गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने घुले कुटुंबास पाच लाखाची मदत जाहीर

इमेज
  ना. पंकजा मुंडे यांनी मयत विलास घुलेंच्या परिवाराचे स्वीकारले पालकत्व ; दुःखात आणि न्यायाच्या लढाईतही पाठिशी बीड दि. २३ -- टाकळी- कदमवाडी (ता. केज) परिसरात झालेल्या घटनेत दुर्दैवी मृत्यू झालेल्या विलास घुले यांच्या परिवाराचे पालकत्व स्वीकारत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना.पंकजा मुंडे यांनी त्यांना मदतीचा हात दिला आहे. मयत घुले यांच्या पत्नीस गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने पाच लाख रूपयांची मदत आज त्यांनी जाहीर केली आहे.    विलास घुले याच्या हत्येच्या प्रकरणात झालेल्या दुर्दैवी घटनेचा तीव्र निषेध करत ना. पंकजा मुंडे यांनी पोलिस प्रशासनाला दोषींवर कडक कारवाई करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत, पण कोवळ्या वयात काहीही संबंध नसताना त्याचा हकनाक मृत्यू झाल्यामुळे त्याचे कुटुंब उघड्यावर पडले असून त्यांचेवर अकाली संकट आले आहे. विलास यांचे बंधू रमेश यांच्याशी ना. पंकजाताईंनी संपर्क साधून आपण विलासच्या मृत्यूबद्दल दुःख व्यक्त केले. तुमच्या दुःखात आणि न्यायाच्या लढाईत मी  परिवाराच्या पाठिशी  ठामपणे उभी असल्याचे सांगितले. गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या माध्यमातू...

MB NEWS:प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांसादर्भात धनंजय मुंडे यांनी घेतली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट

 औष्णिक विद्युत केंद्रातील प्रकल्पग्रस्तांच्या नोकरीचा प्रश्न तातडीने सोडवा - धनंजय मुंडे यांची देवेंद्र फडणवीसांकडे मागणी




एकही प्रकल्पग्रस्त उमेदवारावर अन्याय होऊ देणार नाही - फडणवीसांचे आश्वासन


नागपूर (दि. 28) - परळी वैद्यनाथ सह  राज्यातील विविध औष्णिक विद्युत केंद्रातील प्रकल्पग्रस्त उमेदवारांना शासकीय नियमाप्रमाणे नोकरी देणे व अन्य मागण्या तातडीने मान्य करण्यात याव्यात अशी मागणी माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांनी आज उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.


धनंजय मुंडे यांनी सध्या नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या दरम्यान उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन प्रकल्पग्रस्तांच्या विविध मागण्यांचे निवेदन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले. यावेळी ऊर्जा प्रकल्पांसाठी जमिनी संपादित केलेल्या एकही प्रकल्पग्रस्त उमेदवारावर अन्याय होऊ देणार नाही, असे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांना दिले आहे.


परळी वैद्यनाथ येथील औष्णिक विद्युत केंद्र येथील काही प्रकल्पग्रस्त अद्याप न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. सरकारने वेळोवेळी नियमात बदल केल्याने अनेकजण अद्याप नोकरी मिळण्यापासून वंचित राहिले आहेत. अनेक प्रकल्पग्रस्त 45 वर्ष वयाची मर्यादा ओलांडल्याने आता आपल्याला नोकरी मिळणार की नाही, मिळणाऱ्या निर्वाह भत्त्यात वाढ होणार की नाही, या चिंतेत आहेत. त्या सर्वांना न्याय देण्याची भूमिका सरकारने घ्यावी, अशी मागणी आ. मुंडे यांनी केली. 


काही प्रकल्पग्रस्त उमेदवारांची जमीन औष्णिक विद्युत प्रकल्पाने संपादित केली, मात्र प्रकल्पाच्या विस्तारामध्ये काही वर्षांनी 'आम्हाला आता या जमिनीची आवश्यकता नसल्याने तुम्ही प्रकल्पग्रस्त कोट्यातून पात्र नसल्याचे' उमेदवारांना कळवण्यात आले, मात्र जमिनी संपादित झाल्या तेव्हाच हे उमेदवार प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र घेऊन पात्र ठरले, तेव्हा त्यांनाही न्याय देणे हे शासनाचे कर्तव्य आहे, असेही चर्चे दरम्यान धनंजय मुंडे म्हणाले. या प्रकारातील उमेदवारांना देखील न्याय देण्याची तसेच प्रकल्पग्रस्तांच्या विविध मागण्या मार्गी लावण्याची सरकारची भूमिका असल्याचे श्री. फडणवीस यांनी स्पष्ट केले. 


परळी वैद्यनाथ तालुक्यातील दाऊतपुर येथील गट न. 232, 238, 239 व 240 मधील सामायिक जमीन संपादित केलेल्या प्रकल्पग्रस्त उमेदवारांना प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी सेवेत सामावून घेणे, कनिष्ठ प्रयोगशाळा रसायनशास्त्र या पदावर पात्र असलेल्या प्रकल्पग्रस्त उमेदवारांना सामावून घेणे, प्रकल्पग्रस्त व संबंधित नातेवाईकांची न्याय्य प्रकरणे यांसह विविध मागण्यांवर यावेळी सकारात्मक चर्चा झाली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या