पोस्ट्स

MB NEWS:दुःखद वार्ता :शंकरआप्पा चौधरी यांचे निधन; आज सायंकाळी 6 वाजता होणार अंत्यविधी

इमेज
दुःखद वार्ता :शंकरआप्पा चौधरी यांचे निधन; आज सायंकाळी 6 वाजता होणार अंत्यविधी परळी वैजनाथ /प्रतिनिधी         वीरशैव लिंगायत समाजातील ज्येष्ठ व्यक्तिमत्व शंकरआप्पा चौधरी यांचे आज मंगळवार दिनांक 18 एप्रिल रोजी दुपारी 1 वाजेच्या दरम्यान अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. मृत्यू समयी ते 87 वर्षे वयाचे होते. परळी येथील कंत्राटदार अनिल उर्फ बाळू चौधरी, छत्रपती संभाजीनगर येथील दैनिक महाराष्ट्र टाइम्स आवृत्तीचे उपसंपादक आशिष चौधरी, परळी न्यायालयाचे लिपिक अविनाश चौधरी यांचे ते वडील होत. परळी वैजनाथ येथील स्वामी विवेकानंद नगर भागातील रहिवासी तथा वीरशैव लिंगायत समाजातील ज्येष्ठ व्यक्तिमत्व शंकर आप्पा चौधरी यांचे आज मंगळवारी दुःखद निधन झाले. मृत्यूसमयी ते 87 वर्ष वयाचे होते. शंकराप्पा चौधरी हे अत्यंत मनमिळावू व सुस्वाभावी असल्याने ते सर्व परिचित होते. वीरशैव लिंगायत समाजाच्या विविध धार्मिक सामाजिक कार्यक्रमात ते नेहमी सहभागी होत असत. शंकराप्पा चौधरी यांच्या पश्चात पत्नी तसेच परळीतील कंत्राटदार अनिल उर्फ बाळूअण्णा चौधरी, छत्रपती संभाजी नगर महाराष्ट्र टाइम्स आवृत्तीचे  उपसंपादक आशिष चौधरी , परळी न्याया

MB NEWS:मोठा अनर्थ टळला: बुट्टेनाथ घाटात बस पलटी;25 प्रवाशी जखमी

इमेज
  मोठा अनर्थ टळला: बुट्टेनाथ घाटात बस पलटी;25 प्रवाशी जखमी अंबाजोगाई येथून जवळच असलेल्या - बुट्टेनाथ घाटात राज्य परिवहन मंडळाची बस पलटी झाली. हा अपघात आज मंगळवारी (दि. १८) दुपारी पावणेदोन वाजताच्या सुमारास झाला. Click: *राज्यात खळबळजनक घडामोडी: 'अशक्यही शक्य करतील स्वामी' पंकजा मुंडेंच्या ट्विटची चर्चा* सदरील बस अंबाजोगाईकडून येलडा कडे निघाली होती. मुकुंदराजच्या बुट्टेनाथ घाटात एका अवघड वळणावर चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस पलटी झाली. या अपघातात २५ प्रवाशी जखमी झाले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. अपघाताची माहिती मिळताच ज्येष्ठ समाजसेवक नंदकिशोर मुंदडा यांनी तातडीने रुग्णवाहिका आणि पोलिसांना घटनास्थळी पाठवून दिले. तर, स्वाराती रुग्णालयातील यंत्रणाही सुसज्ज ठेवली. सर्व ना स्वाराती रुग्णालयात दाखल करण्यात  आले असून सर्वांची प्रकृती स्थिर आहे.  Click: ● *खळबळजनक: अतिकचे लावले पोस्टर:शहीदाचा दिला दर्जा;धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न* Video   Advertise  

MB NEWS:महाराष्ट्रात राजकीय भूकंपाचा दुसरा अंक: अजित पवारांकडे राष्ट्रवादीच्या ५३ पैकी ४० आमदारांच्या सह्यांचं पत्र तयार?

इमेज
  महाराष्ट्रात राजकीय भूकंपाचा दुसरा अंक: अजित पवारांकडे राष्ट्रवादीच्या ५३ पैकी ४० आमदारांच्या सह्यांचं पत्र तयार? महाराष्ट्रात राजकीय भूकंपाचा दुसरा अंक पाहण्यास मिळणार का? याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. कारण अजित पवार हे भाजपात जाऊ शकतात किंवा भाजपाला पाठिंबा देऊ शकतात अशा चर्चांना उधाण आलं आहे. आमदार अण्णा बनसोडेंसह तीन आमदारांनी अजित पवार यांना पाठिंबा दिला आहे. राज्यात ही चर्चा रंगली आहे ती न्यू इंडियन एक्स्प्रेसच्या बातमीने. कारण अजित पवारांकडे ४० आमदारांच्या सह्यांचं पत्र तयार असल्याची बातमी न्यू इंडियन एक्स्प्रेसने दिली आहे. असं घडलं तर राज्यात पुन्हा एकदा राजकीय नाट्य पाहण्यास मिळेल यात शंकाच नाही. काय म्हटलं आहे या वृत्तात? अजित पवार यांच्याकडे राष्ट्रवादीच्या ५३ पैकी ४० आमदारांच्या पाठिंब्याचं पत्र आहे. या ४० आमदारांच्या सह्यांचं पत्र अजित पवार यांच्याकडे आहे. जर वेळ आली तर राज्यपालांना हे पत्र अजित पवार देतील. त्यामुळे सरकारला धोका निर्माण होणार नाही. सर्वोच्च न्यायालयाने जर एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासह १६ आमदारांना अपात्र ठरवलं तर हे पाऊल अजित पवार उचलतील. सर्वोच्च न्याय

MB NEWS:१४ वर्षीय मुलाचा गळफास घेऊन मृत्यू; नातेवाईकांची घातपाताची तक्रार

इमेज
  १४ वर्षीय मुलाचा गळफास घेऊन मृत्यू; नातेवाईकांची घातपाताची तक्रार  माजलगाव दि.१८-तालुक्यातील नित्रूड येथील एका १४ वर्षीय मुलाने शेतात गळफास घेऊन आत्महत्या झाल्याची घटना घडली,गुलाम महमंद हाफीज मुरतुजा असे मुलाचे नाव असून याप्रकरणी त्याचे नातेवाईकांनी दिंदृड पोलीस ठाण्यात घातपात झाल्याची तक्रार दाखल केली आहे. Click: *राज्यात खळबळजनक घडामोडी: 'अशक्यही शक्य करतील स्वामी' पंकजा मुंडेंच्या ट्विटची चर्चा*      एका बिअर बारच्या पाठीमागे ही घटना उघडकीस आली, मुलाच्या नातेवाईकांनी याप्रकरणी घातपात संशय व्यक्त करून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी केली आहे. Click: ● *खळबळजनक: अतिकचे लावले पोस्टर:शहीदाचा दिला दर्जा;धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न* Video   Advertise  

MB NEWS: मोठी बातमी! अजित पवार यांनी सोशल मीडियावरील राष्ट्रवादीचा उल्लेख असलेले वॉलपेपर हटविले

इमेज
  मोठी बातमी! अजित पवार यांनी सोशल मीडियावरील राष्ट्रवादीचा उल्लेख असलेले वॉलपेपर हटविले मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार हे 40 आमदारांसमवेत भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. त्याच पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी आज सकाळपासून त्यांच्या सोशल मीडिया हँडल वरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांच्यासोबत असलेले वॉलपेपर डिलीट केले आहे. अजित पवार यांच्या ट्विटर आणि फेसबुकवर वॉलपेपर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नाव, चिन्ह आणि पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह अजित पवार यांचा फोटो होता. ते फोटो कायमस्वरूपी त्यांनी डिलिट केले आहे. त्यामध्ये वॉलपेपर अपलोड केल्यानंतर होणाऱ्या पोस्टसुद्धा डिलिट केल्या आहेत. त्यामुळे अजित पवार यांनी हा इशारा दिला आहे का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. Click: *राज्यात खळबळजनक घडामोडी: 'अशक्यही शक्य करतील स्वामी' पंकजा मुंडेंच्या ट्विटची चर्चा*       राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे गेल्या काही दिवसांपासून अस्वस्थ असल्याच्या चर्चा सुरू होत्या. भाजप सह शिवसेनेतील अनेक नेत

MB NEWS: खळबळजनक: अतिकचे लावले पोस्टर:शहीदाचा दिला दर्जा;धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न

इमेज
खळबळजनक: अतिकचे लावले पोस्टर:शहीदाचा दिला दर्जा;धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न माजलगाव दि.१८-उत्तर प्रदेश मध्ये दोन दिवसांपूर्वी हत्या झालेल्या गुंड खासदार अतिक अहमद व त्याचा भाऊ अशरफ यांच्या समर्थनार्थ माजलगाव शहरात भर चौकात बॅनर झळकवण्यात आले असून त्यात दोघांचा शहीद असा उल्लेख करून हिंदु धर्मियांत तेढ निर्माण करन्याचा प्रयत्न केला आहे, त्यामुळे जनतेत संतापाची लाट उसळली असून दोषीवर कारवाईची मागणी होत आहे.          उत्तर प्रदेशात शंभराहून अधिक गुन्हे दाखल असलेल्या खासदार अतिक अहमद व त्याच्या भावाची दोन दिवसांपूर्वी हत्या करण्यात आली. या घटनेला जातीय रंग देण्याचे मनसुबे काही विघातक शक्तींनी रचले असल्याचे दिसून येत आहे.मंगळवारी सकाळी येथील आंबेडकर चौकात अतिक व त्याच्या भावाचे पोस्टर लावण्यात आले, त्यात पोलीस कष्टडीत झालेल्या हत्याचा निषेध करून दोघांचा शहीद असा उल्लेख केला, त्याना स्वर्गात जागा मिळावी असे लिहून एका जिल्हा दैनिकाच्या बातमीचा हिंदू विषयी लिखाणाचे कात्रण डकवण्यात आले आहे.बॅनरवर मोहसीन भय्या पटेल मित्र परिवार असा उल्लेख असून बॅनर कोणत्या ठिकाणी छापले त्या दुकानाचा उल्ले

MB NEWS:राज्यात खळबळजनक घडामोडी: 'अशक्यही शक्य करतील स्वामी' पंकजा मुंडेंच्या ट्विटची चर्चा

इमेज
  राज्यात खळबळजनक घडामोडी: 'अशक्यही शक्य करतील स्वामी' पंकजा मुंडेंच्या ट्विटची चर्चा परळी वैजनाथ, प्रतिनिधी......      राज्यातील खळबळजनक राजकीय घडामोडी सुरु आहेत. राज्यातील राजकारणात मोठ्या घटना व त्यावरील क्रिया प्रतिक्रियांनी वातावरण ढवळून टाकले आहे.या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भाजप राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांचे एक ट्विट चर्चेत आले आहे.या ट्विट मध्ये 'अशक्यही शक्य करतील स्वामी' असे कॅप्शन देत ट्विट करण्यात आले आहे. शरद पवार काय म्हणाले?        या सर्व घटनाक्रमावर शरद पवार यांनी सुचक विधाने केली आहेत.जे तुमच्या मनात आहे ते आमच्या मनात नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व सहकारी एकाच विचाराचे आहेत.पक्षाची कोणतीही बैठक कोणीही बोलावली नाही, मी स्वतः थोड्याच वेळात दिल्लीला जाणार आहे. कोण काय म्हणत यापेक्षा राष्ट्रवादी बाबत मी काय म्हणतो ते महत्त्वाचे आहे असे शरद पवार यांनी म्हटले आहे. दरम्यान धनंजय मुंडे अजित पवारांच्या कार्यालयात दाखल झाले आहेत. परंतु धनंजय मुंडेंनी माध्यमांशी बोलणे टाळले. माध्यम प्रतिनिधींना धन्यवाद, थँक यू म्हणत मुंडे मार्गस्थ झाले. अजित पव

MB NEWS:राजेश देशमुख यांच्या रोजा इफ्तार पार्टीस मोठा प्रतिसाद

इमेज
  राजेश देशमुख यांच्या रोजा इफ्तार पार्टीस मोठा प्रतिसाद परळी वैजनाथ, ता.17 (प्रतिनिधी) ः- रमजाननिमित्त येथील वैद्यनाथ देवस्थान संस्थेचे सचिव राजेश देशमुख यांच्या वतीने सोमवारी सायंकाळी आयोजित करण्यात आलेल्या रोजा इफ्तार पार्टीस मोठा प्रतिसाद मिळाला. शेकडो समाज बांधवांनी यावेळी हजेरी लावली होती. श्री देशमुख यांच्या निवासस्थानी झालेल्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या मुस्लिम बांधवांचे राजेश देशमुख व त्यांच्या सहकार्‍यांनी टोपी देवून स्वागत केले. या रोजा इफ्तार पार्टीस चांगला प्रतिसाद मिळाला. यावेळी अब्दुल करीम साहाब ,समशोदीन खतिब , जाबेर खॉन  पठाण,वहोजोदीन मुल्ला ,अन्वर सर, आलिशान सर, सिराजोद्दीन मुल्ला, पाशा गुरूजी, प्रा. खदीर सर, मसु सेठ, फरकुंदअली बेग, प्राचार्य बशीर, हसनखान, समंदरखा पठाण,  एतेशाम सिद्दिकी, शेख अकिल सर , सय्यद माजेद, शेख मुस्तफा, शेख मुकीद, इनामदार , यांच्यासह  दत्ताप्पा ईटके गुरूजी, पी.एस.घाडगे, जुगलकिशोर लोहीया, बाजीराव भैय्या धर्माअधिकारी ,सुरेश टाक, अभयकुमार ठकर, निळकंठ चाटे ,नंदु तोतला, अभय वाकेकर,डॉ.सुर्यकांत मुंडे, डॉ. गुरूप्रसाद देशपांडे ,प्रकाश जोशी, प्रदीप

MB NEWS:१५० वर्षाची परंपरा असलेला श्री.पापदंडेश्वराचा पालखी सोहळा आज सायंकाळी, उद्या महाआरती

इमेज
  १५० वर्षाची परंपरा असलेला श्री.पापदंडेश्वराचा पालखी सोहळा आज सायंकाळी, उद्या महाआरती परळी वैजनाथ दि.११ (प्रतिनिधी)           तालुक्यातील गाढे पिंपळगाव येथे १५० वर्षांची परंपरा असलेला ग्रामदैवत श्री.पापदंडेश्वर पालखी सोहळ्यानिमित्त सोमवारी (ता.१७) सायंकाळी १२ वाजता सुरुवात होणार असून मंगळवारी (ता.१८) दुपारी १ वाजता महाआरतीने संपन्न होणार आहे. या सोहळ्यास पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन गावकऱ्यांच्या वतीने करण्यात आले आहे.           दिडशे वर्षांची परंपरा असलेला श्री.पापदंडेश्वर पालखी सोहळ्या निमित्त मंगळवारी पासून अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व शिव कथेचा प्रारंभ  झाला. या हरिनाम सप्ताहात किर्तन, भजन, काकडा,गाथा भजन आदि संपन्न झाले. तर मुख्य पालखी सोहळा सोमवारी रात्री १२ वाजता श्री.पापदंडेश्वर मंदिरातून निघणार असून रात्री पालखी मार्गावर भारुडे, सकाळी गवळणी व मंगळवारी दुपारी महाआरती नंतर महाप्रसाद आयोजित करण्यात आला आहे. या पालखी सोहळ्यास व अखंड हरिनाम सप्ताहास पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन गावकऱ्यां

MB NEWS:खाजगीकरण, कंत्राटीकरणा विरोधात डीवायएफआय आक्रमक

इमेज
  बेरोजगाराच्या दारात मरण,14 मार्च 2023 च्या परिपत्रकाची डीवायएफआयकडून होळी खाजगीकरण, कंत्राटीकरणा विरोधात डीवायएफआय आक्रमक परळी / प्रतिनिधी डेमोक्रेटीक युथ फेडरेशन ऑफ इंडिया (DYFI) या युवक संघटनेच्या वतीने सोमवार दि 17 रोजी सकाळी 11 वा परळी उपजिल्हाधिकारी कार्यालयावर बेरोजगाराच्या दारात मरण घेऊन आलेल्या 14 मार्च 2023 चे परिपत्रक रद्द करा, म्हणून सदरील परिपत्रकाची डीवायएफआय कडून होळी करण्यात आली .नोकर भरती व खाजगीकरण, कंत्राटीकरणा विरोधात डीवायएफआय संघटना आक्रमक झाली असून परळी येथील उपजिल्हाधिकारी कार्यालयावर संघटनेच्या वतीने 14 मार्चच्या परिपत्रकाचे होळी करून सरकारचा निषेध करण्यात सरकारी नोकरीचे खाजगीकरण,कंत्राटीकरण बंद करा. सर्व विभागातील रिक्त जागा त्वरित भरा यासह बेरोजगारांच्या विविध मागण्यांचे निवेदनही उपजिल्हाधिकारी यांना देण्यात आले. डेमोक्रेटीक युथ फेडरेशन ऑफ इंडिया (DYFI) या युवक संघटनेच्या वतीने राज्यातील सर्व विभागातील रिक्त जागांवर कायमस्वरूपी नौकरभरती करा. खाजगीकरण, कंत्राटीकरण बंद करा. या प्रमुख मागण्यांसाठी विद्यार्थी, युवकांच्या, बेरोजगारांच्या विविध प्रश्नांवर सातत्यान

MB NEWS: विशेष लेख:नरहरी सोनार हरीचा दास

इमेज
  नरहरी सोनार हरीचा दास ------------------------------ - ह.भ.प. शामसुंदर महाराज सोन्नर संस्थापक अध्यक्ष- वारकरी सेवा प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष- ज्ञानेश्वरी हरिपाठ प्रसारक मंडळ सहसचिव- श्री वारकरी सेवा प्रतिष्ठान ------------------------------------------------ महाराष्ट्राच्या कानाकोप-यात कुठेही सोमवारचे नित्यनेमाचे भजन सुरू असेल तेव्हा ते भजन "भस्म उटी रुंड माळा l हाती तिरसूळ नेत्री ज्वळा ll या नरहरी सोनार यांच्या अभंगाशिवाय पूर्ण होतच नाही. इतर भजनाच्या वेळी "देवा तुझा मी सोनार" हे भजन ऐकायला मिळते.  शास्रीय भजन गायकीची "बैठक" असेल तेव्हा चिता-या चित्रे काढी भिंतीवरी" हा अभंग मैफि लीत रंग भरतो. शैव - वैष्णव परंपरेचा भक्कम सेतू म्हणूनही वारकरी नरहरी सोनार यांच्याकडे पहातात. त्यांना राम आणि कृष्ण अवतारातील प्रसिद्ध जांबूवंत यांचा अवतार मानण्यात येते. जाबूवंत ते नरहरी हा नेमका प्रवास कसा झाला हे वेगवेगळ्या धार्मिक कथांच्या पानोपानी पहायला मिळते. पंढरपूरच्या वाळवंटात आठरा पगड जातीतील संतांनी एकत्र येऊन भागवत धर्माचा अर्थात वारकरी संप्रदायाचा पाय रचला. त्य

MB NEWS:मराठवाड्यात 23 एप्रिलपर्यंत अवकाळी पावसाची शक्यता; 'या' जिल्ह्यात पावसाचा अंदाज

इमेज
  मराठवाड्यात 23 एप्रिलपर्यंत अवकाळी पावसाची शक्यता; 'या' जिल्ह्यात पावसाचा अंदाज राज्यातील वातावरणात सातत्यानं बदल होत असून, दुपारी ऊन आणि संध्याकाळी अवकाळी पावसासह  (Unseasonal Rain)  गारपीट होत असल्याचे पाहायाला मिळत आहे. दरम्यान, आजही राज्यातील काही भागांत पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून, मराठवाड्यातील काही जिल्ह्यात 23 एप्रिलपर्यंत अवकाळी पावसाची शक्यता आहे. विशेष म्हणजे, आज मराठवाड्यातील  (Marathwada)  लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.  गेल्या काही दिवसांपासून राज्यात सुरु असलेला अवकाळी पावसाने राज्यात अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. मात्र कोकण आणि विदर्भातील अवकाळी पावसाचे वातावरण दोन दिवसांत निवळणार असल्याचा अंदाज असून, उर्वरित राज्यात मात्र येत्या 23 एप्रिलपर्यंत अवकाळी पावसासह गारपिटीचा अंदाज हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी वर्तवला आहे. त्यानुसार मराठवाड्यातील परभणी, बीड, छत्रपती संभाजीनगर, लातूर, धाराशिव अशा एकूण 18  जिल्ह्यात 23 एप्रिलपर्यंत अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर या आठवड्यात उन्हाचा कडाकाही कमी राहण्याची शक्यता आहे.

MB NEWS:विद्यावर्धिनी विद्यालयाचे स्पर्धेत यश

इमेज
  विद्यावर्धिनी विद्यालयाचे स्पर्धेत यश परळी वैजनाथ दि.१६ (प्रतिनिधी)      क्रांतीसुर्य महात्मा फुले व भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित सामान्य ज्ञान स्पर्धेत विद्यावर्धिनी  माध्यमिक विद्यालयाच्या दोन विद्यार्थ्यांनी यश मिळवले.याबद्दल संस्था व शाळेच्या वतीने विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले.           क्रांतीसुर्य महात्मा फुले व भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मंगळवारी (ता.११) आयोजित सामान्य ज्ञान स्पर्धेत शहरातील अनेक शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. यामध्ये विद्यावर्धिनी माध्यमिक विद्यालयातील दोन विद्यार्थ्यांना प्रथम व द्वितीय क्रमांक प्राप्त झाला आहे.यात प्रथम क्रमांक श्रीनिवास पांडुरंग काळे (९ वी) याने रोख ५ हजार रुपये, प्रमाणपत्र व ट्रॉफी पटकावली तर आदित्य जगन्नाथ वडुळकर (९ वी) याने द्वितीय क्रमांकांसह ३ हजार रुपये नगदी रोख, प्रमाणपत्र व ट्रॉफी मिळवली. या विद्यार्थ्यांचे श्री समर्थ शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री. कोळगे, उपाध्यक्ष श्री भिंगोरे, सचिव श्री इटके, संचालक श्री. मुंडे, श्री.पैंजणे, डॉ. चेवले यांच्यासह विद्

MB NEWS:३० एप्रिलला पत्रकारांचे बीड येथे विभागीय अधिवेशन

इमेज
  ३० एप्रिलला पत्रकारांचे बीड येथे विभागीय अधिवेशन व्हॉइस ऑफ मीडिया’च्या परळीतील पुर्वतयारी बैठकीत महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर विचारमंथन परळी वैजनाथ (प्रतिनिधी) दि.१६ - पत्रकारिता आणि पत्रकारांसाठी काम करणाऱ्या ‘व्हॉइस ऑफ मीडिया’ या संघटनेची रविवार दि.१६ एप्रिल रोजी बैठक संपन्न झाली.३० एप्रिल रोजी बीड येथे होणाऱ्या अधिवेशनासाठी पूर्वतयारीसाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी व्हॉईस ऑफ मीडियाचे बीड जिल्हा कार्याध्यक्ष दिनेश लिंबेकर,व्हॉईस ऑफ मीडियाचे बीड जिल्हा प्रवक्ते गणेश सावंत यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.या बैठीसाठी परळी तालुका परिसरातील पत्रकार बांधवांची उपस्थिती होती.संघटनेचे संस्थापक-अध्यक्ष संदीप काळे यांच्या संकल्पनेतून उभ्या राहिलेल्या या संघटनेच्या पत्रकार बांधवांच्या हितासाठी असणाऱ्या पंचसूत्रीवर या बैठकीत चर्चा झाली. यावेळी व्हॉईस ऑफ मीडियाचे बीड जिल्हा कार्याध्यक्ष दिनेश लिंबेकर,बीड जिल्हा प्रवक्ते गणेश सावंत यांनी मार्गदर्शन केले.संघटनात्मक बांधणी हे पर्व आता संपले आहे,आता कृतिशील कार्यक्रम सुरू झाला आहे.पत्रकारांना घरे मिळाली पाहिजेत. पत्रकारांना आरोग्य कार्ड

MB NEWS:केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांच्या हस्ते रामराव गित्ते यांच्या व्हीआरजी कंन्स्ट्रक्शन कंपनीचा शुभारंभ

इमेज
  केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांच्या हस्ते रामराव गित्ते यांच्या व्हीआरजी कंन्स्ट्रक्शन कंपनीचा शुभारंभ छत्रपती संभाजीनगर येथील कार्यक्रमाला अनेकांची उपस्थिती छत्रपती संभाजीनगर(प्रतिनिधी)-परळी येथील रामराव गित्ते यांच्या व्हीआरजी कंन्स्ट्रक्शन कंपनीच्या नवीन जेसीबी मशिनरी आणि कार्यालयाचा शुभारंभ केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांच्या हस्ते झाल्टा फाटा येथे झाला. राजकारणाबरोबर व्यवसायात अनेक वर्षांपासून काम करणारे रामराव गित्ते यांच्यामुळे आता संभाजीनगर जिल्ह्यात पाणी पुरवठ्याची कामे गतीने होतील अशी आशा डॉ.कराड यांनी व्यक्त केली. तर आगामी वर्षभरात ग्रामीण भागातील नागरिकांना पिण्यासाठी पाणी मिळेल यासाठी गतीने काम करण्याची ग्वाही रामराव गित्ते यांनी दिली. छत्रपती संभाजीनगर जवळील झाल्टा फाटा येथे रामराव गित्ते यांच्या व्हीआरजी कंन्स्ट्रक्शन कंपनीच्या नवीन कार्यालयाचा शुभारंभ केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांच्या हस्ते शनिवार दि. 15 एप्रिल रोजी झालाा. यावेळी नवीन जेसीबी मशिनरींचीही विधीवत पुजा करण्यात आली. यावेळी बोलताना डॉ.कराड म्हणाले, परळी वैजनाथ येथुन अन

MB NEWS: विशेष लेख:नामदेव: विवेकी प्रबोधन परंपरेचे नायक

इमेज
  नामदेव: विवेकी प्रबोधन परंपरेचे नायक ----------------------------------- ------- ------- ✍️ शामसुंदर महाराज सोन्नर • संस्थापक अध्यक्ष - श्री वारकरी सेवा प्रतिष्ठान • संस्थापक अध्यक्ष - ज्ञानेश्वरीहरिपाठ प्रसारक मंडळ. • सहसचिव - श्री वारकरी प्रबोधन महासमिती. ------------------------------------------ ------- म हाराष्ट्रामध्ये विवेकी प्रबोधनाचा अखंड जागर वारकरी संतांनी केला. या वारकरी विचार परंपरेचे नायक म्हणून संत नामदेव महाराज यांच्याकडे पाहिले जाते. विविध जातीतील त्यांचे समकालीन 24 मराठी संत कवी  होते आणि ते नामदेवांना आदर्श मानत होते. इतकेच नव्हे तर त्यांचे समकालीन कानडी संत पुरंदरदास आणि हिंदी कवी संत कबीर यांच्यावरही नामदेवांच्या विचारांचा प्रभाव दिसतो. वारकरी परंपरेचे कळस म्हणून गौरविलेले तुकाराम महाराज हे तर नामदेव महाराज हे आपल्या अभंग रचनेची प्रेरणा असल्याचे सांगतात. यावरून संत नामदेव हे संत प्रबोधन परंपरेचे नायक आहेत, असे ठामपणे म्हणता येईल.* संत नामदेव यांनी विवेकी वारकरी प्रबोधनाच्या प्रचारासाठी संपूर्ण भारत भ्रमण केले. तसे संपूर्ण भारताचे भ्रमण करणारे ते पहिले मराठी संत ह

MB NEWS:सकारात्मक निर्णय करु -ना.भागवत कराडांचे अश्वासन

इमेज
  न्यु इंडिया एश्योरन्स कं. लि. परळीची शाखा बंद होणार; केंद्रीय अर्थराज्यमंत्र्यांना विमाप्रतिनिधींचे निवेदन  सकारात्मक निर्णय करु -ना.भागवत कराडांचे अश्वासन परळी वैजनाथ, प्रतिनिधी         न्यु इंडिया एश्योरन्स कं. लि. परळीची शाखा बंद होणार असल्याबाबत कंपनीने वृत्तपत्रातून नोटीस जारी केली आहे. कुठलेही कारण नसतांना किंवा कुठलाही विचार न करता अचानक एकतर्फी झालेला निर्णय अन्यायकारक असुन परळीतील शाखा बंद करण्यात येऊ नये असे निवेदन केंद्रीय अर्थराज्यमंत्र्यांना विमाप्रतिनिधींनी सादर केले. याबाबत सकारात्मक निर्णय करु  असे ना.भागवत कराड यांनी अश्वासन दिले आहे.            परळी-वैजनाथ. जि. बीड येथील शाखा क्र. १६१२०४ वि न्यु इंडिया एश्योरन्स कं. लि. शाखा बंद न करणे बाबत परळीतील विमा प्रतिनिधींनी केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड यांना निवेदन सादर केले.या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की,परळी-वैजनाथ शहरातील शाखा कार्यालय दि.३१.०५.२०२३ रोजी बंद करण्यात येईल असे वृत्तपत्रातील नोटीसीद्वारे कळविले आहे.कुठलेही कारण नसतांना किंवा कुठलाही विचार न करता अचानक एकतर्फी झालेला निर्णय अन्यायकारक आहे.या भागा

MB NEWS:एक वही एक पेन' अभियान वंचीत विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात टिकवून ठेवेल - पीआय.सलीम चाऊस

इमेज
' एक वही एक पेन' अभियान वंचीत विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात टिकवून ठेवेल - पीआय.सलीम चाऊस परळी प्रतिनिधी - महामानव, विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त युवा पत्रकार-अभिनेता विकास वाघमारे आणि सामाजिक कार्यकर्ते विकास रोडे यांनी परळी रेल्वे स्टेशन परिसरात  'एक वही एक पेन' अभिमान राबविले. या अभियानाचे उद्घाटन संभाजी नगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सलीम चाऊस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना ते म्हणाले की,एक वही एक पेन अभियान वंचीत विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात टिकवून ठेवेल.या प्रसंगी काँग्रेसचे परळी शहराध्यक्ष बहादूर भाई, प्रख्यात सिने-नाटय दिग्दर्शक डॉ. सिध्दार्थ तायडे, सहदेव कांबळे, पत्रकार कैलास डुमणे, साहित्यिक-नाटककार-संपादक रानबा गायकवाड,सामाजिक कार्यकर्ते अमन पटेल, बुकतर आदींची प्रमुख उपस्थिती  होती. या वेळी उपस्थितांना संबोधित करतांना दिग्दर्शक प्रा. डॉ. सिध्दार्थ तायडे यांनी भारतात शिक्षणातून विद्यार्थी गळतीचे प्रमाण प्रचंड आहे. गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात टिकवून ठेवणे सरकारला प्रभावी