MB NEWS:26 डिसेंबरला दिव्यांग, विधवा,परित्यक्ता, ज्येष्ठ नागरिक यांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन- डॉ. संतोष मुंडे

 26 डिसेंबरला दिव्यांग, विधवा,परित्यक्ता, ज्येष्ठ नागरिक यांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन- डॉ. संतोष मुंडे




परळी वैजनाथ, प्रतिनिधी

     दिव्यांग, विधवा, परित्यक्ता  ज्येष्ठ नागरिक यांना लाभ मिळवून देणाऱ्या योजनांची अंमलबजावणी होत नसल्याने या घटकांचे प्रश्न प्रलंबित आहेत. त्यांच्या विविध मागण्यांसाठी परळी तहसील कार्यालयावर 26 डिसेंबर रोजी तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा दिव्यांगाचे कैवारी तथा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे  प्रदेश उपाध्यक्ष डॉ. संतोष मुंडे यांनी दिला आहे.

       डॉ. संतोष मुंडे हे नेहमीच दिव्यांगासाठी सक्रियपणे काम करतात. दिव्यांगासाठी सातत्याने लढा देऊन विविध योजनांचा लाभ त्यांनी दिव्यांगांना मिळवून दिला आहे. सामाजिक भावनेतून प्रामाणिकपणे विविध लोक उपयोगी व उपेक्षित घटकांना न्याय मिळेल अशा प्रकारचे उपक्रम, आंदोलन ते नेहमीच करतात. फाटलेले, खराब झालेले, जुने, रेशन कार्ड नूतनीकरण असो की दिव्यांगांसाठी विविध शिबिरांचे आयोजन करणे असो या सर्व स्तरावर ते सातत्याने पुढाकार घेऊन कार्यरत आहेत.

       आंदोलनातील मागण्या वरील सर्वांना अंत्यादोयामध्ये (2 रू. प्रति किलो गहू व 3 रुपये प्रति किलो तांदूळ) समावेश करून घ्यावा. तहसीलद्वारे देण्यात येणाऱ्या पगारी नियमित करणे व कमी जास्त न करणे., सरसकट घरकुल देण्यात यावे, नगर परिषद, ग्रामपंचायत,  पंचायत समिती, जिल्हा परिषद यांचा 5% निधी नियमित वाटप करावा, दिव्यांगांना यु पी आय डी कार्ड घरपोच देण्यात यावे, रेशन कार्ड ऑनलाइन करून देणे व फाटलेल्या रेशन कार्ड बदलून देणे. या मागण्यांसाठी आंदोलन करण्यात येणार आहे. सूचना दिव्यांग विधवा परित्यक्त्या, ज्येष्ठ नागरिक यांनी सोबत आपापली कागदपत्रे आणावीत  असे आवाहन करण्यात आले आहे.

        सोमवार दिनांक 26 डिसेंबर रोजी दिव्यांग, विधवा, परित्यक्ता, जेष्ठ नागरिक या सर्वांच्या विविध मागण्यांसाठी आमदार धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली परळीत आंदोलन करण्यात येणार असल्याचे डॉ. संतोष मुंडे यांनी सांगितले आहे. या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन डॉ. संतोष मुंडे यांनी केले आहे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

Video: अमानुष मारहाण....धक्कादायक प्रकार!

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार