MB NEWS:चिचखंडी खून प्रकरणात दोघेजण संशयीत ताब्यात
चिचखंडी खून प्रकरणात दोघेजण संशयीत ताब्यात
अंबाजोगाई - तालुक्यातील चिचखंडी शिवारात एका 22 वर्षीय तरुणाचा निर्घृण खून करून त्याचा मृतदेह आढळून आल्यानंतर परिसरात मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणात खूनाचे कारण स्पष्ट झाले नव्हते. आज ग्रामिण पोलिसांनी या भागातील दोघा संशयीतांना ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे.
अंबाजोगाई तालुक्यातील चिचखंडी येथील अर्जून पंढरी गडदे (वय 22) हा तरूण दोन दिवसापासून बेपत्ता झाला होता. रविवारी सकाळी त्याचा मृतदेह रस्त्यालगत आढळून आल्यानंतर नातेवाईकांसह ग्रामिण पोलिसांनी घटनास्थळावर भेट देवून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी स्वाराती रूग्णालयात आणण्यात आला. याची तपासणी झाल्यानंतर या तरूणाचा गळा दाबून दगडाने ठेचून खून करण्यात आल्याचे उत्तरीय तपासणीत आढळून आले. संबंधीत तरूणाचा खून कुठल्या कारणास्तवर करण्यात आला. याचे उत्तर अनुत्तरीत असल्यामुळे ग्रामिण पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक श्रीनिवास सावंत यांनी सोमवारी गावात जावून तपासाची चक्रे फिरवली. या खून प्रकरणात दोघा जणांना सशयीत म्हणून ताब्यात घेतले असून त्यांच्या जवाबानंतरच खूनाचे कारण स्पष्ट होणार आहे. सध्यातरी या खूनाचे गुढ गुलदस्त्यातच आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा