी लिहीत राहावे अशी अपेक्षा व्यक्त केली.     प्रसिद्ध साहित्यिक तथा ज्येष्ठ पत्रकार रानबा गायकवाड यांच्या कुत्र्याची अंडी या कथासंग्रहाचा प्रकाशन सोहळा आज दिनांक २५ डिसेंबर रोजी शहरातील वैद्यनाथ महाविद्याल

MB NEWS:२२ वर्षीय तरुणाचा निर्घृण खून!

इमेज
  २२ वर्षीय तरुणाचा निर्घृण खून! अंबाजोगाई - तालुक्यातील चीचखंडी शिवारात एका २२ वर्षीय तरुणाचा निर्घृण खून करण्यात आल्याची घटना आज रविवारी (दि.२५) सकाळी उघडकीस आली.  अर्जुन पंढरी गडदे (वय २२, रा. चीचखंडी) असे 'मृत' 'तरुणाचे नाव आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अर्जुन शुक्रवारी रात्रीपासून बेपत्ता होता. रविवारी सकाळी चिचखंडी शिवारात रस्त्याच्या बाजूला त्याचा मृतदेह आढळून आला. अर्जुनच्या शरीरावरील घाव पाहता दगडाने चेहऱ्यावर, डोक्यात मारून आणि गळा आवळून त्याचा खून करण्यात आल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच अंबाजोगाई ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी स्वाराती रुग्णालयात पाठवून दिला. पोलीस पुढील तपास करीत आहेत. 

MB NEWS:भाजपा कार्यालय गंगाखेड येथे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना अभिवादन

इमेज
  भाजपा कार्यालय गंगाखेड येथे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना अभिवादन  भाजपा कार्यालय गंगाखेड जि.परभणी येथे भारताचे माजी पंतप्रधान - भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंती निमित्त पावन स्मृतीस विनम्र अभिवादन  करण्यात आले.        त्यानंतर देशाचे यशस्वी पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांच्या सर्वात लोकप्रिय अशा #मन_की_बात २०२२  गंगाखेड शहरातील भाजपा कार्यालय येथे सर्व नागरिक यांनी कार्यक्रम Live पाहिला. यावेळी  रामप्रभु मुंडे भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा मा.नगराध्यक्ष गंगाखेड जि.परभणी, श्री.रामभाऊ फड, श्री.रवी जोशी, श्री.बालासाहेब पारवे, श्री.लक्ष्मीकांत जब्दे, श्री.देवानंद जोशी, प्रशांत फड, जगन्नाथ आंधळे, रामदास भेंडेकर सर, सुरेश दादा बंडगर, मोहन गीते सर, राम कुलकर्णी, अमजद खान पठाण, हिरा मेहता, एकनाथ गवळी, नितीन मस्के, दिपक फड, बाळासाहेब बेद्रे, योगेश ठाकूर, डॉ.सूर्यवंशी, बलभीम दहिफळे, शिवम गिरी, राजु वाळके, सिध्देश्वर मुंडे, शिवराज गुट्टे सर व गंगाखेड शहरातील नागरिक यावेळी उपस्थित होते

MB NEWS:मुलीने स्वीकारला वडीलांचा सन्मान

इमेज
शामसुंदर महाराज सोन्नर यांना डॉ.पी.ए. इनामदार सामाजिक कृतज्ञता सन्मान  प्रदान !  विश्वास कुलकर्णी, प्रा.काकिर्डे, नीलिमा जोरवर यांचाही सन्मान   परळी (प्रतिनिधी) : महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी आणि ‘प्रबोधन माध्यम’ यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात येणारे ‘डॉ. पी. ए. इनामदार सामाजिक कृतज्ञता सन्मान २०२२’ शनिवारी सकाळी आझम कॅम्पस येथे झालेल्या शानदार कार्यक्रमात प्रदान करण्यात आले. परळी तालुक्याचे सुपूत्र, ज्येष्ठ पत्रकार आणि प्रसिद्ध कवी ह.भ.प. शामसुदर महाराज सोन्नर यांच्यासह ज्येष्ठ आर्किटेक्ट व्ही. के. ग्रुपचे संस्थापक विश्वास कुलकर्णी (आर्किटेक्चर क्षेत्रात ५० वर्षे योगदान), भारतीय विद्या भवन पुणे केंद्राचे मानद सचिव प्रा.नंदकुमार काकिर्डे ( अर्थ साक्षरता ), ’कळसुबाई मिलेट्स’ उत्पादक शेतकरी कंपनीच्या संस्थापक नीलिमा जोरवर ( भरडधान्य प्रसारातून महिला सक्षमीकरण ) यांचा सन्मान करण्यात आला. शामसुंदर महाराज सोन्नर काही कारणास्तव या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत. त्यांचा पुरस्कार त्यांची कन्या ज्ञानेश्वरी यांनी स्वीकारला. ज्येष्ठ शैक्षणिक-सामाजिक कार्यकर्ते, अझीम प्रेम

MB NEWS-Live: पीएम मोदींचा जनतेशी संवाद; 'मन की बात'चा वर्षातील शेवटचा भाग

इमेज
Live: पीएम मोदींचा जनतेशी संवाद; 'मन की बात'चा वर्षातील शेवटचा भाग           पंतप्रधान नरेंद्र मोदी (25 डिसेंबर) आज ख्रिसमसनिमित्त ‘मन की बात’ (Mann Ki Baat) कार्यक्रमाद्वारे देशवासियांना संबोधित करणार आहेत. पंतप्रधान मोदींनी गेल्या आठवड्यात देशवासियांना त्यांच्या कल्पना पाठवण्यासाठी सांगितले होते. 2022 ची शेवटची मन की बात आज असणार आहे. या संदर्भात त्यांनी ट्विट करत म्हंटलं आहे की, “या कार्यक्रमाबद्दल तुमचे विचार ऐकण्यासाठी मी उत्सुक आहे. नमो अॅप, MyGov.in वर लिहा किंवा तुमचा संदेश 1800-11-7800 या क्रमांकावर रेकॉर्ड करा.” (आता रेकॉर्ड केले जाऊ शकत नाही. 11 वाजता मन की बात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मन की बात कार्यक्रम आज 25 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 11 वाजता प्रकाशित होईल. हा कार्यक्रम ऑल इंडिया रेडिओ आणि दूरदर्शनच्या संपूर्ण नेटवर्कवर, ऑल इंडिया रेडिओ न्यूज वेबसाइट आणि न्यूजोनियर मोबाइल अॅपवर प्रसारित केला जाईल. मन की बात कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी ज्या मुद्द्यांवर बोलावे, असे तुम्हाला वाटते त्या मुद्द्यांवर सूचना मागविण्यात आल्या होत्या. आता या ट्रोल-फ्री नंबरवर संदेश र

MB NEWS:परळी शहर डीबी पथकाचे भास्कर केंद्रे यांची कामगिरी

इमेज
  चोरीच्या गंठणसह महिला आरोपी परळी शहर पोलिसांच्या ताब्यात  परळी शहर  डीबी पथकाचे भास्कर केंद्रे  यांची कामगिरी  परळी (प्रतिनिधी). परळी शहरातील सोन्याचे व्यापारी बालाजी टाक यांच्या सोन्याच्या दुकानात अज्ञात महिलांनी केली दिवसा ढवळ्या चोरी                      सविस्तर वृत्त असे की ,परळी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार परळी शहरात सोन्याचे व्यापारी बालाजी टाक यांच्या सोन्याच्या दुकानात अनोळखी तीन महिलांनी जाऊन आम्हाला गंठण घ्यायचे आहे  गंठण दाखवा असे म्हणून अनेक प्रकारचे गंठण पाहिले असता एका महिलेने एक सोन्याचे गंठण ज्याची  किंमत 1,38,840 रूपयांची चोरी करून घेऊन गेली  तर दोन महिला आमच्याकडे पैसे कमी आहेत आम्ही परत येतो असे दुकानदारला सांगून निघून गेल्या असता दाखवलेलं गंठण पैकी एक गंठण कमी असल्याचे समजतात दुकानदाराने अज्ञात महिलेविरोधात परळी शहर पोलिसात गुन्हा दाखल केला सदर गुन्ह्याचा तपास डीबी पथकाचे प्रमुख भास्कर केंद्रे यांना दिला असता त्यांनी गोपनीय पद्धतीने नियोजनबद्ध तपास करून जानवी अंगद पवार राहणार रामगव्हाण (बु) नालेवाडी तालुका अंबड जिल्हा जालना  येथून चार दिवसाच्या अथक परिश्रमानं

MB NEWS: यज्ञसेवा परिवार परळी वैद्यनाथ चे आयोजन

इमेज
  परळीत आज बहुसोमयाजी यज्ञमार्तंड यज्ञेश्वर सेलूकर महाराजांच्या उपस्थितीत सामूहिक श्रीसूक्त हवन यज्ञसेवा परिवार परळी वैद्यनाथ चे आयोजन परळी वैद्यनाथ (प्रतिनिधी)दि.२५ - यज्ञसेवा परिवार परळी वै.च्या वतीने सामुहिक श्रीसूक्त हवनाचे आयोजन करण्यात आले आहे. बहुसोमयाजी यज्ञमार्तंड यज्ञेश्वर सेलूकर महाराजांच्या उपस्थितीत श्रीसूक्त हवन होणार  आहे. रविवार दि.२५ रोजी दुपारी ४ वा. देशपांडे गल्लीत असलेल्या मनोहरपंत बडवे सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.हवनासाठी बसणाऱ्या भक्तांनी सोबत कोणतीही हवन सामग्री आणू नये याची व्यवस्था आयोजकांकडून करण्यात आलेली आहे.या सामूहिक श्रीसूक्त हवनासाठी शिष्य वर्ग व भाविकांनी उपस्थित रहावे असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

MB NEWS:26 डिसेंबरला दिव्यांग, विधवा,परित्यक्ता, ज्येष्ठ नागरिक यांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन- डॉ. संतोष मुंडे

इमेज
  26 डिसेंबरला दिव्यांग, विधवा,परित्यक्ता, ज्येष्ठ नागरिक यांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन- डॉ. संतोष मुंडे परळी वैजनाथ, प्रतिनिधी      दिव्यांग, विधवा, परित्यक्ता  ज्येष्ठ नागरिक यांना लाभ मिळवून देणाऱ्या योजनांची अंमलबजावणी होत नसल्याने या घटकांचे प्रश्न प्रलंबित आहेत. त्यांच्या विविध मागण्यांसाठी परळी तहसील कार्यालयावर 26 डिसेंबर रोजी तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा दिव्यांगाचे कैवारी तथा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे  प्रदेश उपाध्यक्ष डॉ. संतोष मुंडे यांनी दिला आहे.        डॉ. संतोष मुंडे हे नेहमीच दिव्यांगासाठी सक्रियपणे काम करतात. दिव्यांगासाठी सातत्याने लढा देऊन विविध योजनांचा लाभ त्यांनी दिव्यांगांना मिळवून दिला आहे. सामाजिक भावनेतून प्रामाणिकपणे विविध लोक उपयोगी व उपेक्षित घटकांना न्याय मिळेल अशा प्रकारचे उपक्रम, आंदोलन ते नेहमीच करतात. फाटलेले, खराब झालेले, जुने, रेशन कार्ड नूतनीकरण असो की दिव्यांगांसाठी विविध शिबिरांचे आयोजन करणे असो या सर्व स्तरावर ते सातत्याने पुढाकार घेऊन कार्यरत आहेत.        आंदोलनातील मागण्या वरील सर्वांना अंत्यादोयामध्ये (2 रू. प्रति किलो गह