MB NEWS:एक वही एक पेन' अभियान वंचीत विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात टिकवून ठेवेल - पीआय.सलीम चाऊस

'एक वही एक पेन' अभियान वंचीत विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात टिकवून ठेवेल - पीआय.सलीम चाऊस

परळी प्रतिनिधी - महामानव, विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त युवा पत्रकार-अभिनेता विकास वाघमारे आणि सामाजिक कार्यकर्ते विकास रोडे यांनी परळी रेल्वे स्टेशन परिसरात  'एक वही एक पेन' अभिमान राबविले. या अभियानाचे उद्घाटन संभाजी नगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सलीम चाऊस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना ते म्हणाले की,एक वही एक पेन अभियान वंचीत विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात टिकवून ठेवेल.या प्रसंगी काँग्रेसचे परळी शहराध्यक्ष बहादूर भाई, प्रख्यात सिने-नाटय दिग्दर्शक डॉ. सिध्दार्थ तायडे, सहदेव कांबळे, पत्रकार कैलास डुमणे, साहित्यिक-नाटककार-संपादक रानबा गायकवाड,सामाजिक कार्यकर्ते अमन पटेल, बुकतर आदींची प्रमुख उपस्थिती  होती.


या वेळी उपस्थितांना संबोधित करतांना दिग्दर्शक प्रा. डॉ. सिध्दार्थ तायडे यांनी भारतात शिक्षणातून विद्यार्थी गळतीचे प्रमाण प्रचंड आहे. गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात टिकवून ठेवणे सरकारला प्रभावीपणे शक्य होत नाही. त्याकरिता अनेक पातळीवर प्रयत्न सुरु आहेत. शेतकरी, कष्टकरी, कामगार हा पालक वर्ग असलेला विद्यार्थी आम्ही शैक्षणिक सुविधा अभावी हिरमुसून जाताना अनुभवला आहे. एकीकडे अभिवादनपर हाराफुलांचा खच पडतो आहे आणि दुसरीकडे आपले उद्याचे देशाचे भविष्य कोमेजून जाताना पाहणे अत्यंत वेदनादायक.अशा परिस्थितीत 

एक वही एक पेन अभियान बाबासाहेबांचे उच्चशिक्षित समाजाचे स्वप्न पूर्ण करेल असे प्रतिपादन केले.


एक वही एक पेन अभियान इथूनच जन्म घेते. या संकल्पनेनुसार,भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीमध्ये अवांतर खर्च टाळून  त्याच मूल्याचे 'एक वही व एक पेन' डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन म्हणून आमच्याकडे जमा करा, आम्ही ते सर्व साहित्य अतिशय प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोचवू. त्यांच्या शिक्षणाला तुमच्या वतीने हातभार लावू. ते विद्यार्थी शिक्षित होतील. आयुष्यात मोठ्या पदांवर विराजमान होतील. असा आशावाद अभियानकर्ते विकास वाघमारे यांनी व्यक्त केला. काँग्रेसचे शहराध्यक्ष बहादूर भाई म्हणाले की,

भारताच्या सर्व सामाजिक दुखण्यांवर शिक्षण हेच प्रभावी औषध असेल असे स्वता: डॉ.बाबासाहेब आंबेडकर सांगून गेले आहेत.या अभियानास आपण सहकार्य करू असे आश्वासन त्यांनी दिले.


या अभियानास रिपाइंचे राज्य सचिव भास्कर रोडे, मराठवाडा उपाध्यक्ष, प्रा. दासू वाघमारे, न.प. चे मुख्य अधिकारी त्र्यंबक कांबळे ,कॅप्टन वसंत कांबळे, डॉ. आकाश वाघमारे, भैय्यासाहेब आदोडे, प्रकाशसिंग तुसाम, बा. सो. कांबळे,केशव कुकडे, सिद्धेश्वर इंगोले,संतोष मेंडके,राजेंद्र कोकाटे,

विठ्ठलराव झिलमेवाड, संभाजी मुंडे, वैजनाथ कळसकर,मारोती कांबळे, राहुल घोबाळे,आकाश सावंत, विनायक काळे,सिद्धांत लांडगे,सम्राट गायकवाड,विद्याधर सिरसाट आदींनी भेट दिली .समाज बांधवांनी अभियानास उत्तम प्रतिसाद दिला.

या अभियानाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन साहित्यिक-संपादक रानबा गायकवाड यांनी केले तर आभार विकास वाघमारे यांनी मानले.

Advertise 



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार