गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने घुले कुटुंबास पाच लाखाची मदत जाहीर

इमेज
  ना. पंकजा मुंडे यांनी मयत विलास घुलेंच्या परिवाराचे स्वीकारले पालकत्व ; दुःखात आणि न्यायाच्या लढाईतही पाठिशी बीड दि. २३ -- टाकळी- कदमवाडी (ता. केज) परिसरात झालेल्या घटनेत दुर्दैवी मृत्यू झालेल्या विलास घुले यांच्या परिवाराचे पालकत्व स्वीकारत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना.पंकजा मुंडे यांनी त्यांना मदतीचा हात दिला आहे. मयत घुले यांच्या पत्नीस गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने पाच लाख रूपयांची मदत आज त्यांनी जाहीर केली आहे.    विलास घुले याच्या हत्येच्या प्रकरणात झालेल्या दुर्दैवी घटनेचा तीव्र निषेध करत ना. पंकजा मुंडे यांनी पोलिस प्रशासनाला दोषींवर कडक कारवाई करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत, पण कोवळ्या वयात काहीही संबंध नसताना त्याचा हकनाक मृत्यू झाल्यामुळे त्याचे कुटुंब उघड्यावर पडले असून त्यांचेवर अकाली संकट आले आहे. विलास यांचे बंधू रमेश यांच्याशी ना. पंकजाताईंनी संपर्क साधून आपण विलासच्या मृत्यूबद्दल दुःख व्यक्त केले. तुमच्या दुःखात आणि न्यायाच्या लढाईत मी  परिवाराच्या पाठिशी  ठामपणे उभी असल्याचे सांगितले. गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या माध्यमातू...

MB NEWS:लव्ह जिहाद व धर्मांतरण विरोध कायदा करण्यात यावा- प्रमुख मागणी

 29 डिसेंबर रोजी परळी वैजनाथ येथे हिंदू धर्मरक्षण मूक मोर्चा



  लव्ह जिहाद व धर्मांतरण विरोध कायदा करण्यात यावा- प्रमुख मागणी


परळी वैजनाथ :- राज्यात व देशात लव जिहादच्या घटना सातत्याने घडत आहेत.  यासाठी कठोर कायदा असावा तसेच धर्मांतरणाला ही बंदी घातली पाहिजे.लव्ह जिहाद व धर्मांतरण विरोध कायदा करण्यात यावा या प्रमुख मागणीसाठी 29 डिसेंबर रोजी परळी वैजनाथ येथे हिंदू धर्मरक्षण मूक मोर्चा काढण्यात येणार आहे.


        जबरदस्तीने असो किंवा मर्जीने कोणत्याही प्रकारचे धर्मांतरणास परवानगी नसावी. प्रत्येकाने आपापल्या धर्माचे पालन करावे व इतर धर्मामध्ये ढवळाढवळ करु नये. तसेच लव जिहाद च्या नावाखाली अनेक तरुणींना फसवून, नादाला लावून पुन्हा हत्या केल्या गेल्या आहेत. त्यांच्या गुन्हेगाराना तातडीने फाशी देण्यात येण्यासाठी कठोर कायदा करावा या मागणी साठी समस्त हिंदू समाजाचा  मुकमोर्चा गुरूवार दि 29 डिसेंबर रोजी राणी लक्ष्मीबाई टॉवर पासून निघून तहसील कार्यालय परळी पर्यंत निघणार आहे.


      या मोर्चास समस्त हिंदू बंधु भगिनींनी उपस्थित रहावे असे आवाहन समस्त हिंदू समाजाकडून करण्यात आले आहे.


● असा असेल मोर्चाचा मार्ग....

   या मोर्चाची सुरूवात राणी लक्ष्मीबाई टॉवर ते बाजार समिती ते एकमिनार चौक ते बस स्टँड ते छत्रपती शिवाजी महाराज चौक ते भगवान बाबा चौक ते तहसील पर्यंत जाईल. प्रशासनाला निवेदन देऊन मोर्चाचा समारोप होणार आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या