इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

MB NEWS:सीमाप्रश्नी कर्नाटक सरकारविरोधातील ठराव एकमताने मंजूर

 सीमाप्रश्नी कर्नाटक सरकारविरोधातील ठराव एकमताने मंजूर



       





: सीमाप्रश्नी कर्नाटक सरकारविरोधातील ठराव विधीमंडळात आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मांडला. हा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. सीमेवरील ८६५ गावे महाराष्ट्रात आणण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल. बेळगाव, निपाणी, बिदरसह कारवार महाराष्ट्रात आणणार, असा निर्धार मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला. ठराव मांडण्यात आल्यानंतर विधानसभेत घोषणाबाजी करण्यात आली.

सीमेवरील ८६५ गावे महाराष्ट्रात आणण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल. बेळगाव, निपाणी, बिदर, कारवार, भालकीसह ८६५ गावे महाराष्ट्रात आणण्याचा प्रयत्न करण्यात येईल. सीमा भागात काम करणाऱ्या मराठी संस्था, संघटनांना अर्थ सहाय्य केले जाईल. विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक जागा राखीव ठेवण्यात येईल. सीमाप्रश्नी बलिदान देणाऱ्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्याची घोषणा यावेळी मुख्यमंत्र्यांनी केली. ८६५ गावातील नागरिकांना महाराष्ट्राचे नागरिक समजण्यात येईल. त्यांच्या सांस्कृतिक, शैक्षणिक विकासासाठी आर्थिक मदत केली जाईल. तसेच अनेक योजनांसाठी निधी दिली जाईल, अशी घोषणाही मुख्यमंत्री शिंदे  यांनी केली.

दरम्यान,  सीमा प्रश्नी विधीमंडळात मांडण्यात आलेल्या ठरावात अनेक चुकीची मराठी शब्दरचना करण्यात आली आहे. व्याकरणाच्या अनेक चुका आहेत. मराठीची दुर्दशा करणारा ठराव मांडून सरकार सीमा भागातील बांधवांची थट्टा करत आहे का ? असा सवाल करत राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दुरुस्ती करुन ठराव मंजूर करावा, अशी मागणी पवार यांनी आज (दि.२७) विधीमंडळात केली.

सीमा प्रश्नी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधिमंडळात ठराव मांडला. अजित पवार यांनी या ठरावावर घेतलेल्य़ा आक्षेपांना उत्तर देताना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्याकरणापेक्षा भावना महत्त्वाच्या आहेत. परंतु ठरावात सुधारणा करण्यात येईल, अशी ग्वाही दिली. दरम्यान, कर्नाटक सरकारने त्यांच्या विधिमंडळात याआधी महाराष्ट्र विरोधी ठराव मंजूर केला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या