MB NEWS-"त्या" शिक्षकाच्या आत्महत्येप्रकरणी एकावर गुन्हा दाखल

 सहकारी शिक्षकाने शिवीगाळ करून मारहाण केली: आपमान सहन न झाल्याने केली शाळेतच आत्महत्या



 "त्या" शिक्षकाच्या आत्महत्येप्रकरणी एकावर गुन्हा दाखल

 सोनपेठ, प्रतिनिधी....

           गंगाखेड ते परभणी राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या रुमणा पाटीवर शिवीगाळ करून मारहाण केल्याने अपमानित झालेले शिक्षक विठ्ठलराव अनंतराव रत्नपारखी यांनी धारासुर तांडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सकाळी दहा वाजता गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत सोनपेठ पोलीस ठाण्यात दिनांक 26 डिसेंबर रोजी   दिलेल्या तक्रारीवरून आरोपी धारासुर तांडा येथील जिल्हा परिषद शिक्षक राठोड यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



           हृदय पिळवटून टाकणाऱ्या या घटनेने शैक्षणिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. धारासुर जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक मयत रत्नपारखी यांना सोमवारी सकाळी आरोपी शिक्षक राठोड यांनी फोन करून धारासुर शाळेवर येण्यास सांगितले. तेव्हा मयत शिक्षक रत्नपारखी यांनी मी पंचायत समितीत नोकरीवर आहे शाळेत येऊ शकत नाही असे आरोपीस सांगितले. आरोपी शिक्षकाने फोनवर अरेरावीची भाषा वापरल्याने मयत शिक्षक गंगाखेडहून धारासुरला निघाले. रस्त्यात रुमणा पाटी येथे शिक्षक राठोड यांनी मयत रत्नपारखी यांना शिवीगाळ करून लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. 



या मारहाणीचा अपमान सहन न झाल्याने मयत रत्नपारखी यांनी धारासुर तांडा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील ऑफिसमध्ये स्वतः लोखंडी हुकाला नायलॉनच्या पट्ट्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी पियुष रत्नपारखी यांनी सोनपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून शिवीगाळ करून मारहाण करून अपमानित केले व आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले म्हणून धारासुर तांडा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक राठोड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास सोनपेठ पोलीस करीत आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !